आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azim Premji University's Special Post Graduat Sllyabus

अझीम प्रेमजी विद्यापीठाचे विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक



अझीम प्रेमजी विद्यापीठातर्फे शिक्षण व विकास विषयांतर्गत एमए या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 2013-2015 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
’अभ्यासक्रमांची पार्श्वभूमी : या अभ्यासक्रमांमध्ये मुख्यत: पुढील विषयांचा समावेश करण्यात आला .
’एमए एज्युकेशन : या अभ्यासक्रमामध्ये शालेय अभ्यासक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व व्यवस्थापन या विषयांवर भर देण्यात येणार नाही.
’एमए इन डेव्हलपमेंट : यात विकासविषयक धोरण, विकास प्रकल्पांची अंमलबजावणी, नेतृत्व, जीवनस्तरमान विकास, पोषण पद्धती, विकासविषयक कायदे व
त्यांची अंमलबजावणी यांवर भर देण्यात येतो.
’विशेष सूचना : वरील दोन्ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
’आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव : कुठल्याही विषयातील पदवीधर व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. संबंधित क्षेत्रातील अनुभवी अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.
’निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक 36 परीक्षा केंद्रांवर 24 फेब्रुवारी 2013 रोजी घेण्यात येईल.
अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकांच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याद्वारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.’भविष्यकालीन संधी : निवड झालेल्या उमेदवारांचा त्यांनी संबंधित अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या शैक्षणिक व विकासविषयक प्रकल्पांमधील रोजगार- संधींसाठी प्राधान्यतत्त्वावर विचार करण्यात येईल.
अझीम प्रेमजी फाउंडेशनला त्यांच्या शैक्षणिक व ग्रामीण आणि सामाजिक प्रकल्पविषयक कामासाठी आगामी 5 वर्षात सुमारे 3000 प्रशिक्षित उमेदवारांची गरज निश्चितपणे भासणार आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
’शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती : निवड झालेल्या उमेदवारांपैकी निवडक व गरजू उमेदवारांना त्यांची पात्रता व गरजेनुसार शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती प्रेमजी फाउंडेशनतर्फे देण्यात येईल.
’अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या 1800262001 या विनाशुल्क दूरध्वनीवर संपर्क साधावा अथवा फाउंडेशनच्या www.ariupreuyiwhirusity.edu.inयेथे भेट द्या.

’अर्ज पाठवण्याचा पत्ता व तारीख : भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, पिकेल पार्क, ‘बी’ ब्लॉक, पीईएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रॉनिक सिटी, होसूर रोड, बंगळुरू-560 100 या पत्त्यावर 8 फेब्रुवारी 2013 पर्यंत पाठवा.

dattatraya.ambulkar@gmail.com