इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे दिल्ली, कोलकाता व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणा-या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध विषय व तपशील : इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असणा-या अभ्यासक्रमांमध्ये व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका व बँकिंग अँड इन्शुरन्समधील पदव्युत्तर पदविका या विशेष अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी सीएटी अथवा सीएमएटी यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
विशेष सूचना : जे विद्यार्थी यंदा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसले असतील व ज्यांनी वर नमूद केल्यापैकी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असेल तेसुद्धा या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक अर्जदारांमधून त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या www.imi.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने इन्स्टिट्यूट http://admissionhelp.com या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज पाठविण्यासाठी शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१४ आहे.
स्पेशल क्लास रेल्वे अॅपरेंटिसेस एक्झामिनेशन : २०१५
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे स्पेशल क्लास रेल्वे अॅपरेंटिसेस एक्झामिनेशन - २०१५ या निवड पात्रता परीक्षेद्वारा उमेदवारांची निवड करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी बीएस्सी पदवी गणित व रसायनशास्त्र अथवा भौतिकशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असावेत.
वयोगट : अर्जदारांचे वय १७ ते २१ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. ही परीक्षा १८ जानेवारी २०१५ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महारष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांकाच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ते १७ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी. अथवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upscoline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१४ आहे.
बारावी उत्तीर्णांसाठी सैन्यदलात संधी
आवश्यक पात्रता : उमेदवारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत.
वय १६.५ ते १९.५ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्य निवड मंडळातर्फे लेखी निवड परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना सैन्यदलात चार वर्षांच्या प्रशिक्षण तत्त्वावर नेमण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी यशस्वीपणे पूर्ण करणा-या उमेदवारांना सैन्यदलातर्फे अभियांत्रिकी विषयातील पदवी प्रदान करण्यात येऊन त्यांना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात लेफ्टनंट म्हणून रीतसर वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना सैन्यदलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे बढतीच्या संधी उपलब्ध होतील.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ ऑक्टोबर २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी (www.joinindianarmy.nic.in) संपर्क साधावा. शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१४ आहे.