आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजीवकुमारचे साधेपण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दृश्य १ - पंधरा-वीस चित्रपट हातात असूनही संजीवकुमार यांनी सिता-यांचे बेट असलेल्या सांताक्रुझमध्ये फ्लॅट घेतला नव्हता. मुंबईमधील भुलेश्वर येथे असलेल्या जुन्याच घरात ते आपली आई, दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासह राहात होते. पण एकाच खोलीच्या त्या घरात ते एखाद्या सम्राटाप्रमाणे ऐटीत राहात होते. संजीवकुमार यांच्या स्वभावाची ती खासियत होती. ते बस आणि रेल्वेने मोठ्या रुबाबात प्रवास करत. ते म्हणत, ‘मैं नहीं समझता, शान-ओ-शौकत के साथ रहने में कोई खास लाभ है। अगर मुझमें अभिनय की प्रतिभा है, तो लोग मुझे इस रूप में भी प्यार करेंगे।’ अभिनयाच्या क्षेत्रात बरीच वाटचाल केल्यानंतर जेव्हा त्यांनी नवी कार आणि नवीन घर खरेदी केले, तेव्हा त्यांचे म्हणणे होते, ‘यह सब दुसरों के लिए करना पड़ता है। दरअसल, व्यस्त ज्यादा रहने लगा हूं तो कहीं जाने-आने के लिए कार खरीद ली... फ्लैट इसलिए कि यहां एक साथ कई लोग आकर बैठ सकें।’
दृश्य २ - संजीव कुमार यांनी स्टंट चित्रपटांमुळे तयार झालेल्या प्रतिमेतून बाहेर पडून सामाजिक चित्रपटांमध्ये प्रवेश मिळवला. ‘पति पत्नी’(१९६६)मध्ये त्यांना अभिनेत्री नंदासोबत मुख्य भूमिका मिळाली होती. त्या वेळी ते मेट्रो सिनेमामध्ये एक चित्रपट बघायला गेले. सवय म्हणा वा स्वभाव; संजीव यांनी लोअर स्टॉलचे तिकीट खरेदी केले. योगायोग म्हणजे, त्याच शोला नंदाही बाल्कनीत बसली होती. नंदाला बघताच संजीव यांनी दुरूनच सलाम ठोकला. पुढे काय आपत्ती येणार आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. दुस-या दिवशी सेटवर येताच नंदा यांनी निर्माता उस्मान अली यांच्याकडे तक्रार केली, ‘आप कोई ढंग का हीरो ले लिजिए! यह कोई हीरो है, या फेरीवाला? जरा हुलिया तो देखिए... एक तो बेढंगे कपड़े पहनता है, उपर से निचली क्लास में जाकर फिल्म देखता है! इसके साथ काम करके मेरा भी ग्रेड नही गिर जाएगा।’ नंदा रागारागात असे अद्वातद्वा बोलत असतानाच, संजीवकुमार सेटवर आले. आताही त्यांनी कालचाच कुर्ता-पायजमा घातला होता. हातात छत्री लटकत होती, घड्याळाच्या पट्ट्याला बसची तिकीट अडकवलेली होती... संजीव यांना अचानक अशा गबाळ्या वेषात समोर बघून सर्व जण हसू लागले. ‘तुम हीरो हो तो हीरो, की तरह रहना भी सीखो! यदि गाड़ी नहीं रख सकते, तो कम से कम टॅक्सी में ही आ जाया करो!’ युनिटमधील एकाने कठोर शब्दांत सुनावले, ‘अगर यह फेरीवाले का ही लिबास पहनना है, तो कालबादेवी में जाकर कोई और धंधा करो... यह फिल्म लाइन छोड़ क्यों नहीं देते?’ साहजिकच संजीव यांना हे बोलणे जिव्हारी लागले, पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पुढे मात्र काळाचे फासे उलटे पडले. जेव्हा नंदाची लोकप्रियता कमी होऊ लागली, तेव्हा संजीव कुमार मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर यशाचे नवे आयाम रचत होते...
dpsingh@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...