आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेक्सपिअर अजून जिवंत आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेक्सपिअर नाटक लिहिण्याशिवाय आणखी कुठले उद्योग करत असे, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात की, तो नट होता. काहींच्या मते, नाटकाच्या थिएटरमध्ये तो कामाला होता. तर काहींच्या मते, तो कसायाकडे कामाला होता.
इंग्लंडमधल्या किल्ल्यावरूनते इजिप्तमधल्या ममीजपर्यंत, सिरियाच्या वाळवंटातून ते रशियातल्या गोठवणाऱ्या थंडगार प्रदेशांपर्यंत, अमेरिका-युरोपमधल्या अति-औद्योगिक शहरांपासून ते आशियातल्या परंपरागत कलाकारांपर्यंत सारे जण शेक्सपिअरला आपला मानतात. त्याच्यावर टीकाही करतात. सगळ्यांसाठी शेक्सपिअर जिथे-तिथे नेहमी सोबतीला असतो.
शे क्सपिअरच्या मृत्यूचा महिना एप्रिल. २०१६मधल्या एप्रिलातल्या २३ तारखेला, त्याला जाऊन ४०० वर्षे होतील. शेक्सपिअरचे मरणाचे वर्ष, तो आपल्याला कसा आवडतो, हे सांगत, त्याची नाटके खेळत, गाणी गात ‘साजरे’ केले जाणार. एरवी, शेक्सपिअरने लिहिलेले शब्द आणि त्याने लिहिलेले शब्द साजरे करायची संधी कुणी दवडत नाही. आता तर, ४००व्या श्राद्धाचे कारण. इंग्लंडमधल्या किल्ल्यावरून ते इजिप्तमधल्या ममीजपर्यंत, सिरियाच्या वाळवंटातून ते रशियातल्या गोठवणाऱ्या थंडगार प्रदेशांपर्यंत, अमेरिका-युरोपमधल्या अति-औद्योगिक शहरांपासून ते आशियातल्या परंपरागत कलाकारांपर्यंत सारे जण शेक्सपिअरला आपला मानतात. आपले म्हणताना, त्याच्यावर टीकाही करतात; पण आपलेपणातून प्रगतीचे गोडवे गाऊ वा शोषणाचा धिक्कार करू, हळुवार प्रेमाचे गीत गाऊ, वा नात्यागोत्यातल्यांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढू. सगळ्यांसाठी शेक्सपिअर जिथे-तिथे नेहमी सोबतीला असतो.

एका कॉलेजमधील मुला-मुलींशी गप्पा मारत होतो. त्यांना विचारलं, तुम्हाला तुमच्या भाषेतला कोणता लेखक आवडतो. त्यांच्यामधल्या चौघांनी शेक्सपिअरचे नाव सांगितले! त्या चौघांना शेक्सपिअर आपल्या भाषेतला वाटला. चारशे वर्षांनंतरही तेवढाच ताजातवाना. तब्बल शंभर भाषांमध्ये त्याचे साहित्य भाषांतरित-रूपांतरित झाले आहे. कितीतरी जणांनी त्याच्या एखाद्या नाटकातला वा स्वगतातला एखाद्या वाक्याचा धागा पकडून नव्या कलाकृती जन्माला घातल्या, उभ्या केल्या आहेत. नेल्सन मंडेलापासून ते बिटल्स संगीतकारांपर्यंत कुणाकुणासाठी तो प्रेरणा बनून राहिला आहे. शिवाय, दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण्यांपासून ते शालेय वक्तृत्व स्पर्धांपर्यंत बोलणारे शेक्सपिअरचा जप करतात, तो वेगळाच. ३७ नाटके, १५४ सुनीतं, ३००० शब्द त्याने इंग्रजीला दिले. शंभर एक म्हणी आणि वाक्प्रचार तर वेगळेच. जगभरातील मानव्यशास्त्र आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात शेक्सपिअरचा उल्लेख तर अपरिहार्य. जगभरातल्या अर्ध्या शाळा-कॉलेजेसमधून शेक्सपिअर शिकला जातो. शिकविला जातो. म्हणजे चारशे वर्षांपूर्वी शरीराने मरण पावलेला असला, तरी शेक्सपिअर अजून जिवंत आहे.

काही वर्षांपूर्वी इचलकरंजीतल्या आपटे नगर वाचनमंदिरात एका शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षकाचा सत्कार समारंभ होता. नेहरू शर्ट, विजार आणि काळी टोपी घातलेल्या त्या शिक्षकांनी सत्काराला उत्तर देताना शेक्सपिअरच्या नाटकातील उतारेचा उतारे सहजगत्या सादर केले. पुस्तक परंपरेने समृद्ध असलेल्या, त्या वाचनमंदिरात दोन्ही मजल्यावरच्या पुस्तकांनी अभिमानाने आपल्या कॉलरी ताठ केलेल्या दिसल्या. चहाच्या गाड्यावर काम करणाऱ्या माणसापासून ते अकाउंटन्टपर्यंत कुणीही इंग्रजी वाचतोय, म्हटल्यावर शेक्सपिअरची चौकशी केल्याशिवाय राहाणार नाही. विद्यापीठात शिकत असताना प्रकाश देशपांडे-केजकर हे माझे सर साध्या सोप्या भाषेत शेक्सपिअर, अ‍ॅरिस्टॉटल आणि भारतीय तत्त्वज्ञानाची उकल अशी काही करून सांगत की, पूर्व आणि पश्चिम जग आमच्या वर्गात नांदत असे.

