आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दम्याच्या अतितीव्र झटक्यापासून सावध राहा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबातील व्यक्तींना दमा असल्यास , पुढील पिढीलाही होऊ शकतो हा आजार
हा एक अ‍ॅलर्जीचा आजार आहे :
बाल दमा हा आजार लहान मुलांमध्ये सवर्साधारण: आढळतो. या आजारामध्ये जेव्हा दम्याचा अतितीव्र झटका येतो, तेव्हा लहान मुलांना किंवा बाळांना दवाखान्यात त्वरित दाखल करून औषधोपचार करावे लागतात, नाहीतर मुलांचा किंवा बाळांचा जीव धोक्यात जाऊ शकतो किंवा मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. हा आजार इतर कुटुंबातील व्यक्तींना असू शकणार्‍यांच्या पुढील पिढीलाही हा आजार होऊ शकतो. हा एक अ‍ॅलर्जीचा आजार आहे. ज्यामुळे फुप्फुसातील श्वसननलिकेमध्ये सूज येते.
श्वास घेण्यास रात्री त्रास होणे, दम-धाप लागणे :
वातावरणातील होणारे बदल, धूळ, धूर, थंड हवा, ढगाळ वातावरण, श्वसनलिकेचा दाह करणारे वातावरणातील घटक (रासायनिक पदार्थ, धूर) इत्यादींमुळे फुप्फुसांचा बचाव करण्याकरिता फुप्फुसांमधील छोट्या श्वसननलिकांमध्ये सूज येते. बरेच महिने आणि काही वर्षे जर ही सूज सतत किंवा वारंवार राहिली, तर फुप्फुसांमधील श्वसननलिकेच्या पेशींची संख्या व आकार वाढतो. हा बदल नंतर कायमस्वरूपी होऊन फुप्फुसाचे कार्य कमी होते व रुग्णांना (लहान मुलांना आणि बाळांना) श्वास घेण्यास जास्तच त्रास होतो, दम लागतो, धाप भरते.
लक्षणे :
थोडा वेळ खोकला येऊन पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा, फेसाळ कफ पडतो, छातीतून आवाज येणे (नळीतून हवा फुंकल्यासारखे), श्वासाचा वेग वाढणे, श्वास घेण्याची गती वाढणे, छातीवर दाब आल्यासारखे वाटते, धाप लागणे, दम लागणे. हा सर्व त्रास रात्रीमध्येच जास्त वाढतो. आजारचा तीव्र उद्रेक जेव्हा होतो, तेव्हा मुलांना श्वास घेण्यास खूप त्रास होतो, बोलता येत नाही, जीभ आणि ओठ निळसर पडतात (शरीराला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे), चेहर्‍यावरील भाव घाबरल्यासारखे आणि अति चिंताजनक दिसतात.
आजार वाढवणारे घटक :
जंतुसंसर्ग, अ‍ॅलर्जी, दाह करणारे घटक (धूर, धूळ, तीव्रगंध, रासायनिक पदार्थ इ.), व्यायाम, धावपळ, मानसिक ताणतणाव, अतिभावनाशील स्वभाव, वातावरणातील बदल, दमट वातावरण.
औषधोपचार पद्धती :
या आजारामध्ये अ‍ॅलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी इ. पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. इतर औषधोपचार पद्धतीमध्ये रुग्णांना बारीक झालेली श्वसननलिका मोठी होण्यासाठी औषध दिले जाते.
होमिओपॅथिक औषधोपचारपद्धती :
या औषधोपचार पद्धतीमध्ये रुग्णांची खोलवर विचारपूस केली जाते. यामध्ये आजाराविषयी सखोल माहिती विचारून आजाराचे मूळ कारण शोधले जाते, समजून घेतले जाते, जाणून घेतले जाते की, ते मानसिक, शारीरिक, वातावरणीय बदल इ. पैकी काय आहे. रुग्णाच्या शरीराचा, मनाचा, राहणीमानाचा, खाण्या-पिण्यातील आवडी-निवडीचा, तहान, भूक, झोप इ. चा सखोल अभ्यास करून औषध दिले जाते. ज्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढून आजार कायमस्वरूपी बरा होण्यास मदद करते. सुरुवातीला औषधामुळे आजाराची तीव्रता कमी होते व काही काळानंतर आजार कायमस्वरूपी बरा होतो.
नैसर्गिकरीत्या आजार बरा होतो :
आजार दुरुस्त होण्यासाठी वेळ का लागतो, याचे कारण म्हणजे रुग्ण सर्व प्रकारची औषधोपचार पद्धती करून व तरीही गुण न आल्यामुळे उशिरा होमिओपॅथिक औषधी घेण्यास येतो. या औषधीमुळे आजार नैसर्गिकरीत्या बरा होत असल्यामुळे जो वेळ लागतो तो रुग्णांना देणे गरजेचे असते, अशा वेळी घाई-गडबड चालत नाही.
drvijayorg@gmail.com.