आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवन करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे!!!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीविधानसभा निवडणुकांच्या घोषणेबरोबर भाजपने किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्याने फेसबुकवर प्रचाराला एकाएकी ऊत आला. आता सामना केजरीवाल विरुद्ध किरण बेदी असा स्पष्ट झाल्याने बहुसंख्य पोस्ट किरण बेदींच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-या होत्या, तर लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवातून गलितगात्र झालेले काँग्रेसचे फेसबुक पेज मात्र एकदम ताजेतवाने दिसायला लागले. काँग्रेसने भाजपमध्ये आयाराम उमेदवारांची टिंगल उडवण्यास कमी केले नाही.

तर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर भाजप व किरण बेदींवर थेट हल्ला चढवला. आपला राजकारणात येण्याचा हेतू शुद्ध असल्याचा त्यांचा दावा होता..

किरण बेदी यांना जाहीरपणे चर्चेला येण्याचे आमंत्रण केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिले.
हे आमंत्रण आल्यानंतर किरण बेदी यांनी केजरीवाल यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले, असे मेसेज फिरू लागले.

भाजपनेही केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. पक्षाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी - ‘Delhi battle is between the Iron Lady (Kiran Bedi) & I-Run man (Kejriwal), a man who is always on the run. AAP believes in 3Ds - Drama, Dharna & Debate. BJP stands for Development, Democracy & Delivery’, अशी पोस्ट प्रसिद्ध केली.
दुसरीकडे ‘फेकूबुक’ या नरेंद्र मोदींवर टीका करणा-या पेजवर किरण बेदींसंदर्भातील एक पोस्ट लक्षवेधी होती. रिपोर्टर किरण बेदींना विचारतो, ‘बीजेपी जॉइन करने के बाद आप क्या करेंगे?’
किरण बेदी म्हणतात – ‘हवन करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे!!!’
या पोस्टयुद्धात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व फेसबुकवर सक्रिय असलेले काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांनी ‘विजय गोयलजी, जगदीश मुखीजी, हर्षवर्धनजी, सतीश उपाध्यायजी काश आप में मदन लाल खुरानाजी का साहस होता! क्या इस निर्णय में मोहन भागवतजी की सहमति है?’ अशी पोस्ट टाकून भाजपच्या दिल्लीतल्या जुन्या जाणत्या उमेदवारांची टर उडवली. दिग्विजय सिंग व अण्णा हजारेंचे प्रेम सर्वश्रुत आहे. किरण बेदी यांनी भाजपमध्ये सामील होऊन अण्णांना अडचणीत आणल्याबद्दल दिग्विजय सिंग यांनी सहानुभूती व्यक्त केली.