शेक्सपिअर आकाशातून नाही पडला. त्याच्यामागे एक जबरदस्त परंपरा होती. युनिव्हर्सिटीमधे शिकणाऱ्या मार्लो आणि किड यांच्या सकस अशा लेखनाची. दुर्देवाने, शेक्सपिअरच्या झंझावातात ते बाजूला पडले. विशेष करून, मार्लोच्या ‘डॉक्टर फाऊस्टस’सारख्या नाटकात शेक्सपिअरला लाभलेली समृद्ध अशी परंपरा दिसून येते. शंभर एक वर्षे इंग्लंडमधली थेटरं बंद होती. पण, मार्लो वगैरेंनी आपल्या लेखणीने आणि कर्तृत्वाने त्यात जान आणली. म्हणून तर शेक्सपिअर लिहू शकला. या दिशेने, शेक्सपिअरचा नाट्यलेखनाबद्दल बऱ्याच ‘कॉन्स्पिरसी’ थिअऱ्या शेक्सपिअरप्रेमींना ठाऊकच आहेत.

आठ भावंडांपैकी एक असलेल्या शेक्सपिअरच्या इंग्लंडमधल्या जन्मस्थानाला दरवर्षी दोन दशलक्ष लोक भेट देतात. खरं तर, १९व्या शतकापर्यंत ते एका कसायाचं घर होतं. तिथं दारू प्यायला लोक येत. १५६४मध्ये इंग्लंडसारख्या छोट्या देशात जन्मलेला शेक्सपिअर नाटक लिहिण्याशिवाय आणखी कुठले उद्योग करत असे, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात की, तो नट होता. काहींच्या मते, नाटकाच्या थिएटरमध्ये तो कामाला होता. तर काहींच्या मते, तो कसायाकडे कामाला होता. शेक्सपिअर हयात असताना त्याची नाटके प्रकाशित झाली नव्हती. शेक्सपिअरबरोबर काम करणाऱ्या दोन नटांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याची ३६ नाटके ‘फर्स्ट फोलिओ’ म्हणून प्रकाशित केली. त्यातल्या एका प्रतीची किंमत एक पाऊंड होती. २००१मध्ये, जेव्हा त्यातल्या एका प्रतीचा लिलाव झाला, तेव्हा त्याची किंमत ४.३ दशलक्ष पाऊंड होती.

सोळाव्या शतकाच्या शेवटच्या दिवशी ३६ वर्षांच्या शेक्सपिअरने नुकतंच आपलं ‘अ‍ॅज यु लाईक इट’ हे नाटक लिहून हातावेगळं केलं असणार, आणि ‘हॅम्लेट’ लिहायला सुरू केले. त्या वर्षी लंडनच्या काही व्यापाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. त्यानंतर दोनशे वर्षांनी शेक्सपिअरचा भारतात प्रवेश झाला. भारतात १८व्या आणि १९व्या शतकात ब्रिटिशांमुळे पहिल्यांदा शेक्सपिअर आला. युरोपमधून येणाऱ्या नाटक कंपन्यांनी शेक्सपिअरची नाटके भारतात, प्रामुख्याने कलकत्यात आणि मुंबईत आणली. मिशनऱ्यांनी त्याची नाटके आणि कविता विविध भाषांत भाषांतर करायला प्रोत्साहन दिलं. विद्यापीठीय अभ्यासक्रमाचा शेक्सपिअर एक अविभाज्य घटक बनला. पारसी, बंगाली आणि उर्दू रंगभूमीवर शेक्सपिअर लोकप्रिय झाला. ‘ऑथेल्लो’चा १८६७मध्ये अनुवाद करून महादेवशास्त्री कोल्हटकरांनी शेक्सपिअर मराठीत आणला. १८७९पर्यंत सात इंग्रजी नाटकांची भाषांतरे झाली, आणि ती सगळी शेक्सपिअरचीच होती. सिनेमाचा शोध लागण्यापूर्वी काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या. १९३५मध्ये सोहराब मोदींनी ‘खून का खून’ या चित्रपटात हॅम्लेटची भूमिका साकारली होती. नसीम बानूंनी ऑफेलिया केली आणि मेहदी अहसान यांनी ‘हॅम्लेट’वर आधारित हा चित्रपट लिहिला होता.

