आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रेशन करारे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फेब्रुवारी महिना
टेन्शनचा, हुरहुरीचा आणि अधिकाधिक चिडचिडीचा महिना. सगळीकडून नुसता मारा. एन्जॉय करा. मित्राला - मैत्रिणीला - आपापल्या ‘व्हॅलेंटाइन’ला घेऊन आमच्याकडे या. तुमच्यासाठी खास डिस्काउंट.
नसत्या लफड्यात पडलो. ओळख झालेल्या क्लासमधल्याच मुलीला भटकायला घेऊन गेलो, तर ‘रोमिओगिरी’ करतोस का? म्हणत पोलिसाने पकडले. ओळख परेडनंतर दिले सोडून. एकूणच ‘कचरा’ झाला. पेट्रोल प्रचंड खर्च झालेले. पॉकेटमनी संपला. कॉफी नाही की डिश नाही. ग्रीटिंग कार्ड शर्टाच्या आतच राहिले. पोलिस चौकीची मात्र ‘ट्रीप’ झाली. आता हे सगळे घरच्यांना नीट कसे सांगायचे? त्यांचा राग पोलिसांनी फोन करून बोलावले तेव्हाच दिसलेला. ‘न सांगता तू हे धंदे करतोस’ म्हणत तिथल्या तिथे कानाखाली देण्यासाठी ते सज्ज झालेच होते; पण भल्या वाटणाºया इन्स्पेक्टरने थांबवलं म्हणून बरं...
खरं तर या दिवशी नेमकं काय करणार होतो, या प्रश्नाचे उत्तर त्या मैत्रिणीला पण ठाऊक नव्हते. सगळे जण फिरतात तसे जायचे, तिला शंभर रुपयांचे मस्त कार्ड द्यायचे; परत कॅम्पसमध्ये यायचे, एवढाच प्लॅन होता. पण हे ‘असं’ पकडल्यामुळे नसलेल्या चुका क्षणात मान्य करून पायाशी लोळण घेण्याची पाळी आली...
हा दिवस उजाडलाच नसता तर बरं...
व्हॅलेंटाइन.
रोमँटिक कल्पना. कोणीही कोणासाठी असणारे प्रेम व्यक्त करू शकतो. भला मोठा ग्रुप आमचा. मस्त फिरलो. धम्माल पार्टी केली.
मागच्या वर्षी अस्साच प्रोग्राम. आता आमचे ‘व्हॅलेंटाइन’ बदलले. त्यात फारसे बिघडत नाही. मैत्री-जवळीक-छोटी मोठी भांडणं...दुसºयाबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर. असं घडत असतंच. या वर्षी वेगळ्या गमती घडल्या. मागच्या आठवणी काढत रडत न बसता अजून निराळे प्लॅन्स तयार झाले. प्रत्येकाकडे बºयापैकी पैसा असल्याने पार्टी जोरदार झाली. संध्याकाळी गाड्या उडवत, चित्कार करत दणाणून सोडलं नुसतं...
भारतात भावनांना वाट करून देणारी कार्ड्स 1980च्या दशकात आली. 1987 मध्ये ‘आर्चिस’... नंतर ‘हॉलमार्क्स’... दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात आर्चिसचे हजार स्क्वेअर फुटाचे भाड्याच्या जागेतले दुकान सुरू झाले. तरुणाई भाळली. शब्द, डिझाइन, आकार, काही पोस्टर्स... भिंतीवर हवीतच म्हणून विकत घेतली गेली. वर्षाच्या आत 21 लाखांच्या आसपासची विक्री... 26 वर्षांत आर्चिस म्हणजे मनातले व्यक्त करणारे कार्ड अशी ओळख... खरं तर 1991 मध्ये ‘व्हॅलेंटाइन कार्ड’ आल्यानंतर ते देण्यासाठी सेलिब्रेशन करावे अशी सक्ती नव्हतीच... 2001 मध्ये ‘फ्रेंडशिप डे’चे कार्ड बाजारात आले. त्यापूर्वीच 1996-97 पासून फादर, मदर, हजबंड डे... करवा चौथ... होळी... ईद! सण, कार्यक्रम, नात्यांची असोशी आणि शब्दांची बंदिशी, एक असा खेळ सुरू झाला की व्यक्त व्हायचे असेल तर ‘सेलिब्रेशन’ करा. त्यासाठी सज्ज व्हा.’
फोनवरून ग्रीट किंवा विश करणं म्हणजे खरंखुरं व्यक्त होणं नाही.
एसएमएस, मेल...लांब अंतर असेल तर ठीक... एकाच शहरात आहात ना, मग चला, उठा, वेळ दवडू नका... परस्परांच्या सहवासात राहा... एक नवाच फंडा... हा स्वीकारला तर दिवसभर आनंदात राहाल.
थोडक्यात काय तर ‘कंपनी’ शोधा.
पण या ‘कंपनी’ने तुम्हाला नकार दिला तर?
‘व्हॅलेंटाइन डे’ची आपल्या मनातली आपणच ठरवलेली चौकट. नकाराची परिभाषा स्वीकारात बदलण्यासाठी केलेला खटाटोप. हे सर्व का, कशासाठी?
एखाद्या लेक्चरनंतर विचारले गेलेले हे प्रश्न. उत्तरे देता येतात. माहिती समजते, ती पटतेदेखील. पण वयाचे काय, मित्रांचे काय, हुरहुरीचे काय?
पार्लर्स केवढी महागडी झालीत...
घरी जमा करून ठेवलेले पैसे संपले. हा फेब्रुवारी महिना. ‘बजेट’ कोलमडून जातं... होस्टेलमध्ये राहिले म्हणून अनेक प्रश्नांची समोरासमोर उत्तरं देण्यातून सुटका झाली. स्वत:ला सजवण्यात सॉलिड पैसा गेला.

