आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संथगतीने वाढणारा मानसिक आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Obsessive-compulsive disorder (ओसीडी) हा एक मंद गतीने वाढणारा मानसिक आजार आहे, हा आजार अचानक उद्भवत नाही किंवा या आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती इतर मनोविकाराच्या रुग्णांसारखे इतरांना त्रास किंवा हानी पोहोचवत नाहीत. एखाद्या गोष्टीबद्दल अतिप्रमाणापेक्षा जास्त माहिती घेणे, ही माहिती टीव्ही, पुस्तके, वर्तमानपत्र, मासिक यातून ती व्यक्ती गोळा करत असते. आपल्यालाही असाच त्रास होईल हा विचार वारंवार त्यांना त्रास देत असतो. या विचारांवर त्यांचे नियंत्रण नसते. त्या गोष्टीविषयी विनाकारण काळजी बाळगणे किंवा चिंता करणे, अतिकामाचा बोजा, मानसिक ताणतणाव, अचानक झालेला मानसिक धक्का, डोक्याला मार लागल्यामुळे होणारे दुष्परिणाम, यामुळे हा आजार बळावू शकतो. वारंवार एकाच गोष्टीची चिंता करणे व त्या गोष्टीची जास्ती काळजी घेणे हे आजाराचे प्रमुख लक्षण आहे.

उपचार
१. या मनोविकाराचे निदान करण्यासाठी कुठलीही तपासणी नसते, मानसोपचार तज्ज्ञ रुग्णाच्या परिस्थितीचा अभ्यास करून निदान करतात. मानसिक ताण-तणाव कमी करणे व त्या व्यक्तीला सारखे कामात व्यस्त ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा आजार काही प्रमाणात कमी होऊ शकतो, रिकामे बसल्याने हा आजार वाढू शकतो. रुग्णाच्या वागण्यामुळे घरातील इतर मंडळी खूप त्रस्त होत असतात, परंतु इतरांनी त्यांना समजून घेणे खूप आवश्यक आहे. त्यांना समोर आलेल्या परिस्थितीपासून तुम्हाला कुठलीही हानी किंवा त्रास होणार नाही याची आपण त्यांना खात्री करून द्यावी म्हणजे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
२. आधुनिक उपचार पद्धतीमध्ये या आजारावर ब-याच रुग्णांना कायमस्वरूपी औषधी घ्यावी लागते. होमिओपॅथिक औषधीने ब-याच रुग्णांची आधुनिक औषधींची लागलेली सवय थांबते. होमिओपॅथिक औषधी निरोगी मनावांवर प्रयोग करून सिद्ध केलेले असतात, त्या औषधींचा त्या व्यक्तीवर होणा-या परिणामांचा अभ्यास केला जातो त्यामध्ये व्यक्तीच्या मनावर झालेल्या बदलांचा अभ्यास करून ते औषध रुग्णांवर वापरण्यास सिद्ध केले जाते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते त्यांचा आत्मविश्वास वाढतो, विनाकारण काळजी करणे कमी होते. होमिओपॅथिक औषधीने आत्मविश्वास वाढतो व करत असलेले काम बरोबर आहे याची जाणीव वाढते.
३.ओसीडी बरोबर मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील उपचार करावा लागतो. होमिओपॅथिक औषधी हे रुग्णाच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्या मानसिकतेनुसार औषधी ठरवली जाते. कुठलाही दुष्परिणाम होत नाही किंवा इतर आधुनिक औषधीप्रमाणे रुग्णांमध्ये सुस्ती येऊन सारखी झोप येत नाही या उलट मनोविकारातील रुग्णांमध्ये सुस्तपणा कमी होतो व त्यांचा उत्साह वाढतो ताणतणाव कमी होतो, झोप शांत लागते, जीवना बद्दलचा नकारार्थी दृष्टिकोन बदलतो. औषधी बरोबर जर या रुग्णांनी नियमित प्राणायाम केला तर त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

लक्षणे
या मनोविकारातील व्यक्ती अती स्वच्छता पाळतात : या मनोविकारातील ब-याच व्यक्ती अतिप्रमाणात गरजेपेक्षा जास्त स्वच्छता पाळतात, त्यांना भीती असते आपल्याला जंतुसंसर्ग होईल त्यामुळे आपल्याला त्रास होईल या भीतीने ती व्यक्ती काळजी घेत असते. वारंवार हात धुणे, अंघोळ करणे, कपडे बदलणे, वारंवार वस्तूंची तपासणी करणे, त्याच त्या गोष्टी वारंवार करणे, आपल्यावर कोणी तरी लक्ष ठेवतं याची सारखी जाणीव होणे, ही त्यांना लागलेली सवय त्यात त्यांनी स्वत:ला एका चौकटीत बसवलेले असते. त्या चौकटीतून त्यांना इच्छा असून देखील बाहेर पडणे खूप अवघड जाते. या रुग्णांना हे जाणवत असते की आपण हे विनाकारण काळजी करतोय पण त्यावर त्यांचे नियंत्रण नसते. त्यांना त्या गोष्टी कराव्याच लागतात. विचारांची साखळी सुरूच राहते. एक विचार थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो विचार जाताक्षणी लगेच त्याची जागा दुसरा विचार घेतो या विचार चक्रातून त्यांची इच्छा असूनही सुटका होत नाही.
drsanjay.padole@gmail.com