आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Various Pain By Dr. Niranjan Dilip Chavan, Divya Marathi

हरवलेल्या जीवनाला चालना देणारी शस्त्रक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृत्रिम सांधेरोपण किंवा जॉइंट रिप्लेसमेंट हे आजच्या काळातील एक नवीन आणि नावाजलेली शस्त्रक्रिया आहे. वृद्धापकाळात किंवा इतर काही कारणामुळे झालेल्या आर्थ्रायटिसमुळे, हरवलेल्या जीवनाच्या गतीला चालना देणारी ही एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. कृत्रिम सांधेराेपणाबद्दल शंका,त्यांचे निवारण होणे महत्त्वाचे आहे.

कुर्जा व सायनोवीयम महत्त्वाचे
शरीरातील सगळ्याच लहान-मोठ्या सांध्यांची बनावट सारखीच असते. सर्व सांध्यांमध्ये दोन्ही हाडांना मुलायम, मोत्यासारखे पांढरे कार्टिलेजचे (कुर्जा) आवरण असते. याचे वैशिष्ट्ये असे की, ते रबराच्या गादीसारखे, शाॅक किंवा दणके सहन करण्याची क्षमता आणि समांतर गुळगुळीत असल्यामुळे हालचाली करणे शक्य करते. त्याचसोबत सांध्यांमध्ये तेलासारखे पाणी (सायनोवीय फ्ल्यूइड) देखील असते जे सांध्यांमधील घर्षण थांबवते. हा कुर्जा आणि हे पाणी सांध्यांच्या आरोग्यासाठी आणि हालचालीसाठी सर्वात महत्त्वाचे असते. त्याचबरोबर या साध्यांना एक अस्तरासारखे आवरण ज्याला सायनोवीयम म्हणतात, हे असते. सांध्यामधले पाणी हेच सायनोवीयम तयार करते. जेव्हा सांध्यांमधले यापैकी कुठलेही तंत्र बिघडते तेव्हा सांध्यांमध्ये सांधेदुखी किंवा आर्थ्राटियस किंवा झीज सुरू होते. आधी फक्त सूज सुरू होते. पण हळूहळू दुर्लक्ष केल्यास, कुर्जाची झीज आणि सांध्यांच्या हानीला सुरुवात होते. संधीवातमध्ये सांध्यांचे सायनोवीयमला सूज सुरू होते, जी पुढे जाऊन कुर्जा आणि सांध्यांतील इतर महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान करते. खुब्याच्या सांध्यांमध्ये आर्थ्रायटिसच एक महत्त्वाचे कारण हे एव्हॉस्कूलर नेक्रोसीन िकंवा ए.व्ही.एन. आहे. या परििस्थतीत खुब्याच्या सांध्यातील हेड किंवा बॉलचा रक्तपुरवठा खंडित होऊन खुब्याचा कुर्जा सडू लागतो आणि पुढे आर्थ्रायटिस निर्माण होतो.

कृत्रिम सांधेरोपणाची भूिमका
आर्थ्रायटिस झालेल्या सांध्यांच्या वेदनारहित हालचाली परत आणण्यास मदतकारी शस्त्रक्रिया आर्थ्रायटिसच्या रुग्णांनी त्यांची हरवलेली लवचिकता, स्वातंत्र्य आणि आराम परत करण्यास लाभदायक ठरते. या शस्त्रक्रियेत दुखावलेले आणि खराब झालेले सांधे उघडले जातात. सांधे साफ करून खराब झालेल्या कुर्जा, गादी आणि हाड काढून टाकण्यात येतात आणि त्यांच्या जागी नवीन कृत्रिम भाग लावण्यात येतात. हे कृत्रिम भाग प्रत्येक रुग्णाच्या हाडाच्या प्रमाणात मोजणी करून, ट्रायल भाग लावून मग शेवटी लावण्यात येतात. कृत्रिम सांध्यांचे हे भाग धातू सिरॅमिक िकंवा हायली क्रॉस िलंक्ड पॉलिथीनचे बनवलेले असतात. या सांध्यांचे िडझाइन बनावट केले आहे. हे नवीन भाग रुग्णांच्या सांध्यामधील मुलायम, हळूवार आणि वेदनारहित हालचाली परत आणण्यास उपयुक्त असतात. काही रुग्णांमध्ये ज्यांच्यात सांध्यांचा निम्मा भागच आर्थ्रायटिसने ग्रासला आहे. त्यांच्यात अर्धा सांधा किंवा युनी कंपार्टमेंटल सांधा लावण्यात येतो. गरज असेल त्या प्रमाणात कमी - जास्त प्रमाणात भाग बदलले जातात. प्रत्येक रुग्ण वेगळा त्याच्या सांध्याची झीज वेगळी तसेच कृत्रिम सांधेदेखील गरजेप्रमाणे वेगळे असतात.

