आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला, ब्लॉग लिहूया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं आपले विचार व्यक्त करण्यासाठी वैयक्तिक डायरीचा वापर पूर्वीपासून बरेच जण करत आले आहेत. आता इंटरनेटच्या क्रांतीमुळे ही डायरी तुम्ही ऑनलाइन अपडेट करू शकता, जेणेकरून तुम्हाला जगभरातील वाचकांचा प्रतिसाद मिळू शकतो. ब्लॉग हे असे व्यासपीठ आहे जेथे तुम्ही तुमचे विचार, मतं आणि छंद ऑनलाइन मांडू शकता. म्हणजे एका अर्थी ही तुमची वैयक्तिक वेबसाइटच आहे जी सातत्याने अपलोड केली जाते. जो हे लिखाण करतो त्याला ब्लॉगर म्हणतात तर सातत्याने ब्लॉग लिहिण्याला ब्लॉगिंग म्हणतात. मायक्रोब्लॉगिंग (मर्यादित शब्दांचे) हा प्रकारही अत्यंत लोकप्रिय आहे. Twitter हे त्याचे लोकप्रिय उदाहरण.


लोक ब्लॉगिंग का करतात?
प्रत्येक माणसाला त्याची मतं, इच्छा, अपेक्षा असतात. ते अनेकांपर्यंत पोहोचावेत असे त्यांना मनापासून वाटत असते. इंटरनेट हे त्यासाठीचे अत्यंत सोपे, स्वस्त आणि जलद माध्यम. त्यामुळेच अगदी सामान्य माणसेही ब्लॉगिंगकडे वळली आहेत. प्रत्येक दिवशी तुमचे विचार अगदी हजारो लोकांपर्यंत तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून पोहोचवू शकता.


ब्लॉग नेहमीच वैयक्तिक नसतात
असा एक सर्वसाधारण गैरसमज आहे की ब्लॉगवर आपण फक्त वैयक्तिक गोष्टीच अपलोड करायच्या असतात. पण तसे अजिबात नसून तुमच्या छंदांविषयी, तुम्हाला एखाद्या गोष्टीचे ज्ञान असल्यास, माहिती द्यायची असल्यासही तुम्ही ब्लॉग लिहू शकता. काही कंपन्या आपल्या उत्पादनांची माहिती देण्यासाठी, प्रकाशने आपल्या पुस्तकांची माहिती देण्यासाठी ब्लॉगचा उपयोग करतात.


इंटरनेटवर अगदी पदार्थांच्या पाककृती, हवामान, वाहने, फॅशन, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, ललित लिखाण तसेच आध्यात्मिक माहिती आदि असंख्य व आपल्याला हव्या त्या विषयांवरील ब्लॉग आहेत. ते आपण शोधून काढण्याची खोटी.


ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला blogger, tumblr किंवा wordpress या साइटचे सदस्यत्व घ्यावे लागते. हे अर्थातच मोफत असते. तुम्ही लॉगइन केल्यावर तुम्हाला सर्वप्रथम ब्लॉगचे नाव निश्चित करावे लागते. नाव निश्चित झाल्यावर तिथे एक डिझाइनची टेम्प्लेट असते ती आपल्या विषयानुरूप निवडायची. त्यानंतर डिझाइन्सशी तांत्रिक सेटिंगही करायची. आता तुम्ही पोस्टिंगला सुरुवात करू शकता.


पोस्ट म्हणजे तुम्ही लिहिलेले लेख. तुम्ही जेव्हा पोस्ट अपलोड करता तेव्हा त्या तारीख आणि महिन्यानुसार अपडेट होतात. लेखांमध्ये तुम्हाला फोटो आणि व्हिडिओही अपलोड करता येतात. तुमच्या लेखांची अनुक्रमणिका आपोआप अपडेट होते. अशा पद्धतीने तुम्ही हे ब्लॉग अनेक वर्षं अपडेट करू शकता. तुमचे ब्लॉग बघून वाचक त्यावर प्रतिक्रिया नोंदवतात. त्यासुद्धा तेथे दाखवण्याची सोय आहे.


अशा पद्धतीने तुमची ऑनलाइन डायरी वाचकांसाठी उपलब्ध होऊ शकते. खूप लिहून झाले व तो वाचकांना आवडत असले तर त्याचे पुस्तकही निघू शकते.


bhagyashree@cyberedge.co.in