आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Scholarship, Competative Exam By Dattaraya Ambulkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम: यूपीएससी परीक्षा–२०१५

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या भारतीय प्रशासकीय सेवा (प्राथमिक) परीक्षा २०१५ या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणा-या पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील : या स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि आस्थापनांमध्ये भरण्यात येणा-या जागांची संख्या ११२९ असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा २३ ऑगस्ट २०१५ रोजी देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद व ठाणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
प्राथमिक प्रशासन सेवेत निर्धारित गुणांक मिळविणा-या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मुख्य निवड परीक्षेला बोलावण्यात येऊन त्यानंतर त्यांची मुलाखत व वैद्यकीय तपासणीच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०१५ आहे.

एनर्जी मॅनेजर्स व एनर्जी ऑडिटर पात्रता परीक्षा
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत कार्यरत असणा-या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीतर्फे एनर्जी मॅनेजर व एनर्जी ऑडिटरसाठी आवश्यक घेण्यात येणा-या पात्रता परीक्षा २०१५ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
} सर्टिफाइड एनर्जी ऑडिटर्स पात्रता परीक्षा :
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार खालीलपैकी एक पात्रताधारक असावेत.
१) अर्जदार पदवीधर इंजिनिअर असावेत व त्यांना ऊर्जा क्षेत्रातील ऑपरेशन्स अँड मेंटेनन्सविषयक कामाचा ३ वर्षांचा अनुभव असावा अथवा
२) अर्जदार इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना ऊर्जा क्षेत्रातील ऑपरेशन्स अँड मेंटेनन्सविषयक कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा किंवा
३) अर्जदार इंजिनिअरिंगमधील पदवीधर व व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना उर्जा क्षेत्रातील ऑपरेशन्स अँड मेंटेनन्सविषय कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा.
} सर्टिफाइड एनर्जी मॅनेजर पात्रता परीक्षा :
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार वर नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेशिवाय खालीलपैकी एक पात्रताधारक असावेत.
१) अर्जदार इंजिनिअरिंगमधील पदविकाधारक असावेत व त्यांना ऊर्जा क्षेत्रातील ऑपरेशन्स अँड मेंटेनन्सविषयक कामाचा ६ वर्षांचा अनुभव असायला हवा अथवा
२) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र वा इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक व त्यांना ऊर्जा क्षेत्रातील ऑपरेशन्स अँड मेंटेनन्सविषयक कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा.
परीक्षेच्या तारखा आणि तपशील : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना राष्ट्रीय उत्पादकता परिषदेतर्फे पात्रता परिक्षेसाठी बोलावण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील ही पात्रता परीक्षा १९ व २० सप्टेंबर २०१५ रोजी देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
अर्जदारांच्या पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना राष्ट्रीय उत्पादकता परिषदेतर्फे संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
भविष्यकालीन संधी : ऊर्जा क्षेत्र हे सध्या झपाट्याने व वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याने एनर्जी मॅनेजर वा एनर्जी ऑडिटर यासारखी पात्रता-प्रमाणपत्रधारक इंजिनिअर्ससाठी विशेष करिअर संधी निश्चितपणे उपलब्ध होतील.
तपशील : ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीतर्फे घेण्यात येणा-या एनर्जी मॅनेजर व एनर्जी ऑडिटर या प्रमाणपत्र पात्रता परीक्षांच्या संदर्भात तपशिलासाठी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीच्या दूरध्वनी क्र. ०४४-२६२५४९०४ वर संपर्क साधावा अथवा ब्युरोच्या www.aipupe.org अथवा www.beeindia.in किंवा www.em-ea.org या संकेतस्थळांना भेट द्यावी.
शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०१५ आहे.