सांध्यांची रचना व आर्थ्रायटीसची कारणे
सांधा िकंवा जॉइंट हा शरीराचा असा एक भाग आहे जिथे दोन किंवा जास्त हाडे एकत्र येतात.
सांध्याच्या आतले आणि भोवतालचे अनेक लहान, मोठे स्नायू आणि इतर रचना त्यात हालचाल घडवण्यास मदत करतात. त्यामुळेच माणसाला चालणे, बोलणे, चावणे, पकडणे यासारख्या दैनंिदन हालचाली करणे शक्य असते.

कृत्रिम सांधेरोपणाची गरज आहे ?
कृत्रिम सांधेराेपणाची गरज ठरवणि्यास बरेचशे घटक महत्त्वाचे असतात. रुग्णासाठी हे महत्त्वाचे आहे की, ते हे सारे घटक त्यांच्या परविाराशी आणि डॉक्टरांशी बसून बाेलून समजावून घ्यावेत. सर्वांत महत्त्वाचे की, चुकीच्या आणि अर्धवट सल्ल्यांच्या आहारी जाऊन शस्त्रक्रियेसाठी तयार किंवा नकारदेखील देऊ नये. रुग्णाला पूर्ण हक्क असतो की, त्यांनी त्यांच्या शंकांचे नविारण करून घ्यावे.

कृत्रिम सांधेरोपण कधी करावे
जेव्हा रुग्णाच्या दैनंिदन जीवनात सांधेदुखीमुळे त्यांना महत्त्वाचे बदल करावयास लागतात किंवा त्यांच्या हालचाली कमी होऊ लागतात किंवा ते त्यांचे स्वावलंबी जीवन गमावू लागतात, तेव्हा त्यांचा कृत्रिम सांधेरोपणाबद्दल विचार करावा. जर रुग्णाला हा वशि्वास असेल की ते सांधेदुखी सोबत उरलेले संपूर्ण आयुष्य संलग्न होऊन जगू शकतात तर त्यांनी शस्त्रक्रियेचा विचार करू नये.

कार्यक्षम सांधे... निरोगी जीवन
लक्षात असू द्या की कृत्रिम सांधेरोपण हा नेहमीच शेवटचा पर्याय असावा. हेदेखील लक्षात ठेवावे की कृत्रिम सांधेरोपण केल्यास रुग्णांनी अित धावपळीचे आयुष्य न जगता, त्यांचे ध्येय फक्त एक आरामदायक आणि वेदनारहित जीवन जगणे हे असावे. हे लक्षात असू द्या... कार्यक्षम सांधे म्हणजेच निरोगी आणि सकारात्मक जीवन, होय. (Active Joints = Healthy Living)

नुसते सांधेबदल नाही तर...
नुसते सांधेबदल नाही तर या शस्त्रक्रियेत तोल गेलेले आणि वेडेवाकडे झालेले हाड आणि स्नायूंचा समतोलपणा पूर्ववत करण्यात येतो अथवा बॅलेंसिंग करण्यात येते. म्हणून कृत्रिम सांधेरोपण ही एक ख्ूप विकसित झालेली आणि महत्त्वाची उच्च प्रणालीची शस्त्रक्रिया आहे.