आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजाेधर्माकडे हवे अाई-मुलीचे गांभीर्याने लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१.पाळी सुरू होणे, २.बाळंतपण, ३. रजोनिवृत्ती या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात, मनात अनेक बदल होत असतात. पाळी सुरू होणे म्हणजे बाल्यावस्था संपून तारूण्यावस्थेच्या पहिल्या टप्प्यांत प्रवेश करणे. मासिक पाळी हा स्त्रीच्या आरोग्याचा महत्वाचा पैलू आहे. पण आजकाल बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी ही कटकट वाटते, त्रास वाटतो. याची कारणे म्हणजे पाळीच्या ३-४ दिवस आधी व नंतर होणारा त्रास. बिघडणारे मानसिक संतुलन, चिडचिडेपणा, पोटदुखी. पण हे तत्कालिक दोष आहेत आणि ते आपण प्रयत्नपूर्वक घालवू शकतो. त्याचबरोबर अनियमित रजाेधर्म ही समस्या आज वाढली आहे. त्यामुळे PCOD सारखे विकार वयाच्या  १९-२० व्या वर्षातच मागे लागतात. त्याचे  गांभीर्य लक्षात येत नाही. पण त्यामुळे २१-२२ व्या वर्षांच्या मुलींना डायबिटीस, थॉयराईड हे विकार होतात.
 
रजाेधर्माबाबत अवडंबर माजवले जाते. समाजात अंधश्रध्दाही खूप अाहेत. या काळात स्त्री ही अपवित्र नसते. मात्र पूर्णपणे शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज असते. पूर्वीच्या जीवनशैलीत स्त्रियांना खूप कामे असायची. आपल्याकडे धार्मिकतेचा बडगा दाखवल्याशिवाय कोणतीही गोष्ट गांभीर्याने केली जात नाही म्हणून पूर्वीच्या काळी धार्मिकतेचा बडगा दाखवून हे ४ दिवस स्त्रीला सक्तीची विश्रांती  दिली जायची. पण यामागचे शास्त्रीय कारण समजून घेतलं. तर अंधश्रघ्दा पाळायची गरज नाही. पण काळानुसार यात बदल करणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पध्दत होती. त्यामुळे एखाद्या स्त्रीने  विश्रांती घेतली तर चालायचे. पण आजकाल शिक्षणानिमित्त बाहेर राहणे, नोकरी यांमुळे संपूर्ण विश्रांती शक्य होत नाही.
 
सुरूवातीपासूनच स्त्रीयांनी योग्य आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. सगळया भाज्या, मोड आलेली कडधान्ये, फायबरयुक्त फळे यांचा नआहारात समावेश असणे गरजेचे आहे. कॅल्शिअम वाढीसाठी नागलीचा वापर आहारात करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दूध व घरच्या तूपाच सेवन नित्य आहारात असलंच पाहिजे. हे आपण व्यायामातून पचवणार आहोत. आता व्यायाम कसा करायचा ते आपण पाहू. मुलींसाठी सुरूवातीपासून दोरीच्या उड्या हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. त्याचबरोबर योगाभ्यासाची जोड ही हवीच. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्कार, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, चक्रासन, धनुरासन, त्रिकोणासन, कपालभारती, त्रिबंधयुक्त, प्राणायाम, भ्रामरी, स्पंदनांसहित जपसाधना व ओंकार याचा परिणाम आपल्या हार्मोनल ग्रंथीवर होतो आणि त्यामुळे हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखले जाते. हे सगळ जर आपण सुरूवातीपासूनच केलं तर याचा फायदा मोनोपॉजच्या (पाळी बंद व्हायच्या) काळात होतो. कारण त्या काळात चिडचिडेपणा वाढतो. छातीत धडधडणे, भीती वाटणे या गोष्टी वाढतात. त्यामुळे संपूर्ण घरादाराच मानसिक स्वास्थ्य बिघडते.  प्रत्येक स्त्रीने आरोग्यासाठी दिवसातला १ ते १.५ तास  या प्रक्रियेसाठी दिला पाहीजे. त्यामुळे  प्रत्येक कुटुंब आरोग्यसंपन्न, सुखी, समाधानी होईल…पण…या सर्व प्रक्रिया योग्य मार्गदर्शका कडून समजून उमजून नीट शिकून अभ्यासाव्यात.
 
