आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद आणि उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या सर्वांना माहीत आहे, आयुर्वेद म्हणजे आयुष्यवर्धक करण्यासाठी सांगण्यात आलेले शास्त्र. शास्त्र शब्द ज्याअर्थी वापरतो, त्यावेळी ते सर्वमान्य असते. त्याला पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही. आजचा आयुर्वेद, आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत असणारे दोष, याच विषयाची आपण आज कारणमीमांसा पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार चिकित्सा संपूर्ण होण्यासाठी चिकित्सा चतुष्पादांचा समन्वय असणे गरजेचे असते. चिकित्साचे चार पिलर खालीप्रमाणेआहेत.
1. वैद्य
2. औषध
3. रुग्ण
4. परिचारक (रुग्णाचे-सोबती, सहायक, सल्लागार)
1.वैद्य :
आयुर्वेद शिक्षण प्रणालीमध्ये असणा-या वेगवेगळ्या त्रुटींमुळे योग्य त्या आयुर्वेदाच्या शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहतो, असे दिसून येते. आयुर्वेदाचे शिक्षण हे गुरू-शिष्य परंपरेने अवगत करावे लागते. गुरुशिवाय ही विद्या पूर्णपणे समजावून घेणे थोडे कठीणच आहे. पण आज असे दिसून येते की, चांगल्या गुरुजनांची व चांगल्या शिष्यगणांची आयुर्वेदामध्ये खूप गरज आहे. विद्यार्थ्यांची मानसिकताही विद्येच्या अर्थी असणे महत्त्वाचे आहे.
2. औषध :
भारतामध्ये अनेक औषधी भेसळयुक्त आढळतात. ही भेसळ फक्त औषधांमध्येच नव्हे तर अन्न धान्य, दूध, चहा, साखर अशा अनेक पदार्थांमध्येही भेसळ दिसून येते. बाजारात मिळणारा गुडूची सत्व हा स्वरसही भेसळयुक्त starch powder असतो. पूर्वीच्या काळीही अशा प्रकारे भेसळ व्यापा-यांकडून होत असे. याला आयुर्वेदामध्ये योगिक दोष म्हणतात.
आयुर्वेदामध्ये औषधी करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा खूप कमी प्रमाणात निसर्गामध्ये सापडतो, पण असे पदार्थ बाजारात खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. याचे कारण त्या कच्च्या मालामध्ये होणारे भेसळ आहे हे लक्षात येते. उदा. शिलाजतू. आज मितीस जनसामान्यामध्ये असा ढोबळमानाने एक गैरसमज पाहावयास मिळतो की आयुर्वेदिक औषधामध्ये जी धातूंची भस्मे वापरली जातात ती सरसकट यकृत किंवा किडनीसाठी हानिकारक ठरतात परंतु एक आयुर्वेदाचा निष्ठावंत अनुयायी व रसशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने मी येथे असे नमूद करू इच्छितो की, औषधशास्त्राच्या सिद्धांतानुसार विषही योग्यमात्रेत व योग्य संस्काराने अमृताप्रमाणे काम करू शकते, कारण संस्कारो ही गुनान्तरो दान:म म्हणून आयुर्वेदिक औषधामध्ये वापरली जाणारी धातूंची भस्मे ही त्यावर केल्या जाणा-या विशिष्ट संस्कारांनी त्यांचे मूळ विषरुपी गुणधर्म सोडून मानवास अमृततुल्य ठरतात, परंतु सध्याच्या बाजारयुगात औषधी परंपरेचे योग्य पालन न केल्याने व भेसळीच्या शापामुळे अमृततुल्य भस्मे विषरूपात जनमानसांमध्ये गैरसमज पसरवत आहेत.
यासाठी आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी वैद्यांनी एकत्र येऊन याविषयी जागरुकता करावी व काळाच्या कसोटीवर आपले शास्त्र तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहे असे सांगावे.
3. रुग्ण :
आयुर्वेद शास्त्रावर रुग्णांचा अविश्वास दिसून येतो. याचे कारण आयुर्वेद चिकित्सेला खूप उशिरा गुण येतो. अशा प्रकारे असणा-या वेगवेगळ्या गैरसमजुती आहेत. ज्या शास्त्राने गेल्या दोन हजार वर्षापेक्षा जास्त काळ वेगवेगळ्या रोगावर योग्य असे उपचार करून यशस्वी वाटचाल करत आहे. त्यावर अविश्वास दाखवणे योग्य नाही.
4. परिचारक (रुग्णाचे-सोबती, सहायक, सल्लागार) :
बाजारामध्ये असे दिसून येते की, रुग्ण योग्य तो वैद्यांचा सल्ला न घेताच आयुर्वेदिक औषधी घेतात. त्यामुळे भविष्यात दुष्परिणाम होऊ शकतात. उदा. पोट साफ होण्याकरिता घेण्यात येणारे औषध जर दीर्घकाळ घेतले असता, आतड्यांचे विविध आजार उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे रुग्णांनी अशी औषधे वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेणे योग्य राहील.
आपल्याला बाजारामध्ये मुतखड्याचे औषध मिळेल. डायबेटीस चूर्ण मिळेल. शक्तीवर्धक मिळेल. कावीळवरचे औषधे मिळेल. असे फलक पाहावयास मिळतात. पण यातील कोणते औषधे आपल्यासाठी योग्य आहेत हे मात्र शास्त्र जाणून सल्ला देणारा वैद्यच सांगू शकतो.
आयुर्वेद किंवा हर्नल औषधांना side effect नाही, असे सांगण्यात येते, पण खरे तर त्याला effect असणारच. त्यामुळे अशा प्रकारे फलक पाहून आपली फसवणूक करून घेऊ नका. कावीळ, मधुमेहासारखे आजार रुग्णांमध्ये कोणत्या अवस्थेत आहेत, हे पाहूनच त्यावर योग्य ती औषधे घेणे योग्य ठरेल. पूर्वीच्या काळी हे शास्त्र राजाश्रय असल्याने त्यावर ज्ञानसभा व्हायच्या. त्यातून चांगलेच संशोधन मिळायचे. अशा या महान शास्त्रासाठी काहीतरी चांगले शास्त्रशुद्ध व बहुमोल योगदान करा.