ड्रेसेस तरी स्वस्त थोडीच?
हजार-पंधराशेचा चुराडा. प्रोजेक्टसाठी घेतलेले पैसे एका ‘ड्रेस’मध्ये घातले. एवढे करून आपण छान, सुंदर दिसतो असे तो म्हणालादेखील नाही... त्याला फार लांब जायचे नव्हते... पेट्रोल नाही. घरच्यांना फार उत्तरं द्यावी लागतात. शिवाय एकांत वगैरे नकोच... सध्या अ‍ॅटमॉस्फिअर बेकार म्हणत त्याने ग्रीटिंग दिलं... तेवढंच...

‘थ्रिल्ड’ असं काही वाटलं नाही.
त्याची-त्याने सांगितलेली कारणं पटली... तरी प्रश्न उरतोच. हे फॅड काढलं कुणी? सेलिब्रेशनची जबरदस्ती नसताना नेहमीसारखं आम्ही दोघं का भेटलो नाही?


पुढच्या ‘व्हॅलेंटाइन डे’चं दडपण न ठेवता रोजच्यासारखं भेटणं, हीच एकमेकांना दिलेली ‘गिफ्ट’ ठरेल.
हा ‘व्हॅलेंटाइन डे’ फारच वाईट गेला. आसपास जल्लोष होता. आपल्याला कुणी मित्र नाही, याबद्दल आतल्या आत त्रास झाला.


न्यूनगंडाची आपण शिकार होऊ की काय, ही भीती वाटते. कॉलेजमध्ये जावंसं वाटलंच नाही. संध्याकाळी घराबाहेर पडले नाही. आम्ही तीन-चार मैत्रिणींनी या दिवशी हे सगळं कसं बदलता येईल याबद्दल चर्चा केली. आपण आनंदी राहू शकत नाही, याचा अर्थ ‘डे’ज असूच नये, असं म्हणणं चुकीचं... हे कळलं; जाणवलं आम्हाला... तरी ‘व्हॅलेंटाइन’ म्हणजेच ‘सेलिब्रेशन’ असं ठसवणं हे योग्य नव्हे, यावर आमचं एकमत झालं.