आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhaghashree Kenge Article About Google Docs, Divya Marathi

गुगल डॉक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगल डॉक्स हे इंटरनेटवर मोफत उपलब्ध असलेले वेबबेस्ड अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग विविध डॉक्युमेंट्स आणि स्प्रेडशीट्स करण्यासाठी होतो. या फाइल्स तुम्ही तयार करू शकता, संपादित करू शकता आणि सेव्ह करूनही ठेवू शकता. या अ‍ॅप्लिकेशनचे वैशिष्ट्य म्हणजे हे तयार केलेले डॉक्युमेंट्स तुम्ही कोणत्याही संगणकावरून उघडून (access) शकता. त्यासाठी मात्र तुमच्याकडे इंटरनेट आणि ब्राउझर हवा.

तुमच्या गुगल अकाउंटद्वारे तुम्ही गुगल डॉक्स इम्पोर्ट करणे, नवीन तयार करणे, एडिट करणे, अपडेट करणे आदि गोष्टी करूशकता. तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळे फाँट वापरता येतात, त्याचबरोबर वेगवेगळे formula वापरता येतात, याद्या करता येतात, टेबल बनवता येतात आणि चित्रही वापरता येतात. गुगल डॉक्स बहुतेक सगळ्या प्रेझेंटेशन सॉफ्टवेअरबरोबर आणि वर्ड प्रोसेसरबरोबर वापरता (compatible) येते. तुम्ही केलेले काम वेबपेजच्या स्वरूपात इंटरनेटवर टाकू शकता. किंवा ते ताबडतोब छापूही शकता. ज्याने डॉक्युमेंट तयार केले आहे तो ठरवू शकतो कोणी ते बघायचे. त्यामुळे व्यवसायासाठी, ब्लॉग लिहिण्यासाठी किंवा लोकांसाठी आपले काम दाखवण्यासाठी गुगल डॉक्स अत्यंत उपयुक्त आहे.

भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले व्यावसायिक / लेखक एकाच वेळेला एकाच फाइलवर गुगल डॉक्समध्ये काम करू शकतात. टीममधल्या एखाद्याने केलेले बदल कुठे केले, कधी केले हे बाकीच्या टीममधल्या लोकांना सहजपणे कळू शकतात. तयार झालेले डॉक्युमेंट प्रत्येकाच्या संगणकावर तर राहतेच त्याचबरोबर ऑनलाइनही असल्यामुळे डेटा जाण्याचा धोका टळतो. पण त्याचबरोबर हे डॉक्युमेंट ऑनलाइन असल्यामुळे कधी कधी कॉपीराइटचा प्रश्न उद्भवू शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुगल डॉक्स खालीलपैकी सर्व फाइल्सना सपोर्ट करते-
- Microsoft Word (.DOC and .DOCX)
- Microsoft Excel (.XLS and .XLSX)
- Microsoft PowerPoint (.PPT and .PPTX)
- Adobe Portable Document Format (.PDF)
- Apple Pages (.PAGES)
- Adobe Illustrator (.AI)
- Adobe Photoshop (.PSD)
- Tagged Image File Format (.TIFF)
- Autodesk AutoCad (.DXF)
- Scalable Vector Graphics (.SVG)
- PostScript (.EPS, .PS)
- Fonts (.TTF, .OTF)
- XML Paper Specification (.XPS)
- Archive file types (.ZIP and .RAR)
- Video file types (WebM, MPEG-4, 3GPP, MOV, AVI, MPEG-PS, WMV, FLV, Ogg)
मग आता गुगल डॉक्ससारखे उपयुक्त सॉफ्टवेअर ताबडतोब वापरायला सुरुवात करा.