आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातील शिक्षणासाठी आकर्षक शिष्यवृत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदेशातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये शिष्यवृत्तीसह शिक्षण घेण्यासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत-


*युनिव्हिर्सिटी ऑफ शेफील्ड इंडिया पदवीपूर्व मेरिट स्कॉलरशिप : इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डतर्फे तीन भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डमधील कुठल्याही विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा व त्यांच्या अभ्यासक्रमाच्या सत्राची सुरुवात सप्टेंबर 2013 मध्ये व्हावी.
शिष्यवृत्तीचा तपशील : या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा 6000 पाउंड्सची मासिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डच्या www.shefidd.ac.ule या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : विहित नमुन्यातील तपशिलावर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 28 जून 2013.
*एनआयआयटी युनिव्हर्सिटीची एमटेक स्कॉलरशिप : एनआयआयटी युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया येथील जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिममधील एमकेट अभ्यासक्रमासाठी भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी जीआरई, जीएटीई यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व जीआरई/गेट प्रवेश परीक्षेतील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीचा तपशील : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या एमटेक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्याशिवाय सवलतीच्या शैक्षणिक शुल्काचाही लाभ देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एनआयआयटी युनिव्हर्सिटीच्या www.niitunireusity.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2013.
* युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्पटनची एमबीए अभ्यासक्रम शिष्यवृत्ती : इंग्लंडमधील साउथम्पटन विद्यापीठातर्फे निवडक भारतीय विद्यार्थ्यांना एमबीए करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थी पदवीधर असावेत, त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीतकमी 60% असायला हवी व त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्पटनचा एमबीए अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा.
शिष्यवृत्तीचा तपशील : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 3000 ते 5000 पाउंड्सची शिष्यवृत्ती त्यांच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या कालावधीदरम्यान देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती योजनेसंबंधी अधिक माहिती व तपशिलासाठी साउथम्पटन विद्यापीठाच्या www.southaupton.ac.uk या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : विहित
नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 30 जून 2013.