आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक फिल्म पहिली मध्यंतरी 'we bought a zoo' नावाची आणि पुन्हा एकदा प्रत्येक वेळी पडणारा प्रश्न मला पडला, आपल्या आवाक्यापलीकडे जाऊन, स्वत:च्या भिंती तोडून, विस्तारून विचार करणा-या व्यक्तिरेखा अशा चित्रपटातूनच का येतात समोर? वयापेक्षा खूप समजूतदार असलेली छोटी मुलगी, याच रोजरोजच्या जगाची नजर चुकवून कोप-यात त्याच्यासाठी रोज नवी प्रेमकहाणी उभी करणारी प्रेयसी, डोंगराइतका इगो आड येत असतानाही स्वत:च्या मर्यादा नि चुका स्वीकारणारा एखादा पन्नाशीचा बाप, दिसत नसलेल्या शक्यतेचा विचार करून ती कृतीत आणणारा प्रियकर. हे सगळे माणूसपणाच्या आहारी जाऊन त्यातून सुटका करून घेणारे लोक चित्रपटातच का दिसतात. त्या लेखकांना, दिग्दर्शकांना, अभिनेत्यांना कुठेतरी तसे कोणी तरी भेटले असेल, नाही?
तर ही bought a zoo.
आपला, आपल्या मुलांचा जीव असलेली आयुष्याची जोडीदार मृत्यूला गमावल्यानंतर एकमेकांमध्ये अडकलेली, सोडवता न येणारी तीन आयुष्यं. जगायचे मुख्य कारण असलेली ती गमावलेला, गावात जिथे जिथे तो नि ती गेलेत त्या जागा चुकवत फिरणारा बाप, अवघड वयातला दिशाहीन मुलगा आणि या दोघांना जोडू पाहणारी 7 वर्षांची छोटीशी मुलगी. तीन दिशा. एकाच छप्पर हरवलेल्या उघड्या घरातली माणसं. ऊब यायला तर हवी. मग घर बदला.
शोधता शोधता येऊन पोहोचतात त्याच शिळ्या जगापासून खूप लांब एका अशा घरात, जे बघताक्षणी लेकीला आवडलेय म्हणून बाप घ्यायचे ठरवतो, पण घर आहे एका बंद पडून आलेल्या झूमध्ये. ज्याला कोणी वाली नाही नि कोणी लक्ष दिले नाही तर तिथे काम करणारी काही डोकी आणि तिथले प्राणी सगळे वेगळ्या वाटांना जाणार वेगळ्याच अडचणी. कधी न पाहिलेल्या, प्रश्न कधीच न सोडवलेले, अगदीच अभ्यासक्रमाच्याच बाहेरचे.
हे छप्पर नसलेले कुटुंब येतं मूळ तुटू लागलेल्या झूमध्ये. तिथे जाताना सामान भरताना बापलेकी गप्पा मारताना बाबाला त्याच्या बायकोचा स्वेटशर्ट सापडतो. दोघे थोडा वेळ काही बोलत नाहीत. मग मुलगी म्हणते, आता सगळं नवीन घ्यायला हवं न? बाबा समजूतदारपणे लेकीचा पोर होऊन मान हलवतो.
सगळं काही हरवलेलं असताना नुसतं धाडसाबद्दल ऐकण्यापेक्षा एखादे धाडस जगून पाहावं अशा खराखुरा प्रयत्न करणारा बाप, लेकीचे बोट धरून मुलालासुद्धा त्या दिशेने विचार करावा म्हणून नेऊ पाहतोय. पण मुलाचा जीव अडकलाय शहरात, मित्रांत, नसलेल्या आईत, उभे न करणा-या शाळेत. त्याला उत्तरे न येणारा जुना पेपर चालणारे. आणि तो काढून घेऊन नव्या परीक्षेला उभे राहायला लागण्यातली अगतिकता, असाहाय्यता व्यक्त होते ते बापाबद्दलच्या रागातून, आहे तिथेच अडकून राहायच्या अट्टहासातून.
