आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Naturopathy By Dr.Vilas Gajare, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कान, नाक, डोळे त्वचा ही ज्ञानेंद्रिय होतात आरोग्यसंपन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गोपचार -जलनेती पद्धतीत स्वास्थ्य रक्षणासाटी नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब केला जातो. निसर्गोपचारात पंचमहाभूतातील पृथ्वी, जल, तेज, वायू व आकाश या तत्त्वाद्वारे उपचार केला जातो. त्यातील जलतत्त्वाद्वारे रुग्णावर उपचार म्हणजेच जलनेतीच्या थंडगार पाणी, वाफ कोमट गरम पाणी याद्वारे अंतर्गत व बहिर्गत स्नानाने स्वच्छ केले जाते. जलनेती ही श्वासोच्छ‌्वास सुलभ पार करण्यासाठीचा उपचार आहे. नाशिका मार्ग, नाक व श्वसनमार्ग शुद्ध करणे याला जलनेती म्हणतात. यात विशिष्ट आकाराचा एक जलनेती पात्र (हे प्लास्टिकचे किंवा धातूचे भांडे असते.) कोमट पाणी, मीठ, चमचा या साहित्याची जरुरी असते. ग्लासात लहान चमचा मीठ कोमट पाण्यात मिसळा, स्नानगृहात किंवा बेसीनसमोर उभे राहून डाव्या हातात कोमट पाण्याने भरलेले जलनेती पात्र घेऊन हनुवटी छातीच्या बाजूस आता घ्यावी लागते, तोंड उघडे ठेवून व बाजूला झुकवून जलनेती पात्राचे चिंचोळे मुख डाव्या नाकपुडीत थोडे सरकवा डोळे शरीर स्थिर ठेवून कप हळूहळू वर नेल्यास पात्रातील पाणी डाव्या नाकपुडीतून सोडल्यावर उजव्या नाकपुडीतून पाण्याची सतत धार लागेल तोंडाने श्वासोच्छ‌्वास चालू ठेवून हीच क्रिया दुस-या बाजूने करा शिंकरून नाकपुढ्या साफ करा.

यामुळे होणारा लाभ - यामुळे नाकातील अंतर त्वचा शुद्ध होऊन मज्जातंतूची टोके (गंध) उत्तेजित होतात. अंतर त्वचेची सहनशीलता क्षमता वाढेल. श्वसनाचे रोग सर्दी खोकला हे विकास होत नाहीत. नेत्रदोष, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे हे दोष कमी होतात. कान, नाक, डोळे त्वचा ही ज्ञानेंद्रिय आरोग्य संपन्न होतात. सुरुवातीला जलनेती क्रिया सराव गुरूंच्या - निसर्गोपचारकाच्या मार्गदर्शनाखाली करावा म्हणजे घशात पाणी जाणे किंवा जलनेती पात्राचे टोक नाकातील आंतरत्वचेला लागणे हे धोके टाळता येतात.