आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकाराला घाला आळा, अकस्मात मृत्यू टाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदयविकाराची कारणे : मानवाचा आहारविहार, मानसिक-शारीरिक आरोग्य, आध्यात्मिक व्यवस्था इ. मधील संतुलन बिघडल्यास हृदयविकार उत्पन्न होतो. परंतु त्याला इतरही अनेक कारणे आहेत. व्यसनाधीनता, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, मनाचा बिघडलेला समतोल, वाढते ताणतणाव, अवास्तव अपेक्षा, एकलकोंडेपणा आदींमुळेही हृदयविकार होऊ शकतो. हृदयाच्या रक्तवाहिनीतील पातळ चरबीचे पापुद्रे फुटणे किंवा हृदयाच्या रक्तवाहिनीची फडफड होणे अशीही कारणे आहेत. हृदयविकाराच्या कारणांचा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येईल की, अनेक कारणे ही ‘एस’ पासून सुरू होतात.

1) S- Sex: हा विकार पुरुषांना व हल्ली तरुण पिढीला जास्त होतो. मासिक पाळी बंद झाल्यावर स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण हे सारखेच होते.
2) S-Smoking : धूम्रपान करणार्‍या किंवा तंबाखू-गुटखा या गोष्टींचे सेवन करणार्‍या व्यक्तींना याचा धोका जास्त असतो.
3) S-Sugar : मधुमेही लोकांत हृदयविकाराचे प्रमाण 10 ते 20 टक्के जास्त असते व ते गंभीर स्वरूपाचे असते.
4) S-Saturated Fats : अति चरबीयुक्त व अति कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थांचे सेवन.
5) S- S- Systolic & Amp; Aiastolic Blood Pressure : उच्च रक्तदाब.
6) S- Sedentary Lifestyle : निष्क्रियता व बैठी जीवनद्धती
7) S- Smoke : प्रदूषण
8) S-Sleep Disturbances : अपुरी झोप / निद्रानाश
9) S- Stress And Stain : मानसिक ताणतणाव
10) S-Soloness : एकाकीपणा
11) S- Overselfrespect : अति स्वाभिमान व टाइप-ए स्वभाव
12) S- Fast Food : चमचमीत खाद्यपदार्थांचे सेवन
13) S-Surfing of TV Channels
14) S-Excessive Sodiun : सोडियमचा अतिरेक
15) S- Sensitive Nature : भावनाप्रधान असणे.
16) S- Syndrome : अति लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, इन्सुलीन रेझिस्टन्स
17) S- Sudden Changes In Temperature : अतिउष्णता व अति थंडी उतार-चढाव
18) Emotional Heart Syndrom : सध्या तरुण पिढीमध्ये कमी वयात येणार्‍या हार्ट अ‍ॅटॅक किंवा हृदयशूलचे महत्त्वाचे कारण, आकस्मात बसणारा मानसिक धक्का, ताण, पचवता न येण्यासारखे दु:ख, संताप, अति चिडचिड, अपेक्षाभंग, भावनाविवशता यामुळे शरीराच्या सिंपेथेटिक नर्व्हस सिस्टिमवर ताण पडून हृदयगती वाढणे, उच्च रक्तदाब वाढणे, हृदयातील बारीक चरबीची फूट फुटणे यामुळे अकस्मात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
काही गोष्टी आनुवांशिक असतात. अमुक व्यक्तीलाच हृदयरोग का झाला? याबद्दल जेनेटिक संशोधन सुरू असून शास्त्रज्ञ आधुनिक अशा जनुकांचा शोध लावत आहेत. एका भारतीय चाचणीमध्ये शहरी भागात 30 ते 40 वयोगटात 10 टक्के हृदयविकार आढळून आला.

- हृदयविकार टाळण्यासाठी.....
हृदयरोग टाळण्यासाठी तंबाखू, धूम्रपान, गुटखा आणि मद्यपान या हृदयाच्या नाश करणार्‍या व्यसनांपासून दूर राहा. आपल्या आत्मबलावर व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यसनमुक्त व्हा. ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, इकोकार्डिओग्राफी, डॉपलर, छातीचा फोटो, रक्तातील चरबीचे प्रमाण शोधणे, स्ट्रेस थॅलियम किंवा सीटी अ‍ॅँजिओग्राफी, गरज असल्यास कोरोनरी अ‍ॅँजिओग्राफी करून घ्यावी. आपला रक्तदाब मर्यादित, नियंत्रित ठेवावा.

- आहारविहार व मनस्वास्थ्य....
चरबीयुक्त शाकाहार, मांसाहार, अंडी टाळा. आहारात हिरव्या पालेभाज्या, चोथायुक्त पदार्थ, फळभाज्या, फळे, धान्य : मोड आलेली कडधान्ये, आवश्यक ती प्रथिने व योग्य तेवढेच स्निग्ध पदार्थ असावेत. फळे, पालेभाज्या, फळभाज्या याचा वापर जास्त करावा. भाज्या परत-परत उकळणे व अन्नपदार्थ तळणे टाळावे. गायीचे दूध, ताक घ्यावे. रोज साधारण 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. शक्यतो लोणी, चीज, जास्त प्रमाणातील तूप व तेल टाळावे. जेवणात मोनोअर सॅच्युरेटेड व पॉली अनसॅच्युरेटेड व ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड जास्त असणारे सोयाबिन, करडई, मका किंवा जवसाचे तेल वापरावे. नियमित व्यायाम, ध्यानधारणा व योगासने करावीत. सन 1977 मध्ये जगात सर्वप्रथम कोरोनरी अँजिओप्लास्टी एका बलूनद्वारा डॉक्टर अँड्रीओज ग्रुटझिक यांनी केली. सुरुवातीच्या काळात फक्त बलून अँजिओप्लास्टी असल्यामुळे वारंवार हृदयाची रक्तवाहिनी बंद पडण्याची शक्यता 25 ते 30 टक्के होती. त्यानंतर हळूहळू साध्या धातूंच्या स्टेंटचा शोध लागला. आता बलून अँजिओप्लास्टीबरोबर विशिष्ट धातूचा स्टेंट हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये वापरण्यात आल्यामुळे परत ती रक्तवाहिनी बंद पडण्याचे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांवर आले. रुग्णांनी कोणत्याही परिस्थितीत औषधोपचार बंद करता कामा नये, जेणेकरून स्टेंटची कार्यक्षमता वाढून अडथळे येण्याचे टळते. प्रायमरी किंवा प्राथमिक अँजिओप्लास्टी म्हणजे हृदयविकाराच्या झटक्यात त्वरित केलेली अँजिओप्लास्टी निर्विवादपणे आज जगात सगळ्यात राजमान्यता असलेली व आधुनिक उपचारप्रणाली असलेली अशी ही पद्धत आहे.