आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: अफलातून कल्पना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जे विमान तुम्ही बनवणार आहात त्याच्या डिझाइनबद्दल १९६७ मध्ये सायंटिफिक अमेरिकन या प्रसिद्ध विज्ञान मासिकाच्या वतीने पहिले पारितोषिक मिळाले आहे. या विमानास नेहमीसारखे टोकदार पंख नसल्याने याला कमीत कमी प्रतिरोध होतो. अचूक फेकता आल्याने हे अधिक सफाईदारपणे हवेत अंतर कापत जाते. या हवेत उडणा-या वस्तूचे नाव आहे "हूपस्टर'.
कमीत कमी साहित्यातून हे बनवता येते. साहित्य एक सरळ स्ट्रॉच्या आकाराची कागदी पुंगळी, स्ट्रॉ सुद्धा चालेल फक्त प्लास्टिकची स्ट्रॉ लगेच वाकडी होते. त्याऐवजी थोडी कडक सरळ कागदी किंवा प्लास्टिकची नळी. ए4 साइजचा कार्डबोर्ड. ए4 साइज म्हणजे झेरॉक्स प्रत ज्या कागदावर नेहमी काढली जाते तो आकार. कार्डबोर्ड कोठल्याही रंगाचा एकीकडे लिहिलेला पाठकोरा असला तरी चालेल. फेव्हिकॉल, सेलो टेप व कात्री. ए4 साइजच्या कार्डबोर्डापासून रुंदीच्या बाजूने एक व लांबीच्या बाजूने एक २.५ सेमी रुंदीच्या अशा दोन पट्ट्या कापून घ्या. आता तुमच्याकडे दोन पट्ट्या होतील एक कमी लांबीची व दुसरी अधिक लांबीची. पट्टीची दोन्ही टोके एकत्र आणून त्याचे दोन बांगडीसारखी दोन वर्तुळे बनवा. टोकास थोडे फेव्हिकॉल लावून टोके चिकटवून घ्या. स्ट्रॉच्या पुढील टोकापासून दोन सेमी अंतरावर पहिले वर्तुळ ठेवा. वर्तुळ व स्ट्रॉवर चिकटपट्टी लावा. शक्यतो जेथे पट्टीची टोके एकत्र चिकटवलेली आहेत त्याखाली स्ट्रॉ चिकटपट्टीने लावल्यास तुमचे यंत्र अधिक सफाईदारपणे हवेत उडेल. आता दुसरे वर्तुळ स्ट्रॉच्या मागील टोकाच्या एक तृतीयांश बाजूचा भाग सोडून स्ट्रॉ व वर्तुळ चिकटपट्टीने चिकटवा. पहिले वर्तुळ पुढे व दुसरे त्याच्या मागे असायला हवे. दोन्ही वर्तुळांच्या मध्ये असलेली स्ट्रॉ हातात धरून हुलाहूप फेकता येते.

हुलाहूप फेकण्यासाठी जेथे फार जोराचा वारा येणार नाही अशी जागा हवी. बॅडमिंटन हॉल, मंगल कार्यालय, शाळेतील सभागृह, मोठी खोली, बिल्डिंगमधील मोकळा पार्किंग लॉटमध्ये जा. हुलाहूप फेकताना एकदा स्ट्रॉ वर्तुळाच्या वर एकदा खाली दोन्ही बाजूने प्रयत्न करा. फक्त फेकण्याची दिशा लहान वर्तुळ पुढे व मोठे मागे हवे.

अतिशय दिमाखदारपणे व संथपणे हुलाहूप हवेत तरंगत जाईल. जेवढे मित्र असतील तेवढी हुलाहूप बनवून त्यांची स्पर्धा घेऊन पाहा कोणाचे हुलाहूप अधिक अंतर कापते. हुलाहूप ग्लायडरच्या तत्त्वानुसार तरंगते. पहिल्या वर्तुळाने कापलेल्या हवेचा प्रतिरोध कमी असतो. त्यामुळे झालेल्या हवेच्या कमी प्रतिरोधातून दुसरे वर्तुळ जाते ते हुलाहूपला तरंगण्यास मदत करते.