आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Science Education By Mohan Dwanna, DIvya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विज्ञान शिक्षण: साबणाचा टिकाऊ फुगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साबणाचा फुगाच तो कितीसा टिकणार असा प्रश्न प्रत्येकास पडतो. कधीकधी तुम्ही बनवलेला साबणाचा फुगा जमिनीवर येताच फुटून जातो. साबणाचा फुगा एवढा अल्पजीवी कसा? हे समजण्याच्या आधी आपण साबणाचा फुगा कसा बनतो हे पाहूया. साबणाची फिल्म तीन थरांनी बनलेली असते. पाण्याच्या पातळ थराच्या दोन्ही बाजूस साबणाच्या दोन फिल्म असे तीन थरांचे सँडविच म्हणजे साबणाची फिल्म. प्रत्येक फिल्म लक्षावधी रेणू एकत्र येऊन बनलेली असते. आजच्या प्रयोगात आपण अधिक काळ टिकणारा साबणाचा फुगा बनवायचा आहे.
प्रयोगाचे साहित्य एक लहान कप, लिक्विड सोप, ग्लिसरिन, साखर, एखादा रिकामा प्लास्टिकचा डबा, चहाचा चमचा व एक मोठा चमचा. जरा बळकट दोरी किंवा दोन तीन फूट लांब इलेक्ट्रिक वायर, दोन अडीच फूट लांबीची सहज पकडता येईल एवढी दांडी. अंगणात किंवा मोकळ्या बाहेरील जागेत हा प्रयोग आणखी मजा आणेल. वर सांगितलेले साहित्य तुमच्या मित्रानापण आणण्यास सांगा. एकत्र आल्यानंतर कोणाचा फुगा किती वेळ न फुटता टिकतो किंवा कोणाचा फुगा अधिक मोठा होतो याची स्पर्धासुद्धा तुम्हाला घेता येईल. एका मगमध्ये गरम पाणी घ्या त्यात अर्धा कप लिक्विड सोप, पाव कप ग्लिसरीन, पाव कप साखर घाला व मिश्रण एकजीव होऊद्या. हे मिश्रण तासभर तसेच राहूद्या. अधिक मिश्रण हवे असल्यास मिश्रणाचे प्रमाण दुप्पट करा. तुम्ही आणलेल्या काठीच्या टोकास वायर गुंडाळून त्याचे लूप बनवा.
तुम्ही बनवलेले मिश्रण एका लहान टबमध्ये ओता. त्यात वायर लूप बुडवा व काठीचा हँडलसारखा वापर करून लूप बाहेर काढा. मिश्रणाची फिल्म वायर लूपमध्ये तयार होईल. या फिल्ममध्ये जोरात फुंका किंवा हवेमध्ये लूप जोरात आडवे फरिवले म्हणजे फुगा तयार होईल. जेवढ्या आकाराचे लूप त्याहून मोठा फुगा तयार होईल. लूपचा आकार कसाही असला तरी बनवलेला फुगामात्र गोल आकाराच कसा होत असेल बरे? तुम्ही नेहमीचे साबणाचे फुगे स्ट्रॉच्या साहाय्याने बनवता. आता या मिश्रणाचे फुगे स्ट्रॉच्या साहाय्याने फुंकून बनवा. या मिश्रणापासून बनलेले फुगे अधिक वेळ हवेत तसेच राहतात. स्टॉप वॉचच्या साहाय्याने कोणाचा फुगा किती वेळ राहतो हे पाहा. यापासून बनवलेले लहान फुगे बराच वेळ तरंगत राहतात. असे कां होत असेल?
... म्हणून फुगे गोल
साध्या पाण्यात साबण घालून त्याच्यापासून बनवलेल्या फुग्याच्या फिल्ममधील पाण्याची वाफ लवकर होते. त्यामुळे फुगा लवकर फुटतो. ग्लिसरीन साखर घालून आपण बनवलेल्या मिश्रणाच्या फुग्यातील पाणी लवकर उडून जात नाही. मिश्रणाचा पृष्ठ्ताण वाढतो व फुगा टिकाऊ बनतो. फुग्याचा आकार गोल बनणे म्हणजे कमीत कमी जागा व्यापणे. असा आकार बनण्यास कमीत कमी ऊर्जा लागते. म्हणून साबणाचे फुगे नेहमी गोल आकाराचे बनतात.