आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Scholarships By Dattatraya Ambulkar, Divya Marathi

शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा: नॅशनल वुमेन बायोसायंटिस्ट अवॉर्ड-2013

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणा-या डिपार्टमेंट ऑफ बायो-टेक्नॉलॉजीतर्फे महिला संशोधकांना देण्यात येणा-या बायोलॉजी आणि बायो-टेक्नॉलॉजी क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय संशोधनपर कामगिरीसाठी देण्यात येणा-या नॅशनल वुमेन बायोसायंटिस्ट अवॉर्ड-2003 साठी खाली नमूद केल्याप्रमाणे महिला संशोधकांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
पुरस्कारांची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत देण्यात येणा-या संशोधनपर पुरस्कारांची संख्या 3 आहे. यापैकी एक पुरस्कार वरिष्ठ महिला संशोधकासाठी तर 2 पुरस्कार कनिष्ठ महिला संशोधकांसाठी असून त्यासाठी अर्जदार महिला खालीलप्रमाणे पात्रताधारक असणे आवश्यक आहे.
नॅशनल वुमेन बायोसायंटिस्ट अवॉर्ड - वरिष्ठ श्रेणी - पुरस्काराची संख्या 1 : हा पुरस्कार महिला संशोधकांनी त्यांच्या शैक्षणिक संशोधनपर क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कामासाठी देण्यात येतो. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या बायोलॉजी वा बायो-टेक्नॉलॉजी क्षेत्रातील महिला संशोधकाला त्यांच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वरूपात 5 लाख रुपयांचा गौरव निधी देण्यात येतो.
नॅशनल वुमेन बायो - सायंटिस्ट अवॉर्ड - कनिष्ठ श्रेणी - पुरस्कारांची संख्या 2 : अर्जदार महिला संशोधकांनी बायोलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी, कृषी, बायो-मेडिकल, पर्यावरण संरक्षण- संवर्धन यासारख्या क्षेत्रात सुमारे 3 ते 5 वर्षे सातत्यपूर्ण संशोधनपर कामगिरी पार पाडलेली असावी.
वयोमर्यादा : उमेदवार महिलांचे वय 45 वर्षांहून अधिक नसावे.
पुरस्काराचा कालावधी व तपशील : योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिला संशोधकांना 5 वर्षे कालावधीसाठी वार्षिक 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती व सुवर्णपदक देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : पुरस्कारांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ बायो-टेक्नॉलॉजीच्या http://dbtindia.nic.in/index.asp
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज श्री. जे. के. डोरा, अंडर सेक्रेटरी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, रूम नं. 611, 6 वा मजला, ब्लॉक-2, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2014.
--------------------------------------------
जीआयआयएस ग्लोबल
सिटिझन स्कॉलरशिप

ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, सिंगापूर येथे शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वीत शिष्यवृत्तीसह शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणा-या जीआयआयएस ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिपसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी केंद्रीय शालांत परीक्षा अभ्यासक्रमांतर्गत 9 वी व 10 वीची परीक्षा इंग्रजी हा प्रमुख विषय घेऊन व कमीत कमी 90% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर एप्रिल 2014 मध्ये घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. संबंधित विद्यार्थ्यांची शालांत परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मे 2014 मध्ये मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची पुढील अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, सिंगापूर येथे 2014-2016 या सत्रांमध्ये 11 वीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल. योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कालावधीत विमान प्रवास शुल्काशिवाय 90,000 सिंगापूर डॉलर्सची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अधिक माहिती व तपशिलासाठी दूरध्वनी 758888680 वर संपर्क साधावा अथवा ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या www.globalindianschool.org
अथवा glisscholarships.org
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि प्रोग्रॅम मॅनेजर (जीआयआयएस स्कॉलरशिप्स), प्लॉट नं. डी-5, स्केटर 71, नोएडा (उप्र) या पत्त्यावर 19 मार्च 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
--------------------------------------------
विदेशातील पदव्युत्तर शिक्षणासाठी
के. सी. महिंद्र शिष्यवृत्ती

