आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Scholarship By Dattraya Ambulkar, Divya Marathi

शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम: ‘आयआयटी’ची जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट - ‘जॅम’ : २०१५

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन इनि्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे इंडियन इनि्स्टट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूसह आयआयटीच्या भुवनेश्वर, मुंबई, िदल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कानपूर, खडगपूर, चेन्नई, रुडकी व रोपड या केंद्रांवर उपलब्ध असणाऱ्या एमएस्सी, पीएचडी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट अॅडमिशन्स टेस्ट, जॅम - २०१५ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेश
अर्ज मागविण्‍यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी ते सर्वसाधारण गटातील असल्यास बीएस्सी पदवी कमीत कमी ६०% गुणांसह (राखीव गटातील िवद्यार्थ्यांनी ५०%) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावणि्यात येईल. ही निवड
परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ८ फेब्रुवारी २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई,
नागपूर, नांदेड, नािशक व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची
टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंिधत केंद्रातील अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून महलिा अर्जदारांनी १०५० रु., सर्वसामान्य गटातील
उमेदवारांनी २१०० तर राखीव गटातील उमेदवारांनी १०५० रु. रोखीने व चलनद्वारा स्टेट बँक ऑफ इंिडया
अथवा तिच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
अिधक मािहती व तपशलिासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अिधक मािहती व तपशलिासाठी इं
िडयन इनि्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटीच्या दूरध्वनी क्र. ०३६१-२५८२७५१ वर संपर्क साधावा. अथवा
आयआयटीच्या http://www.iitg.ernet.in/jam2015 अथवा
http://www.iitg.ac.in/jam2015 या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१४ आहे.

‘एलआयसी’ची सुवर्णजयंती
‘एलआयसी’ म्हणजेच आयुर्विमा महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना िवविध अभ्यासक्रमांसाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.
* वैद्यकशास्त्र - अभियांत्रिकी यासह कुठल्याही िवषयातील पदवी अथवा पदविका : अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१३-
१४ या शैक्षणिक सत्रात बारावीची परीक्षा कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
* औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तांत्रिक वा व्यवसायिवषयक अभ्यासक्रम : अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या
शैक्षणिक सत्रात दहावीची परीक्षा कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
विशेष सूचना : अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व स्रोतांपासूनचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांहून अिधक
नसावे.
अधिक मािहती व तपशलिासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशलिासाठी प्रमुख वृत्तपत्रात
प्रकाशित झालेली एलआयसीची सुवर्णजयंती िशष्यवृत्ती विषयक जाहिरात पाहावी, आयुर्विमा मंडळाच्या शाखा वा मंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा एलआयसीच्या www.licindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१४ आहे.

आययुसीएए - एनसीआरए अॅडमिशन टेस्ट - आयएनएटी-२०१४
इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रॉफिजिक्स, पुणे द्वारा घेण्यात येणाऱ्या संशोधनपर पीएचडी
नोंदणी पात्रता परीक्षेसाठी खालीलप्रमाणे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणि्यात
येत आहेत.
उपलब्ध िवषयांचा तपशील : या योजनेअंतर्गत संशोधनपर पीएचडी करण्यासाठी भौतिकशास्त्र, अॅस्ट्रोनॉमी व
अॅस्ट्रॉफिजिक्स या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, अॅस्ट्रॉनॉमी वा अप्लाइड मॅथमॅ
िटक्स यासारख्या विषयातील एमएस्सी वा इंटिग्रेटेड एमएस्सी यासारखी पदव्युत्तर पदवी कमीत कमी ५५%
गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
िवशेष सूचना : यािशवाय वरील िवषयांसह बीएस्सी, बीई-बीटेक झालेल्या पदवीधरांना इंटिग्रेटेड
एमएस्सी-पीएचडीसाठी प्रवेश घेता येईल, मात्र त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावणि्यात येईल. ही निवड
परीक्षा पुणे येथे १८ िडसेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणि्याचा उमेदवारांना प्राथमिक व अंतिम मुलाखतीसाठी बोलावणि्यात
येऊन त्याआधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अिधक मािहती व तपशलिासाठी इंटर युनिव्हर्सिटी
सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रॉिफजिक्स, पुणे येथे दूरध्वनी क्र. ०२०-२५६०४१०० वर संपर्क साधावा अथवा
सेंटरच्या http://www.nura.tifr.res.in/inat या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २२ सप्टेंबर २०१४ पर्यंत प्रवेश अर्ज पाठवावेत.