Home | Magazine | Akshara | asaram lomate article on akshara

अाजची कथा ही समकालाची बखर

दिव्‍य मराठी | Update - Dec 30, 2016, 03:00 AM IST

परभणीचे अासाराम लाेमटे यांच्या ‘अालाेक’ या कथासंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला

 • asaram lomate article on akshara
  परभणीचे अासाराम लाेमटे यांच्या ‘अालाेक’ या कथासंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त लाेमटे यांचे कथा या लेखनप्रकाराविषयी हे मनाेगत.
  अाजची मराठी कथा ही समकालाची बखर अाहे. कधीकाळी मध्यमवर्गीय जीवनजाणिवेच्या अाणि संकुचित परिघातल्या कथेने मराठी कथासृष्टीचा पैस व्यापला हाेता. अाजची कथा या किरट्या विश्वातून बाहेर पडून विस्तीर्ण अवकाशात अाली अाहे. अाजची मराठी कथा वेगवेगळ्या समूहातून, बाेलीतून, सामाजिक स्तरांमधून येत अाहे. ती बहुस्तरीय अाहे. एका अर्थाने अाजच्या दुभंगलेल्या काळाचा काेलाज म्हणूनही अाजच्या कथेकडे पाहता येईल.

  ग्रामीण कथा म्हणजे किस्से अाणि इरसाल गाेष्टी असेही समीकरण ठरून गेले हाेते. शहरी वाचकांचे मनाेरंजन करण्यासाठी मागणी तसा पुरवठा या नियमानेही असे बरेच लेखन झाले. जुनी मासिकं, दिवाळी अंक चाळले तर त्यात खाणाखुणा दिसतील. मला जेव्हा निर्मितीप्रक्रियेसंबंधी किंवा लेखनासंबंधी भूमिका मांडण्याची संधी मिळते तेव्हा मी ही गाेष्ट अावर्जून सांगताे की, मी ग्रामीण कथा लिहित नाही. अाजचे जे अस्वस्थ करणारे, बाेचणारे, अंगावर येणारे वर्तमान अाहे तेच गाेष्टींच्या रूपाने मांडताे. खेड्यातला माणूस म्हणजे केवळ कृषिकेंद्रित व्यवस्थेच्या मध्यभागी असलेला शेतकरीच नाही तर शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया असे सर्वच घटक अाणि त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्षमय जगणे, या जगण्यातले ताणतणाव, त्यांचा चिवट जीवन संघर्ष हे विषय माझ्या कथांचे हाेतात. जगण्याचा झाडा देताना ही माणसे ठेचाळतात, प्रसंगी हातपाय गाळतात पण जगत रहातात.

  अाजच्या काळात व्यक्तिवादाला प्रचंड महत्त्व अाले अाहे. याचासुद्धा सगळ्यांनाच विसर पडला अाहे. ज्यांचा अावाज क्षीण अाहे त्यांच्या बाजूने बाेलावे असे काेणालाच वाटेनासे झाले अाहे. ज्या भूमीवर अापण उभे अाहाेत तेथून प्रश्नांचे असंख्य भुंगे निघत अाहेत. याची जाणीव नेहमीच अस्वस्थ करणारी अाहे. पूर्वी ग्रामीण कथा हे नामाभिधान बहाल करून ज्या कथेचे वर्गीकरण केले जायचे त्या कथेपेक्षा अाजची कथा भिन्न अाहे. सुदैवाने अाज अनागर अशा समूहाची कथा लिहिणे कथाकार हे स्वत:ची परंपरा जुन्या ग्रामीण कथेशी जाेडत नाहीत. त्यामुळे विभिन्न जाती, समूहजीवनातील पात्रे या कथांमध्ये अाढळतात. अाजच्या अनागर कथेने चाकाेरीबाहेरचे अनुभवविश्व मांडले अाहे ही बाब ठळकपणे नमूद करावी लागते. ग्रामीण शहरी या सीमारेषा केवळ वास्तवाच्याच पातळीवर पुसट हाेत अाहेत असे नाही तर अभिव्यक्तीच्याही पातळीवर त्या सीमेवर येताना दिसत अाहेत. अर्थात अाता कुठे या प्रक्रियेचा अारंभ झाल्याचे दिसून येत अाहे. नव्या शतकातल्या गेल्या दशकापासून अर्धनागरी असे जग कथेतून माेठ्या प्रमाणावर व्यक्त हाेत अाहे. अाजच्या खंडित काळाला, तुकड्या-तुकड्यांमध्ये दुभंगलेल्या जगण्याला नेमके भिडण्याची ताकद अाजच्या कथेतच अाहे. कता हाच वाङ‌्मयप्रकार अाजचे दुभंगलेपण चिमटीत पकडू शकताे. कादंबरी हा दीर्घ परिश्रमाची मागणी अाहे. चिरफाडलेले वर्तमान माेजक्या शब्दात, गाेळीबंद पद्धतीने साकारण्याची अवघड कामगिरी अाजची कथा पार पाडताना दिसते.

  एका अर्थाने अाजची मराठी कथा कूस बदलताना दिसत अाहे. मुख्य म्हणजे कथा हा दुय्यम वाङ‌्मय प्रकार अाहे. या दीर्घकाळाच्या न्यूनगंडातून ती बाहेर पडून नवनवे अाकार धारण करीत अाहे. विविध भाैगाेलिक प्रदेश, विविध समाजिक स्तर, भिन्न समूह अशा सगळ्याच ठिकाणाहून ही कथा लिहिली जात अाहे. नव्वाेदत्तरी कथाविश्वावर नजर टाकली अाणि गेल्या पंचवीस वर्षांतले बहुस्तरीय कथालेखन पाहिले तर मराठी कथेने अापले किरटे अाकाश केव्हाच मागे टाकले अाहे हे लक्षात येईल. अाजही चटपटीत, अाकर्षक अाणि मनाेरंजक असे कथालेखन हाेत अाहे, ते उद्याही हाेत राहील पण अाज मुख्यत्वे दबदबा अाहे ताे गांभीर्याने हाताळल्या जाणाऱ्या कथेचा. वर्तमानाची बखर या अर्थाने अाजची कथा असंख्य तुकड्यांतून पुढे येत असली तरी दुभंगलेल्या काळाचाच एक काेलाज अाहे. या कथेला लाभलेले अाजचे अस्तरच तिला मूल्यवत्ता बहाल करणारे अाहे.

Trending