भारतीय विद्यार्थ्यांना विदेशातील विद्यापीठ व शिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी व अन्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी देण्यात येणा-या के. सी. महिंद्र शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तींची संख्या : या योजनेअंतर्गत देण्यात येणा-या शिष्यवृत्तींची संख्या 3 आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ वा शिक्षण संस्थेतून पदवी अथवा पदविका पात्रता कमीत कमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते अशा पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी विदेशी विद्यापीठ वा शिक्षण संस्थेत संबंधित विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 2014 च्या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतलेला असावा.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना जुलै 2014 मध्ये के. सी. महिंद्र एज्युकेशनल ट्रस्ट द्वारा मुंबई येथे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीची संख्या व तपशील : निवड झालेल्या 3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अधिक माहिती व तपशिलासाठी के. सी. महिंद्र एज्युकेशन ट्रस्टच्या http://www.kcmet.org/what-we-do-scholarship-grants.aspx
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज के. सी. महिंद्र एज्युकेशन ट्रस्ट, सिसिल कोर्ट, तिसरा मजला, रिगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग, मुंबई-400001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2014.
ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह विदेशात जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.
--------------------------------------------
इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च - मुंबईचे विशेष अभ्यासक्रम
इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट-रिसर्च, मुंबई येथे उपलब्ध असणा-या खालील विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एमएसबी (अर्थशास्त्र) : अर्जदार विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रासह बीए किंवा बीकॉम, सांख्यिकीमधील पदवी, विज्ञान अथवा पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी, एमई, एमटेक, एमबीए यासारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
एमफिल/ पीएचडी डेव्हलपमेंट स्टडीज : अर्जदारांनी अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित, पर्यावरण विज्ञान, एमई, एमटेक, एमबीए यासारखी पात्रता कमीत कमी 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा मुंबईसह निर्धारित परीक्षा केंद्रांवर 27 एप्रिल 2014 रोजी घेण्यात येईल. अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
पाठ्यवृत्तीचा कालावधी व तपशील : एमफिलसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी दरमहा 17,000 रु. तर संशोधनपर पीएचडीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे कालावधीसाठी दरमहा 26,000 रु. पाठ्यवृत्ती स्वरूपात देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 500 रु.चा ‘आयजीआयडीआर’च्या नावे असणारा व मुंबई येथे देय असणारा डिमांडड्राफ्ट विनंतीअर्जासह इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चच्या www.igidr.ac.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि स्टुडंट्स ऑफिसर, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, संतोषनगर, गोरेगाव (पूर्व), मुंबई-400065 या पत्त्यावर 14 मार्च 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
--------------------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियोजित परीक्षा-2014
परीक्षेचा तपशील - परीक्षेची प्रस्तावित तारीख - अर्ज करण्याची शेवटची तारीख
* इंडियन इकॉनॉमिक अँड 24 मे, 10 मार्च इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस एक्झामिनेशन
* जिऑलॉजिस्टस् एक्झामिनेशन 24 मे 17 मार्च
* सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स 1 जून, 31 मार्च असिस्टंट कंपाऊंट एक्झामिनेशन
* इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन 20 जून, 14 एप्रिल
* कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 22 जून, 21 एप्रिल
* सेंट्रल आयर्ड पोलिस फोर्सेस एक्झामिनेशन 13 जुलै, 5 मे
* सिव्हिल सर्व्हिसेस 24 ऑगस्ट, 16 जून
* इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस एक्झामिनेशन 24 ऑगस्ट, 16 जून
* नॅशनल डिफेंस अकादमी 28 सप्टेंबर, 21 जुले व नेव्हल अकादमी एक्झामिनेशन
* इंडियन फॉरेन सर्व्हिसेस एक्झामिनेशन 22 नोव्हेंबर सूचित करण्यात येईल
* सिव्हिल सर्व्हिसेस (मेन) एक्झामिनेशन 14 डिसेंबर सूचित करण्यात येईल.
विशेष सूचना : वरील स्पर्धात्मक निवड परीक्षा या निर्धारित शहरातील परीक्षा केंद्रांवर राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येतात.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या वेळोवेळी प्रकाशित होणा-या संबंधित जाहिरातींवर लक्ष ठेवावे अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in.
या संकेतस्थळाला भेट द्यावी.