आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Systematic Investment Plan By Sunil Chitale

दूध घरोघरी जाऊनच विकावे लागते!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या लेखात आपण SIP ची सवितस्तर माहिती घेतली. मंडळी, म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंडाची SIP ही आज काळाजी गरज आहे. महागाई + आयकर यापेक्षा जास्त परतावा तुम्हाला पाहिजे असेल तर म्युच्युअल फंडाशिवाय पर्याय नाही आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत जी काही जोखीम आहे ती समूळ नष्ट करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे SIP. तेव्हा ज्या गुंतवणूकदारांनी अजूनही एकही SIP सुरू केली नाही त्यांनी आजच, होय आजच इतर सर्व कामे बाजूला सारून, अगदी वेळ नसेल तर सुटी घेऊनसुद्धा SIP सुरू करावी. अर्थात मलाही हे माहीत आहे, की बरीचशी मंडळी अशी आहेत त्यांना कितीही सांगायचा प्रयत्न करा तरी ते आपला परंपरागत बँक FD चा मार्ग कधीच सोडणार नाहीत. 20 व 30 % आयकरदात्यांनो, चुकूनही बँकेत FD करू नका. तुम्हाला उणे परतावा मिळतो आहे कारण FD वर तुम्हाला मिळणारे व्याज महागाई व आयकरापेक्षा नक्कीच कमी आहे.

ज्यांनी माझी ही लेखमाला वाचली आणि म्युच्युअल फंडाबद्दल माझा आग्रह पाहिला आणि तरीही ज्यांच्या मनात शंका आहेत, भीती आहे त्यांना माझी अगदी आग्रहाची विनंती. तुमची क्षमता भलेही १०,००० रुपये दरमहा SIP ची आहे; परंतु भीतीपोटी तुम्ही SIP च्या मार्गावर जाण्यास तयारच नाहीत त्यांनी १,००० रु. महिना SIP किमान १५ वर्षंासाठी आजच सुरू करावी. यामुळे दोन गोष्टी होतील. एक तर १५ वर्षांनंतर तुम्हाला SIP चे आकर्षक Returns हमखास दिसतील आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना गुंतवणुकीच्या क्षेत्रातील एक उत्तम मार्ग सापडलेला असेल. १५ वर्षांनंतर तुम्ही नक्कीच असे म्हणाल की, १०,००० रु. महिन्याची SIP केली असती तर बरे झाले असते.

गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग आम्ही आपल्याला दाखवतो आहे, त्यावरून चालायचे की नाही हे प्रत्येकाला ठरवायचे आहे. कारण प्रश्न आहे विश्वासाचा! दुर्दैवाने चितळेंवर आपला विश्वास बसत नाही, त्याच्या सांगण्यावर १,००० रु. महिन्याचीसुद्धा SIP आपण करत नाही आणि लाखो रु. कुठे गुंतवितो? तर KBC मध्ये!
एकदा म्युच्युअल फंडच्या योजनांच्या प्रचारासाठी आम्ही एका लहानशा गावात गेलो होतो. आम्ही आमच्या योजनांची माहिती देऊन, म्युच्युअल फंड गुंतवणूक ही किती चांगली आहे हे त्यांना पटवून देत होतो. गावातीलच एकाने प्रश्न केला, की तुमची योजना एवढी चांगली आहे तर तुम्ही एवढ्या दूर कशाला आलात योजना सांगायला? तुमच्याच गावात तुमच्या ऑफिसमध्ये या योजनांसाठी लोकांनी गर्दी करायला पाहिजे! त्यांचा प्रश्न योग्यच होता. त्यावर आम्ही त्याला एक उदाहरण दिले. त्यांना म्हटले, तुमच्या गावात दूध मिळते का? ते हो म्हणाले. नंतर विचारले, दारू मिळते का? ते म्हणाले हो-हो दारूपण मिळते. मग आम्ही प्रश्न केला दूध चांगले की दारू? तो म्हणाला, काय साहेब गंमत करता - केव्हाही दूध चांगले! मग त्याला म्हटले तुम्हीच बघा, दूध चांगले असूनही दूधवाल्याला घरोघर जाऊनच विकावे लागते ना? दारूचे काय? वाईट असूनही तिथे रांगा लागतात! अगदी तसेच गुंतवणुकीचे आहे, आम्ही कितीही डोकं फोडून तुम्हाला म्युच्युअल फंड व SIP चे गुणदर्शन केले तरी बरीचशी मंडळी SIP सुरू करणार नाहीच. पुढच्या KBCची वाट पाहतील.

तर मंडळी असे करू नका. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच्या SIP इतका दुसरा कोणताही उत्तम पर्याय नाही. तेव्हा अजिबात वेळ दवडू नका. व्यापारी व ज्यांना पुढे पेन्शन मिळणार नाही असा नोकरदार वर्ग अशा सर्वांनी आजच SIP सुरू करा आणि निवृत्तीच्या काळापर्यंत किमान १५ वर्षे तरी भरा. १५ वर्षांनंतर माझी आठवण तुम्हाला नक्कीच होईल.
लवकर सुरुवात हा म्युच्युअल फंड SIPचा महामंत्र आहे. लवकर म्हणजे केव्हा? नोकरीच्या पहिल्या महिन्यापासून! समजा 25व्या वर्षी कोणी नोकरीला लागले आणि ६०व्या वर्षी निवृत्त झाले तर ३५ वर्षांचा काळ होतो. या ३५ वर्षांत ५,००० रुपयांची SIP केली तर कशी रक्कम जमा होणार आहे ते पुढच्या तक्त्यामध्ये कळेल.

रक्कम १०% दराने १२% १५%
५,०००x २१,००,००० १,८७,३८,७०० ३,१४,६०,८००
४२० महिने (एकवीस लाख) (एक कोटी (तीन कोटी चौदा
सत्याऐंशी लाख लाख साठ
अडतीस हजार सातशे) हजार आठशे)
अखेरीस हातात िमळतील ७,०५,६०,१००
(सात कोटी पाच लाख साठ हजार शंभर रु.)

ज्या योजनांना आज १५ वर्षं पूर्ण झालेली आहेत त्या सर्व योजना १५ ते २५% चा परतावा देत आहेत. मी मुद्दामच १० ते १५% परतावा मिळाला तर किती पैसे मिळतील त्याचे उदाहरण दिले आहे. आता हीच गुंतवणूक २५व्या वर्षी न करता ३५व्या वर्षी म्हणजे १० वर्षे उशिरा केली तर काय होते याचे उदाहरण पाहू.
रक्कम १०% १२% १५%
५५,०००x १५,००,००० ६५,९६,१०० ९२,९०,९००
३०० महिने (पंधरा लाख रु.) (पासष्ट लाख (ब्याण्णव लाख
शहाण्णव नव्वद हजार
हजार शंभर) नऊशे)
अखेरीस हातात िमळतील १,५८,६६,१००
(एक कोटी अठ्ठावन्न लाख सहासष्ट हजार शंभर रु.)
बघा मंडळी, १० वर्षांच्या उशिरामुळे तुमचे नियोजन कसे चौपट होते! पहिल्या तक्त्याप्रमाणे परतावा पाहिजे असेल तर ५,००० रु. महिन्याऐवजी २०,००० रु. महिना गुंतवणूक करावी लागेल. बघा पटतंय का!