हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. काही वेळा त्वचेला भेगा पडतात त्यामुळे त्वचेमध्ये दाह होतो (एक्झेमा). असे असले तरी त्वचेची व्यवस्थित निगा राखल्यास त्वचेशी निगडित सर्व समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
अ) त्वचा स्वच्छ करण्यासाठी
आ पापल्या त्वचेनुसार प्रत्येकाने क्लिन्सर वापरावा. कोरड्या त्वचेसाठी सौम्य क्लिन्सर, तेलकट त्वचेसाठी सॅलिसायक्लिक किंवा टीट्रीच्या तेलाचा बेस असलेले क्लिन्सर आणि सामान्य त्वचेसाठी योग्य पीएच प्रमाण असलेले सामान्य क्लिन्सर वापरावे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची त्वचा जाड असल्याने पुरुषांनी तीव्र क्लिन्सर वापरावे. अंघोळ करताना साबणाच्या ऐवजी शॉवर जेल वापरावे. कोमट पाण्याने अंघोळ करण्याचा प्रयत्न करा. अंघोळ केल्यानंतर चांगल्या दर्जाच्या बॉडी लोशनने तुमची त्वचा आर्द्र करा. अंघोळीच्या पाण्यात आवश्यक ते तेलही घालण्यास हरकत नाही.
ब) त्वचेला टोन करणे
टो नर अल्कोहोलमुक्त असावे. पुरुष आणि स्त्रियांसाठी एकच टोनर असू शकते. त्वचेला आर्द्र म्हणजेच ओलसर ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. त्वचा तेलकट असलेल्यांनी जेलचा बेस असलेले मॉइश्चरायझर वापरावे आणि त्वचा कोरडी असलेल्यांनी क्रीमचा बेस असलेले मॉइश्चरायझर वापरावे. पुरुषांनी दाढी केल्यानंतर चांगल्या दर्जाचे लोशन लावावेत आणि त्यानंतर सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीनचा बेस असलेल्या लिप बामने दररोज तुमचे ओठ ओलसर ठेवा.
क) असे असावे सनस्क्रीन
स नस्क्रीन चिकट नसावे, पुरळ येणारे नसावे आणि यूव्हीए आणि यूव्हीबी अशा दोन्हीपासून संरक्षण करणारे असावे. तुम्ही चार भिंतींच्या आत असाल तरीही सनस्क्रीन वापरावे आणि ते दर चार ते सहा तासांनी वापरावे.
१. खूप पाणी प्या
खूप पाणी पिऊन तुमच्या त्वचेला आतून सजल (हायड्रेट) करा. तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्यासोबत पाण्याची बाटली बाळगा. खूप थंडी असेल तर आयुर्वेदिक चहा उत्तम. तुमच्या त्वचेला लगेचच एक प्रकारचा निरोगी उजळपणा येईल. त्यामुळे पेय प्या आणि तुमच्या त्वचेला तहानलेली ठेवू नका. उठल्या उठल्या दोन ग्लास पाणी प्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील दूषित घटक बाहेर पडतील आणि तुमची त्वचा आर्द्र आणि तेजस्वी राहायला मदत होईल. हे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही लागू आहे.
२. तुमच्या कामाचे ठिकाण आर्द्र ठेवा
एक चांगला पर्याय म्हणजे हवेत आर्द्रता निर्माण करा. आर्द्रता निर्माण करणारी यंत्रणा तुमची त्वचा कोरडी अथवा भेगा असलेली करणार नाही तर ती मऊ ठेवण्यास मदत करेल. तुम्ही हे उपकरण स्थानिक औषधाच्या दुकानातून घेऊ शकता.
३. त्वचेचा थर काढणारी क्रीम
तुमच्या त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी चांगला बॉडी स्क्रब किंवा एक्सफॉलिअन्ट मदत करू शकतो. आठवड्यातून एकदा हे एक्सफोलिअन्ट तुमच्या क्लीन्सिंग क्रीमसोबत वापरा. तुम्हाला ताजेतवाने वाटेलच. त्याचप्रमाणे तुमची त्वचा जुन्या कोरड्या पेशींपासून मुक्त होईल.
