आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एज्यु कॉर्नर: टीका आणि टिपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नकारात्मकतेबरोबर टीकाही सकारात्मक दृष्टिकोनातूनही स्वीकारली जाऊ शकते. टीकेबद्दलचा हा प्रामाणिकपणा नक्कीच तुमच्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. कॉर्पोरेट जगतातही प्रत्येकाला वेगवेगळ्या टीकांचा सामना करावा लागतो. तेव्हा ही टीका कौतुकास्पद पद्धतीने कशी स्वीकारता येते ते पाहू या. अशा प्रकारे अपमानाकडे दुर्लक्ष करत, आपला मुद्दा स्पष्ट करण्याची एक संधी म्हणून जर पाहिले तर तुमच्या सकारात्मक विचारांचे नक्कीच सगळे कौतुक करतील, असे वागूनही जर टीकाकार तुमच्यावर टीका करत राहिला तरीही तुमच्या वागणुकीत बदल करू नका. तुमच्याकडून काहीच आक्रमक प्रतिक्रिया येत नाही, हे पाहून हळूहळू ते टीका करण्याचे सोडून देतीलच पण त्याचबरोबर तुमची प्रतिमा नक्कीच झळाळेल. टीकेकडे आपण आपल्या प्रगतीचा एक टप्पा त्याचबरोबर इतरांसमोर आपल्या प्रतिमेचा ठसा उमटवण्याची संधी म्हणून जर तुम्ही पाहाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या यशाचे दोन टप्पे सहज गाठाल.
सकारात्मक विचार करा
कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे सर्वजण पाहत असलेल्या नकारात्मक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणे. टीकेकडेही सकारात्मक दृष्टीने पाहा. बहुतांशी टीकेतून आपल्याला जरी अहंकारीपणा, स्वार्थीपणा झळाळून येताना आढळतात, तरीही त्या टीकेतही खोलवर कुठे तरी आपल्याबद्दलचा प्रामाणिक आढावा व आपल्यातील त्रुटी सुधारण्याबद्दलचे सल्ले नक्कीच दडलेले असतात.
उणिवा, टीकेकडे संधी, प्रगती म्हणून पाहा
आपण आपल्या कामात इतके व्यग्र झालेले असतो की आपल्यातील उणिवा, त्रुटी यांची जाणीव आपल्याला होत नाही. परंतु त्या वेळी टीकेद्वारे तुम्हाला तुमच्या उणिवांची जर कोणी जाणीव करून देत असेल तर त्याकडे स्वत:च्या प्रगतीचा एक टप्पा म्हणून पाहा.
तुमच्या पहिल्या भावनाप्रधान प्रतिक्रियेला आवर घाला
तुमची पहिली प्रतिक्रिया टीका केलेल्या व्यक्तीवर धावून जाणे असेल तर प्रत्युत्तर देण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. दीर्घ श्वास घ्या व शांतपूर्वक टीकेचा विचार करा. उदा. समजा, तुम्हाला कोणी टीकाकारक मेल पाठवलेला आहे, तर त्या ई-मेलला उत्तर देण्यापूर्वी एक तास तरी थांबा. हा वेळ तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रतिक्रियेबाहेर विचार करण्याची संधी तुम्हाला देतो. तुमच्या एक तासापूर्वीच्या भावनाप्रधान विचारांमध्ये नक्कीच लॉजीकल विचारांचा प्रवेश होतो. तेव्हा तासभर तुमच्या भावनांचा प्रवाह वाहू द्या व त्यानंतरच ई-मेलला प्रत्युत्तर द्या.
टीकाकारांचे
आभार माना
जरी टीकाकार अहंकारी, स्वार्थी असेल तरीही त्या व्यक्तीचे आभार माना. ती व्यक्ती नकारात्मक असेल किंवा त्यांचा दिवस खराब गेला म्हणून ते तुमच्यावर टीका करत असतील, तरीही त्या व्यक्तीचे आभार माना. कारण तुम्ही आभार मानाल अशी अपेक्षा त्या व्यक्तीने केलेली नसते. जरी त्या व्यक्तीने ते आभार चांगल्या दृष्टिकोनाने स्वीकारले नसले तरीही तुमच्या प्रगतीसाठी ते नक्कीच लाभदायक ठरतील.

टीकाकाराकडून शिका
चुका, उणिवा सुधारा

टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहत टीकाकाराचे आभार मानल्यानंतर तेथेच थांबू नका. स्वत:च्या उणिवा, चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. बहुतांशी लोक हे करण्याचे टाळतात. कारण आपण परफेक्ट आहोत असे त्यांना वाटत असते, परंतु "No one is perfect in the world.' ब-याच वेळा तुम्ही अयोग्य व टीकाकार योग्य असतात. तेव्हा आपल्यातील अयोग्य गोष्टी काढून टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
आदर्श व्यक्ती बना : आपण टीका ही आपल्यावरील वैयक्तिक आक्रमण किंवा अपमान म्हणून स्वीकारत असतो. Take it as a criticism of your action आपण टीकेला वैयक्तिक आक्रमकता समजून टीकाकार परत आक्रमण करतो. परंतु तुम्ही त्यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या पातळीला झुकत असतात, हे लक्षात ठेवा. So be the better person. समजा तुमच्यावर कोणी अशी टीका केली. "You are an idiot, I don't understand what X has to do Y.' तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असावी! सर्वांत प्रथम पहिल्या वाक्याकडे दुर्लक्ष करा व उत्तर असे असावे. "Thanks for giving the opportunity to clarify that. I don't think I made it as clear as I should have what X has to do with Y is blah blah…'