आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Milk Bottle By Dr. N.C. Saha, Divya Marathi

आयएसआय शिक्का पाहूनच खरेदी करा आता प्रमाणित दुधाच्या बाटल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या दुधाच्या बाटल्यांसाठी भारतीय उत्पादकांची चौकशी सुरू, पण आयात केलेल्या उत्पादनांनी बाजारपेठ तुडुंब भरली. कार्सिनोजेनिक बिस्फेनॉल ए (बीपीए) चा समावेश असलेले एक थर्मोप्लास्टिक-पॉलिकार्बोनेटपासून बनवलेल्या दुधाच्या बाटल्यांमुळे ग्राहकांमध्ये वाढत असलेली अस्वस्थता पाहून अलीकडेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड‌्स (बीआयएस) या संस्थेलादेखील उत्पादकांसाठी प्रमाणित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची निकड भासली आहे.

बीपीएच्या प्रमाणाबाबत काही मर्यादा : जगभरातील ३० देशांमध्ये दूध-बाटल्यांच्या उत्पादनात पॉलिकार्बोनेटचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आशियातील अनेक देशांनी बीपीएच्या प्रमाणाबाबत काही मर्यादा घालून दिल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस बीआयएसने वाणिज्य मंत्रालयाची स्वायत्त संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग (आयआयपी) या संस्थेस बीपीएविषयी जागतिक स्तरावर वाढत असलेल्या चिंतेविषयी लेखी स्वरूपात कळवून असेही सूचित केले की आता बीपीए वर अधिकृतरीत्या बंदी घालण्यात आलेली आहे.

कुठेही फिडिंग बोटल असा
उल्लेख केला जात नाही :
मात्र, तरीही, बनावट दूध-बाटल्यांची आयात अजूनही सुरूच आहे. बाजारपेठेत पिजन, टॉलीजॉय यासारखे चांगले ब्रंॅड्सही आहेत. पण त्यासोबत बीपीएचा भरपूर प्रमाणात समावेश असलेल्या दूध-बाटल्याही खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध आहेत आणि अशा बाटल्यांचा वापर लहान मुलांसाठी अजिबात योग्य नाही.
इथे समस्या ही आहे की अशा प्रकारच्या उत्पादनांच्या कन्साइन्मेंट्सवर प्लास्टिक बोटल असे लेबल लावलेले असते आणि त्यावर कुठेही फिडिंग बोटल असा उल्लेख केला जात नाही. किंबहुना, हे काम नेहेमी याच पद्धतीने केले जाते.

बीपीए हा घटक खाद्यपदार्थांमध्ये
मिसळतो त्याच्यामुळे हृदयविकार व कर्करोगासारखे आजार :
त्यामुळे एका बाटली उत्पादक उद्योजकाने- नवजात बाळांसाठी दुधासंबंधी पर्याय, दूध-बाटल्या आणि नवजात शिशू आहारविषयक नियम या नियमांतर्गत (एचआरडी विभाग-महिला व बाल विकास मंत्रालय) माहितीच्या अधिकाराखाली माहिती प्राप्त करण्यासाठी एक अर्ज दाखल केलेला आहे.
बीआयएसच्या प्लास्टिक्स आणि रसायन विभागाचे (फिडिंग बोटल्स) अध्यक्ष आणि आयआयपीचे संचालक डॉ. एन. सी, साहा यांनी सांगितले, प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगांमधून हे दिसून आले आहे की बीपीए हा घटक खाद्यपदार्थांमध्ये मिसळतो आणि त्याच्यामुळे हृदयविकार व कर्करोगासारखे आजार उद्भवतात. यासाठीच बीआयएसने नशि्चित केलेल्या मापदंडांमध्ये दुरुस्ती केली जात आहे आणि बीपीएचा समावेश असणाऱ्या पॉलिकार्बोनेटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.