आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधाचे दात, योग्य काळजी घ्यायलाच हवी!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन-तीन दिवसांपूर्वीची गोष्ट असेल... 5 वर्षांचा तन्मय आईसोबत गाल फुगलेल्या व अगदी रडवेला चेहºयाने क्लिनिकमध्ये आला. त्याच्या या अवस्थेचे कारण म्हणजे त्याचे दात किडलेले असल्याचे तपासणीअंती आढळले. गेल्या आठवडाभरात त्याला केवळ पातळ आहारच खाता येत असल्याचे त्याच्या आईने सांगितले.
दुधाचे दात आहेत, त्यामुळे पडतीलच कधी ना कधी... मग काळजी कशासाठी घ्यायची? असा गैरसमज पालकांत असतो. मात्र, दुधाचे असले तरी या दातांचीही योग्य काळजी घ्यायलाच हवी, याकडे अनेक पालक दुर्लक्ष करतात.
लक्षात घ्या - दुधाच्या दातांमुळे जबड्याची तसेच हिरड्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
नॅचरल स्पेस मेन्टेनर अर्थातच येणाºया पक्क्या दातांसाठी जागा राखून ठेवली जाते.
दुधाच्या दातांमुळे चर्वण अर्थातच आहाराचे तुकडे करण्यासाठी व आपोआपच कॅलरीज मिळवून देण्यासाठी याचा उपयोग होतो.
सौंदर्यविषयक उपयोग अर्थात लहान मुले गोंडस दिसण्यात दुधाचे दात महत्त्वाचे असतात.
लहान मुलांना खाण्याची सवय लागण्यासाठी या दातांचा उपयोग होतो.
पोषक वातावरण न मिळाल्याने गर्भात बाळाची योग्य वाढ होत नाही. त्याप्रमाणेच दुधाचे दात किडले, त्यात पू झाल्यास जंतूंचा प्रादुर्भाव येणाºया दातावर होतो.
शिवाय कॅल्शियमची कमतरता व कमजोर दात आयुष्यभर त्रास देत राहतात, हे वेगळे सांगायला नको. दात जरी पडणार असले, तरी दात येण्याचे व दात पडण्याचे वय वेगवेगळे असते. वयाच्या सहा ते बारा वर्षांपर्यंत नैसर्गिकपणे दात पडतात; पण किडलेले दात असतील, तर भविष्यात येणारा दाताचा निरोगीपणा कायम राहील काय?
दात काढूनही टाकता येतात. मात्र, वयाच्या आधी दात काढल्याने येणाºया दातांसाठी जागा राखून ठेवायला हवी. नाही तर वेडेवाकडे दात किंवा दात न येण्याची समस्या उद्भवते.