स्वातंत्र्योत्तर भारतात शेक्सपिअर वेगवेगळ्या कारणांनी कलाकारांना खुणावत राहिला. कुणी त्यात वर्ग संघर्ष बघितला, कुणाला जात-पात दिसली, कुणी स्त्री-पुरुष संबंधाचे गुंते शोधले, कुणाला वसाहतवादी राजकारण दिसले. रतन थिय्यम, कावलम पण्णीकर, चेतन दातार, ज्योतिश एम जी, रामू रामनाथन, रजत कपूर, अतुल कुमार, सुनील शानबाग, विक्रम कपाडिया असे वेगवेगळ्या पिढीतले, विविध संदर्भांत काम करणारे कलाकार शेक्सपिअरला आपले मानत आले आहेत. रामू रामनाथनने ‘शेक्सपिअर आणि शी’ हे नाटक काही वर्षांपूर्वी बसवले होते, तेव्हा त्याला मुंबई आणि सोळाव्या शतकातलं लंडन सारखं वाटलं. अव्याहत चाललेली गडबड, आवाज, गोंगाट, धावाधाव. मोकळी जागा नाही. स्थलांतरं. व्यापार. दररोज कामाच्या शोधात येणारे कामगार, नाना प्रकारचे संसर्ग, डास चावणं, आजारपणं, साथीचे रोग, तरीही एकत्र राहणारे मुंबईकर. असं काहीसं शेक्सपिअरला दिसलं असावं आणि त्यातून रामूसारख्या नाटककारानं शेक्सपिअरला हात घातला. म्हैसूरच्या रंगायन या नाट्यसंस्थेचे नट आणि दिग्दर्शक कट्टीमनी मॅकबेथ, लिअर, हॅम्लेट आणि ज्युलियस सिझरचे संवाद वापरून गिल्टच्या संकल्पनेवर शिक्षा झालेल्या कैद्यांबरोबर काम करतात. कैद्यांना आपल्या आयुष्याकडे आणि कर्तृत्वाकडे पाहण्याची संधी मिळते, शेक्सपिअरमुळे. चेन्नईच्या प्रकृती फाऊंडेशनने ‘हमारा शेक्सपिअर’ या शेक्सपिअरच्या नाटकांचे महोत्सव सहा वर्षे केले. मराठीत चेतन दातार यांनी सात-आठ वर्षांपूर्वी शेक्सपिअरच्या नाटकाचा ‘जंगल मे मंगल’चा प्रयोग, तर राजीव नाईक यांनी ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’ असं भाषांतर केलं.

महत्त्वाचं म्हणजे, शेक्सपिअर त्याच्या फक्त अख्ख्या नाटकापुरता जन-मनांत पोहोचलेला नाही. त्याच्या नाटकातली छोटी छोटी दृश्ये, प्रतिमा, प्रतिके पिढ्यान‌् पिढ्या कलाकाराला आकर्षित करत आली आहेत. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे, ‘मुक्काम डेहरु, जिला नागोर’ हे मोहित टाकळकरने दिग्दर्शित केलेलं हिंदी नाटक. हे नाटक म्हणजे परेश मोकाशी यांच्या ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या मूळ मराठी नाटकाचं जीतेंद्र जोशी यांनी केलेलं रूपांतर. नाटकात राजस्थानमध्ये एका छोट्या गावात नाटक कंपनीत काम करणारे कलाकार माणसाची कवटी घेऊन शेक्सपिअरच्या नाटकातील संवाद म्हणत नाटकाची तयारी करतात. कवटीचा धमाल वापर करत, गावाकडचे कलाकार प्रेक्षकांना हसवत असतानाच, शेक्सपिअर खेडोपाडच्या नाटकवाल्यांपर्यंत पोहोचलेला आहे, याचीही साक्ष हे नाटक देतं.

आन्द्रे चायकोवस्कि या पोलिश पियानोवादक आणि संगीतकाराचे शेक्सपिअर-प्रेम काही जगावेगळेच. १९८२ साली या कलाकाराचे कॅन्सरने निधन झाले. त्याने आपले शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दिले आणि आपली कवटी ‘रॉयल शेक्सपिअर कंपनी’ला द्यावी, अशी शेवटची इच्छा जाहीर केली. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकातल्या कवटीच्या दृश्यात आपली कवटी वापरावी, ही त्यामागची इच्छा. पुढची अनेक वर्षे कुठल्याही कलाकाराला, ती कवटी वापरून हॅम्लेट करायचे धाडस झाले नाही. २००८मध्ये डेव्हिड टेनंट या नटाने ती कवटी पहिल्यांदा रंगमंचावर वापरली. पण, त्यानंतर कंपनीने ती कवटी परत वापरायची नाही, असा निर्णय घेतला. खऱ्याखुऱ्या माणसाची कवटी वापरताना कलाकार आणि समाजाच्या भावना हा अत्यंत गुंतागुंतीचा मुद्दा उपस्थित झाला. एखाद्याला अशी कवटी वापरून केलेलं नाटक करणं वा पाहणं रुचणारही नाही. पण, मुद्दा आहे तो शेक्सपिअर नावाच्या गारूडाचा, जे शतकानुशतकं आपल्या मनाला डोलवत राहिलं आहे.

potdar.ashutosh@gmail.com