आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडजोड आणि 'मी'पणाला तिलांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी मैफलीतून रसिकांना रिझवणाऱ्या सोलापुरातील गाियका - अभ्यासक सुलभा पिशवीकर आणि वैद्यकीय कौशल्य वापरून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. मंजिरी चितळे यांच्या उत्साहाचं गुपित हे त्यांच्या सतत काम करत राहण्यात आहे.
 
अहंकार सोडा, माणसं जोडा असा सल्ला देणाऱ्या डाॅ. मंजिरी चितळे स्वत:ही तो १०० टक्के उपयोगात आणतात, म्हणूनच आज वयाच्या ८२व्या वर्षीही त्या कार्यरत आहेत, आनंदात जगत आहेत, काम आणि छंदांचा योग्य समतोल त्यांनी साधला आहे. उठल्यानंतर व्यायाम. मग वृत्तपत्रांचे वाचन आणि मग इतर गोष्टी. गेली अनेक वर्षं त्या हे रूटीन पाळतात. त्या आहेत, सोलापूरच्या डॉ. मंजिरी विनायक चितळे. प्रसुतीतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ञ असलेल्या चितळे डाॅक्टरांच्या नावानेच महिलांना दिलासा मिळतो.  कळा सुरू असलेल्या बाईला त्या जेव्हा आपल्या गोड चेहऱ्याने, ‘काही होणार नाही गं, थोडा वेळ दुखेल. मग खूप सुखद प्रवास आहे,’ असं सांगतात, तेव्हा त्या स्त्रीचा तो त्रासाचा काळ जाऊन गोड बाळ आपल्या कुशीत विसावलंय या कल्पनेनेच जीव आनंदून जातो. लाखोंच्या आकड्याने त्यांनी बाळतंपणे केली आहेत.  मंजिरीताईंनी १९६४मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुतीतज्ज्ञ विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख अशा दोन्ही जबाबदाऱ्या घेतल्या. प्रचंड कष्ट उपसले. रुग्णांच्या हितासाठी त्यांनी १९७३पर्यंत सिव्हिलच्या रुग्णांसाठी काम केले. पुढे सात रस्ता येथे चितळे क्लिनिक हे प्रसुतीगृह सुरू केले. वेळोवेळी पडणाऱ्या कौटुंबीक जबाबदाऱ्या सांभाळत, चितळे क्लिनिकमध्येच मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा सुरू केली. त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रातील कामे त्या करत होत्या, विविध विषयांवर संशोधन करून त्याविषयी लेखही लिहिले आहेत. अनेक पुरस्कारांच्या मानकरी त्या ठरल्या आहेत. खूप काम करूनही आपलं काम आणि इतर गोष्टी स्वतंत्र ठेवणाऱ्या चितळे मॅडम वयाच्या ८२व्या वर्षीही तितक्याच ताज्यातवान्या दिसतात, जितक्या १९६४मध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा होत्या. “तडजोड आणि मीपणाला कायम तिलांजली दिली की, माणसांना नेमकं आयुष्यात काय ध्येय साध्य करायचं आहे याचं चित्र स्पष्ट होतं. महत्त्वाकांक्षी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रातील लोकांना जोडून घ्यावं लागतं, असं त्यांचं मत आहे. गेली अनेक वर्षं वेळेचं महत्त्व आणि कर्तव्यनिष्ठा जपलेल्या मंजिरी यांनी आपलं कुटुंबही तितक्याच भक्कमपणे उभं केलंय. मुलगी सुहासिनी शहा व मुलगा सुधांशु दोघंही डाॅक्टर आहेत. मात्र या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी आपल्या स्वत:च्या सामाजिक कार्याला आणि प्रगतीला विळखा बसू दिला नाही. त्यांनी नेटके नियोजन आणि वेळेचे महत्त्व याची सांगड घालून ठरवलेल्या गोष्टी कशा पद्धतीने पूर्णत्वास नेता येतील, याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न त्या करतात. त्यांच्या या प्रवासात त्यांचे पती डॉ. विनायक यांनी प्रचंड मदत केली. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा फायदा मॅडमनाही झालाच. अजूनही संपूर्ण दवाखान्याचे व्यवस्थापन, रुग्णांना त्या भेटतात. नवीन तंत्रज्ञान काय आलंय, त्याची दवाखान्याला काही गरज आहे का, याचा संपूर्ण विचार त्या करतात. आज त्या प्रत्यक्ष लेबर रूममध्ये जात नसल्या तरी बाळंतपणे होत असताना कोण आहे, वय काय, स्थिती कशी आहे, याची त्यांच्याकडे माहिती असतेच.  चितळे मॅडम महाराष्ट्र प्रसुती व स्त्रीरोग संघटनेच्या माजी अध्यक्ष आणि सध्याच्या विश्वस्त आहेत. सोलापूर शहरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि शास्त्रीय गायनाच्या मैफिली व वैद्यकीय क्षेत्रातील कार्य्रकमांनाही त्यांची हजेरी असतेच. 
 
माणसाने ठरावीक वयानंतर मीपणा सोडणे गरजेचे आहे. कोणता क्षण कसा येईल याचा काही नेम नाही. त्यामुळे आपल्या छंदांचं, आणि वृद्धापकाळातील रिकामा वेळ कसा घालवायचा, याचे काही नियोजन करून ठेवणे, काही कल्पक कलेचे विश्व अंगीकारून ते शिकणे म्हणजेच आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवणे होय असं डॉ. मंजिरी यांना वाटतं. तिशीतल्या महिलेलाही हेवा वाटावा, अशाच उत्साहात त्या आजही कार्यऱत आहेत.  
 
अहंकाराला थारा नको
मी, माझे, यापेक्षा आपलं काम ज्या व्यक्तींमुळे अडतं, त्यांच्याशी नीट वागा, नीट बोला. माणसे जोडण्याने काही वाईट होत नाही. न जोडल्याने वाईट मात्र घडते. आरोग्यही बिघडते. शिवाय मनात अहंकाराने जागा केली की, विविध प्रकारच्या रोगांना आमंत्रणं जातात. त्यामुळे त्याला कोसभर लांबच ठेवलेलं बरं.
 
a3tshu@gmail.com
 
पुढील स्लाइडवर वाचा, रियाझ नाही तर मी नाही...
बातम्या आणखी आहेत...