आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्थिभंग : ‘ए ओ’ पद्धत, हाडे जुळण्याचे प्रमाण 98 टक्के

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये हाडे मोडलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत मोडलेल्या हाडांवर परंपरागत पद्धतीने उपचार केले जात असत. या पद्धतीमुळे रुग्णाला बराच काळ झोपून राहावे लागत असे किंवा दैनंदिन व्यवहार लवकरात लवकर करता येत नसत. विसाव्या शतकापासून उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत.


* हाडांचे तुकडे व्यवस्थित बसवून ते प्लेट स्क्रूच्या साहाय्याने बसवले जातात : सन 1960 पासून स्वित्झर्लंडमधील डॉक्टरांनी एक संस्था स्थापन केली. मोडलेली हाडे बसवण्याची नवीन पद्धती शोधून काढली. या पद्धतीला ‘ए ओ’ पद्धत म्हणतात. या पद्धतीत मोडलेल्या हाडांची जागा शस्त्रक्रिया करून उघडली जाते. हाडांचे तुकडे व्यवस्थित बसवून ते प्लेट स्क्रूच्या साहाय्याने बसवले जातात. या पद्धतीमुळे रुग्ण हात-पाय लगेच हलवू शकतो. त्याला प्लॅस्टर घातले जात नाही. या शस्त्रक्रियेचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे. यामध्ये जंतुसंसर्ग होऊन हाडांमध्ये पू होण्याची शक्यता असते.


* बायोलॉजिकल फिक्सेशन पद्धती : गेल्या दशकापासून मोडलेली हाडे जोडण्याच्या अत्याधुनिक पद्धतीचा शोध लागला. यालाच बायोलॉजिकल फिक्सेशन असे म्हणतात. यामध्ये मोडलेल्या हाडांची जागा न उघडता हाडांचे तुकडे दुरूनच एकमेकांजवळ आणून व्यवस्थित बसवले जातात. या प्रकारे हाडे बसवण्याच्या पद्धतीला ‘इनडायरेक्ट रिडक्शन’ म्हणतात.यासाठी विशिष्ट प्रकारचे शस्त्रक्रि येचे टेबल लागते. त्याचबरोबर अत्याधुनिक उपकरणे लागतात. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया न करता हाड बसवले जाते. त्यामुळे हाडांत पू होण्याचा धोका टाळता येतो. रुग्णाला लवकरात लवकर मोडलेले हात किंवा पाय पूर्वीप्रमाणे वापरता येतो. या पद्धतीत हाडे बसवल्यानंतर मोडलेली जागा न उघडता हे अस्थिभंग पुढील पद्धतीने जोडता येतात.


* हाडात नेल घातला जातो व नंतर स्क्रू बसवले जातात : स्टेलनेस स्टील नेल (सळई) मांडीचे हाड, गुडघ्याखालचे हाड व दंडामधील आदी हाडे बसवण्यासाठी याचा वापर करतात. यामध्ये पायातील हाड जोडण्यासाठी रुग्णाला अस्थिभंग टेबलावर झोपवले जाते व हाडांचे तुटलेले भाग जवळ आणले जातात. मांडीच्या वरच्या भागात फक्त इंचाचा छेद घेतला जातो. यानंतर ‘सी आर्म’ या अत्याधुनिक उपकरणाद्वारे टी.व्ही.वर बघून हाडात नेल घातला जातो व नंतर स्क्रू बसवले जातात. अशा प्रकारे उपचार केल्यामुळे हाडे जुळण्याचे प्रमाण 98 टक्के इतके जास्त आहे; परंतु यासाठी महागडी उपकरणे व योग्य प्रशिक्षण यांची गरज असते.