आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध! निषेध!! निषेध!!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात सोशल मीडियामध्ये भारतातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मोठ्या प्रमाणात निषेध पाहायला मिळाला. कारण होते, नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाने केलेले पक्षपाती वृत्तांकन. दोन आठवडे होऊनही भूकंपग्रस्त नेपाळ स्वत:ला सावरू शकलेला नाही. त्यात केवळ भारतानेच नेपाळला मदत केली व ती म्हणजे, मोदी सरकारच्या तत्परतेमुळे अशा स्वरूपाच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडिया देत असल्याने नेपाळवासीय भडकले. भारतातल्या पत्रकारांची पत्रकारिता असंवेदनशील व आत्यंतिक देशाभिमानी असल्याचा आरोप करत नेपाळवासीयांनी ३ मे रोजी #GoHomeIndianMedia या नावाचा ट्विटर ट्रेंड सुरू केला (योगायोगाने हा दिवस जागतिक पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो)
आणि बघता बघता हजारो नेपाळवासीयांनी भारतीय मीडियाच्या पक्षपाती वृत्तांकनाचा निषेध करण्यास सुरुवात केली. सुनीता शाक्य या नेपाळी लेखिकेने सीएनएन या वृत्तवाहिनीवरील एका ब्लॉगमध्ये भारतीय मीडियाच्या कार्यपद्धतीची उलटतपासणी घेतली. बहुसंख्य भारतीय पत्रकार बाइट घेण्याच्या स्पर्धेत मदतकार्यात अडचणी निर्माण करत होते. नेपाळची आर्मी, पोलिस अहोरात्र राबत असताना ती दृश्ये न दाखवता केवळ भारतीय लष्कर काम करत असल्याचा प्रचार करण्यात येत होता. आपण एक माणूस आहोत; नंतर पत्रकार, असा साधा सामाजिक संकेतही भारतीय पत्रकारांकडून पाळला गेला जात नसल्याचे त्या म्हणतात. एका महिलेचा मुलगा ढिगा-याखाली अडकला असताना व तो कदाचित मरण पावल्याची
शक्यता असताना ‘सब से तेज’चा दावा करणा-या एका टीव्ही न्यूज चॅनेलचा एक पत्रकार ‘आप को क्या महसूस होता है’, असा प्रश्न विचारू शकतो, यातून पत्रकारितेचा स्तर किती खालावला आहे, हे दिसून येते, असे सुनीता शाक्य म्हणतात. #GoHomeIndianMedia या ट्विटर ट्रेंडवर जगभरातून समर्थन आल्यानंतर त्याला प्रतिवाद देण्याचा प्रयत्न भारतातून सुरू झाला, पण
नेपाळवासीयांनी भारतीय मदतकार्याची दुसरी (काळी?) बाजू दाखवण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने आपल्या हेलिकॉप्टरमधून मदतकार्याऐवजी पत्रकारांची फौज आणली, असा आरोप सुरू झाला. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर पहिल्या दिवशी भारताने मदतकार्य म्हणून केवळ अडकलेल्या भारतीय पर्यटकांना मायदेशी नेले. त्यांनी ढिगा-याखाली गाडले गेलेल्या लोकांची सुटका करायला हवी होती, असे लोक म्हणत होते.
बलम गडकरी
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी लोकांना हसवण्याची प्रतिज्ञा केली आहे की काय, असे वाटू लागलेय… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दिल्लीच्या बंगल्यातल्या झाडांना पाणी न घालता आपले स्वत:चे साठवलेले मूत्र पोषणद्रव्य म्हणून झाडांना घालत असल्याचे वक्तव्य नागपूरमध्ये केले आणि फेसबुक-ट्विटर, व्हॉट्सअप विनोदांना उधाण आले. ट्विटरने तर #GadkariLeaks या ट्रेंडखाली गडकरींच्या मताची रेवडी उडवली. त्यातल्या या काही मजेशीर कॉमेंट …
- मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा हा एक भाग असावा. एक तर लोकांवर करांचा बोजा नाही व दुसरीकडे दिल्लीकरांना सगळीकडे हिरवेगार
बगीचे दिसून येतील.
- अगर गडकरीजी को शुगर हो तो उनके बगीचे के करेले भी मीठे होंगे क्या?
- पंतप्रधान कार्यालयात अत्यंत महत्त्वाच्या सूत्रांकडून अशी माहिती आहे की, शनिवारी जेटली यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या खान्यामध्ये
गडकरी यांच्या बंगल्यातील भाजी वापरली होती…
- बलम गडकरी जो तूने ऐसी मारी कि सीधी साधी गोभी गुलाबी हो गयी…
बातम्या आणखी आहेत...