झूच्या कामात गढून गेलेल्या बापाला एक दिवस मुलगी म्हणते, तू हल्ली गोष्ट नाही सांगत. बाप म्हणतो, हो, कारण आत्ता आपण एक गोष्ट जगतोय. एकीकडे तो आयुष्याकडे ताकदीने बघायचा नजरिया आहे आणि दुसरीकडे बायकोचा फोटो दिसला तरी कळ जातेय खोलवर, ते नाकारायचंय. मुलगा स्वत:शी, बापाशी, जगाशी भांडतोय, पण त्यातही त्याला गार वाटेल अशी एक साथ नव्याने त्या झूमध्ये मिळतेय.
आणि मग हळूहळू सगळे गुरफटलेले धागे वेगळे व्हायला लागतात नि गुंत्याचा गोफ व्हायला लागतो. त्या झूमध्येही एक मरायला टेकलेला वाघ आहे. त्याला मरू द्यायला हवं ही त्याची गरज आहे हे कळत असताना पुन्हा कोणाला तरी जाऊ द्यायचे हे मान्य न करता येणारा बाप, लेकाबरोबर भांडता भांडता, समजावताना त्याचा मित्र होतो आणि एक अतिशय भारावून टाकेल असा विचार मांडतो.
'Do you know, sometimes all you need is twenty seconds of insane courage? Just literally twenty seconds of just embarrassing bravery. And I promise you, something great will come of it.'
मग एक दिवस झू उघडतं, लोकांनी गजबजून जातं...
त्यानंतर बाबा मुलांना त्या ठिकाणी घेऊन जातो जिथे पहिल्यांदा तो त्यांच्या आईला भेटलाय. ती भेट तो वर्णन करून सांगतोय आणि मुलगी मधेच म्हणते, ‘बाबा, तू पुन्हा गोष्टी सांगायला लागलास बघ.’ बाप हसतो नि पुन्हा गोष्ट सांगायला लागतो.
‘...तर मी असा बाहेरून जात होतो आणि या इथे, इथे ती बसली होती. मी अक्षरश: होतो तिथे थांबलो. ती जगातली सगळ्यात सुंदर मुलगी होती, पण आता सांगायचं कसं नं. मला सुचेना. मी काचेतून पाहत राहिलो. मग थोड्या वेळाने आत गेलो. ती वाचत बसली होती मला सुचत नव्हते.’
बाबाचे वर्णन सुरू आहे नि मुलांनाही ती भेट समोर डोळ्यापुढे उभी राहतेय. डोळ्यात पाणी आहे. पण ते हिमतीचे आहे. गमावलेल्या माणसाच्या आठवणींना भिडण्याच्या इच्छेतून कष्टाने कमावलेले. आणि मग मी म्हटले why would an amazing woman like you even talk to me?
चित्रपटाच्या शेवटी त्याची तेव्हाची ती दिसते हसताना आणि म्हणते'why not'?

जगात ‘का’ म्हणून जगायच्या रांगेत खूप लोक आहेत. आपापले न सुटणारे ‘का’ सोबत घेऊन न संपणा-या रांगेत तिथेच उभे राहिलेले. ‘का नाही’ची रांगच नसते. ती वाट फक्त त्या वीस क्षणांचं धैर्य दाखवलं की आपोआप खुली होणार असते, त्याच ‘का’च्या रांगेच्या बाजूला.
आपण सगळे व्याकरणातल्या passive voice
चा वापर फार करत राहतो. गोष्टी घडाव्यात, काहीतरी व्हावे 'ु८ 'by someone else'. पण व्याकरण आणि आयुष्यसुद्धा active voice
ने करायची गोष्ट आहे.
हा चित्रपट ख-या घटनेवर आधारित आहे, ते आहे डार्टमूर झुऑलॉजिकल पार्क