४. तेलाचा बेस असलेले मॉइश्चरायझर : तुमच्या त्वचेची आर्द्रता निघून जाण्यापासून हे बचाव करेल. मलमाच्या रूपात जे मिळतं, त्याची निवड करा कारण त्यात सुमारे ८० टक्के तेल असेल. क्रीम किंवा लोशनमुळे त्वचा आर्द्र किंवा मऊ होण्याऐवजी कोरडी होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी, तुमची त्वचा कशीही असली तरी तेलरहीत उत्पादने वापरण्याचा हिवाळा हा ऋतू नाही. ती उत्पादने नैसर्गिक तेल शोषून घेतात आणि तुमची त्वचा हिवाळ्यात निस्तेज दिसते आणि नेमके याच काळात तुमच्या त्वचेला अधिक तेलाची गरज असते.
हे पण करुन पहा
५. सनस्क्रीन : केवळ उन्हाळा सरला असला म्हणून सनस्क्रीन वापरणं बंद करू नका. घराबाहेर पडण्यापूर्वी १५ किंवा अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन त्वचेवर लावा. त्वचेचा बचाव होईल. त्याचप्रमाणे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर एकत्र असलेले उत्पादन निवडा.
६. हातमोजे आणि स्टॉकिंग्ज : हे अत्यंत सहज करण्याजोगे आहे आणि तेवढेच परिणामकारक आहे. तुमचे हात हिवाळ्यात उघडे का ठेवावेत. तुमच्या त्वचेला फार त्रास देणार नाहीत अशा कापडाचे हातमोजे घ्या. तुम्हाला लोकरीची अॅलर्जी असेल तर त्याखाली सुती हातमोजे घाला. हात कोरडे आणि गरम राहतील.
७. ब्लोअर टाळा : ब्लो ड्रायर हे हिवाळ्यात तुमच्यासाठी चांगले नाहीत. हिवाळ्यात केस मोकळे सोडा किंवा वेव्ही स्टाईल ठेवा. गरम हवा तुमचा टाळू कोरडा करते आणि त्यामुळे तेथील त्वचेला खाज येऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात ब्लो ड्रायरला दूरच ठेवा.
८. ओठ खाणे थांबवा : तुम्ही जर असे करत असाल तर तुमच्या ओठांना अजून भेगा पडतील. लिप बाम नेहमी जवळ बाळगा आणि ओठ कोरडे झाले आहे, असे वाटल्यास तो लावा.
९. कढत पाण्याने अंघोळ करणे टाळा : कढत पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील आर्द्रता निघून जाईल आणि तुमची त्वचा अजून खरखरीत आणि निस्तेज होईल. अंघोळीसाठी नेहमी कोमट पाणी वापरा आणि अंघोळीचे पाणी अधिक चांगले करायचे असेल तर त्यात काही थेंब बदामाचे तेल टाका. खूप जास्त वेळ अंघोळ करू नका. हिवाळ्यात खूप काळ गरम पाण्याने अंघोळ करणे बरे वाटत असले तरी तुमच्या त्वचेचा वरचा थर असतो ज्याला अॅसिड मॅन्टल असे म्हटले जाते. हा थर म्हणजे तुमची त्वचा आणि बाह्य घटक यांच्यात एक नैसर्गिक बचावात्मक अडथळा असतो.
१०. चहा आणि पाणी : गरम चहाचा आणि कॉफीचा घोट घ्या आणि तुमच्या शरीरातील अँटिऑक्सिडन्ट पातळी वाढवा. कॉफीच्या बिया या फ्लॅव्होनॉइडचा या अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडन्टचा नैसर्गिक स्रोत असतात. हिवाळ्यातील थंड संध्याकाळी गरम कोको प्यायल्याने तुम्हाला ऊबदार वाटेल, चांगले वाटेल आणि तुमच्या त्वचेला एक निरोगी उजळपणा मिळेल.
११. केसांना शाम्पूनंतर कंडिशनर लावा: केसांना रंग लावायचा असेल तर ब्रँडेड उत्पादने वापरा ज्यांच्यामुळे अॅलर्जी होत नाही. कारण अॅलर्जीमुळे कंड येऊ शकते आणि केसही गळू शकतात. केसांची योग्य ठेवण ठेवा. स्ट्रेटनिंग आणि केसांवर रासायनिक प्रक्रिया या काळात शक्यतो करू नका.
(लेखक हे कॉस्मेटिक सर्जरी ऑफ इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक आणि कॉस्मेटिक सर्जन आहेत.)