अात्मिक प्रगतीचे वरदान
जपान मध्ये १९४८ पासून नोकरदार स्त्रियांना या ४ दिवसांची पगारी रजा दिली जाते. त्यानंतर इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान, इटली या देशांमध्येही या प्रकारच्या रजा दिल्या जातात. आता या ४ दिवसांत नेमक स्त्रीने करायच काय? या कालावधीत स्त्री शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार होत असतात. शिवाय या कालावधीत स्त्रीच्या मानसिक व भावनिक क्षमतेत वाढ होत असते. त्यामुळे या ४ दिवसाचा फायदा स्त्रीने आत्मिक विकासासाठी व संतुलनासाठी केला पाहीजे. हे ४ दिवस मानसिक साधनेकरता अतिशय उपयुक्त व फायदेशीर आहे. या कालावधीत स्त्रीयांची ज्ञानेंद्रिये ही अधिक सक्षम असतात. याचा फायदा स्त्रीयांनी घ्यायला हवा. नियमित योगाभ्यासामुळे ताण-तणाव तर येत नाहीत. उलट पाळीच्या चक्राकडे पहाण्याची दृष्टी सुधारते व आत्मिक प्रगतीकरता दिलेले एक वरदानच असल्याचे जाणवते.
 
व्यायाम, योगाभ्यास आणि योग्य आहार हाच उपाय
हे चक्र साधारण वयाच्या साधारणत: १२ व्या वर्षापासून सुरू होते व वयाच्या ४५ वर्षांची होईपर्यंत चालू राहते व नंतर कायमचे बंद होते. या कालावधीत २-४ वर्षे कमी अधिक होवू शकतात. एकदा सुरू झालेले हे चक्र नियमीतपणे चालणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. पण अलिकडच्या काळात ९०% मुलींच्या बाबतीत सुरूवातीच्या १-२ वर्षातच हे चक्र अनियमित व्हायला सुरूवात होते. पण ही समस्या आहे हेच कुणाच्या लक्षात येत नाही. या समस्येच मूळ कारण आहे “बदलती जीवनशैली.’ बदलती जीवनशैली म्हणजे काय तर अयोग्य आहार. व्यायामाचा अभाव, म्हणून आपण आपल्या दिनचर्येत नित्य योगाभ्यासाचा अंतर्भाव केला पाहीजे. आधुनिक वैद्यकशास्त्रात या विकारांवर हार्मोन्सची इंजेक्शने, गोळया दिल्या जातात. पण हे उपाय तात्पुरते आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. या औषधांनी रोग पूर्णपणे बरा होत नाही. यावरचा १००% उपाय म्हणजे व्यायाम, योगाभ्यास आणि योग्य आहार हाच आहे. .
 
- स्त्री आरोग्य हा विषय सर्वात महत्वाचा आहे. कारण संपूर्ण मानवजीतीचे आरोग्य त्यावर अवलंबून असते.  खरंतर हा विषय  खूप िवस्तृत आहे. कारण निसर्गाने स्त्री शरीर हे वेगळया पध्दतीने तयार केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्त्रीच्या जीवनात महत्वाचे असे तीन टप्पे असतात.  गर्भाशय शुध्दी नीट होत नसल्याने वंध्यत्वासारखी समस्या उद‌्भवते. त्यामुळे रजाेधर्म नियमित कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहीजे. याबाबतच्या कोणत्याही विकाराकडे प्रत्येक आई व मुलीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...