आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निरामय आणि टवटवीत, सुंदर त्वचेसाठीचं गाइड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरामय व टवटवीत त्वचेसाठीचं गाइड अस या पुस्तकाच स्वरूप व ओळख आहे. पुस्तकाला तीन मान्यवरांनी छोटेखानी प्रस्तावना दिलीय. त्यातील हर्ष मारिवाला आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, हे पुस्तक आपल्या सगळ्यांनाच आपल्या त्वचेचं आरोग्य सांभाळण्यासाठी आणि येणार्‍या प्रत्येक दिवसागणिक आपण अधिकाधिक चांगलं दिसावं यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. याचप्रमाणे डॉ. अंजली तेंडुलकर म्हणतात की, तुम्ही जे खाता, तसे तुम्ही दिसता, हे सूत्र सांगणार, त्वचेच आरोग्य आणि सौंदर्य या जिव्हाळ्याच्या विषयावरचं हे खास पुस्तक आहे. तसेच डॉ. आदिती गोवित्रीकर म्हणतात, प्रत्येकाने स्वत:च्या शरीराची त्वचेचीही काळजी आंतरबाह्य पद्धतीनं कशी घ्यावी हे तुम्हाला या पुस्तकात खर्‍या अर्थाने कळेल.

याशिवाय सुंदर त्वचेसाठी काय आणि केव्हा खावं, तुमच्या त्वचेचा प्रकार कसा माहिती करून घ्यावा, त्वचेची निगा कशी राखावी, तुमच्या त्वचेबद्दल असं बरंच काही जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचाव लागेल. म्हणजे दिवसभरात किती सुकामेवा खाल्ला पाहिजे ऑक्सिजन त्वचेला खरंच हानी पोहोचवतो का, आहारात खरंच विविध रंगांची जरुरी आहे का, लाल वाइन तुमच्यासाठी चांगली आहे का, नकारात्मक कॅलरिज कोणत्या. याची माहिती येथे मिळणार आहे. 207 पानाच्या शिस्तबद्ध विभागणीत हे पुस्तक विभागले आहे. त्यात परंपरेप्रमाणे लेखिकेचे मार्गदर्शनपर मनोगत अर्थात पुस्तक का लिहावं लागेल हे आहे त्यात त्वचेसंबंधीच्या समस्यांची माहिती, मानसिकता व थोडक्यात तौलनिक अभ्यास व विश्लेषण आहे. अर्थात वर दिलेल्या तीन मान्यवरांच्या प्रस्तावनेने पुस्तकाचे वेटेज वाढले आहे. पुस्तकाची सुबक छपाई व समर्पक मुखपृष्ठ पुस्तकाचा दर्जा स्पष्ट करत. अनुक्रमणिकेत हितगुज - त्वचेविषयी, स्वत:च्या त्वचेशी ओळख करून घ्या, त्वचेसाठीचा आहार, आज रात्री साखर खाणं टाळा, फक्त स्नायूंनाच नाही..., अति सडपातळपणा नकोच, अ‍ॅँटिऑक्सिडंट्सना समजून घेताना, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स - आपली गरज, क्षमता वनस्पतींची, तुमच्या जीवनात रंग भरा, त्वचेसाठी उत्तम आहाराची बाराखडी, त्वचेच्या काळजीचं नियोजन - सकाळी आणि रात्री या सर्व खास प्रकरणांसह पुस्तकात खास त्वचेसाठी उपयुक्त पाककृती हे 40 पानांचे विशेष व वेगळे प्रकरण आहे. यात तिन्ही ऋतुतील पदार्थांसह सकाळ, दुपार, सायंकाळी कोणते पदार्थ व पेये घ्यावीत त्याचे काय काय फायदे आहेत. ते शास्त्रीयदृष्ट्या सांगितलेले आहे.

ग्रीन टी, भाज्यांचे रस, गाजर बदाम खजूरचे थंड पेय, स्ट्रॉबेरी स्मुदी, फळ आणि नट्सची स्मुदी, बीटरूट डिप, लेट्युस-बटाटा आणि टोमॅटो यांचं रायतं, आंब्याचा साल्सा यासह सॅलड भेळ, भाज्यांचे सॅलड आदी त्वचेस उपयुक्त फळ आणि भाज्या व सुकामेव्याच्या पाककृती सांगितल्याने पुस्तक परिपूर्ण झालं असं वाटतं. जाता जाता निरोगी त्वचेसाठी कानमंत्र वा टिप्स द्यायला लेखिका विसरल्या नाहीत. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे शेवटी निरोप व ऋणनिर्देश व लेखिका परिचय आहे.

पुस्तकाचे नाव : आहारातून सौंदर्य
लेखिका : अपर्णा संथानम, अनुवाद : संध्या रानडे
प्रकाशन : अमेय प्रकाशन, पुणे
पाने : 207, मूल्य : 200 रुपये