आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Tourist Guide By Vilas Gavraskar, Divya Marathi

करिअर: टुरिस्ट गाइड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यटकांना पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या टुरिस्ट गाइडचे महत्त्व आपण नाकारून चालणार नाही. पर्यटन हा मोठा उद्योग होऊ लागल्यामुळे पर्यटन क्षेत्रातील संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. पर्यटकांशी संवाद साधणं, उत्साहाने त्यांच्या शंकाकुशंकांचे निरसन करणं, आपल्या देशाविषयी, राज्यांविषयी इत्थंभूत माहिती देणं इ. कामे गाइडला करावी लागतात. इथे आवश्यक त्या पर्यटनस्थळाविषयी पूर्ण माहिती, तिथली संस्कृती, कला, हवामान
एकंदरीत भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास गाइडला असणं अपेक्षित असतं. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, बोलका स्वभाव, संवाद साधण्याची कला, वाक्चातुर्य, हजरजबाबीपणा, नेतृत्व आणि जमावाला खिळवून ठेवण्यासाठी अभनिय, नकला किंवा तत्सम कलांचा कल्पकतेने वापर या काही गुणांमुळे टुरिस्ट गाइड खूप छान कमाई करू शकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत स्वत:ला सिद्ध करता येत नाही. धो धो
मार्ग पडत नाहीत पण जर वरील गुण अंगी असतील तर करिअरचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही हे नक्की. कारण इथे विविध राज्यांमध्ये, देशामध्ये कदाचित परदेशातही वारंवार जाण्याची संधी मिळते. त्या दृष्टीने भरपूर अनुभव मिळतो. ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक तसेच खाद्य संस्कृती आणि वातावरण बघायला मिळतं, अनुभवायला मिळते. त्या दृष्टीने भरपूर प्रगती होऊ शकते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बी.ए. करताना कमीपणा वाटतो. अशांसाठी ही एक आनंददायक गोष्ट आहे. इतिहास हा विषय घेऊन बी.ए. केल्यास या क्षेत्रामध्ये
निश्चितच फायदा होऊ शकतो किंवा ज्यांचा हा विषय नव्हता असे विद्यार्थी डिप्लोमा इन आर अॅण्ड कल्चर असा नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट, दलि्लीतर्फे अल्पावधीचा कोर्स करू शकतात. कुठल्याही शाखेचा पदवीधर पुढे टूर्स अँड ट्रॅव्हल्समधील पदव्युत्तर कोर्स देखील करू शकतात. इथे मात्र टुरिस्ट गाइड बरोबरच टूर कंडक्टर किंवा टूर ऑपरेटर, टूर मॅनेजरसारख्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट किंवा हॉटेल मॅनेजमेंटमधील पदवी सुद्धा टुरिस्ट गाइडसाठी उपयुक्त ठरू शकते. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाची इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टूरिझम (आय.आय.टी.टी.) सारखी संस्था सुद्धा ह्या संबंधांतील कोर्स चालवते. इथे मात्र प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मान्यताप्राप्त विद्यापीठातून टुरिझम / हॉस्पिटॅलिटीची तीन वर्षांची बॅचलर्स पदवी असल्यास उत्तम किंवा इन्स्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजीमधील डिप्लोमा इन आर्कियोलॉजी केल्यास या क्षेत्रामध्ये येण्याचे प्रमाण खूप सोपे होऊ शकते. देश-विदेशातील अनुभव, विविध प्रकारचा अभ्यास करण्याची उत्तम संधी
मिळण्याचं हे क्षेत्र आहे.

संधी इथे मुबलक
आपल्या देशाची प्रतिमा, संस्कृती अधिक चांगल्या पद्धतीने पर्यटकांसमोर मांडणं, त्यांच्यामधील गैरसमजुतींचा नाश करून त्यांना आपल्या देशाकडे, आकृष्ट करण्याची फार महत्त्वपूर्ण जबाबदारी टुरिस्ट गाइडची असते. काहीसे सिझनल असे या क्षेत्राचे स्वरुप असल्यामुळे काहीसे दुर्लक्ष असे हे क्षेत्र आहे. परंतु टुरिस्ट गाइड खूप चांगले पैसे
कमावू शकतात, एवढं नक्की. जर्मन, रशियन, फ्रेंचसारखी परदेशी भाषा (इंग्रजी भाषेव्यतिरिक्त) शिकल्यास आंतरराष्ट्रीय संधी इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात.