आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल ड्राइव्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागा पुरी न पडणे हे जसे आपल्याला घरात अनुभवायला येते, तसेच आपल्या संगणकावरही अनेक वेळा होते. परंतु संगणकावरच्या साठवणीचा प्रश्न गुगल ड्राइव्हने सोडवला आहे. गुगल ड्राइव्ह ही गुगलने फाइल स्टोरेजकरता 2012मध्ये सुरू केलेली सेवा आहे. येथे तुम्ही गुगल डॉक्स, स्प्रेडशीट्स, प्रेझेंटेशन्स, ड्रॉइंग्ज, फॉर्म्स इत्यादी साठवून ठेवू शकता.

सुरुवातीला 15GB पर्यंत आपल्या साठवणीची जागा ऑनलाइन उपलब्ध होऊ शकते. त्यापेक्षा जास्त जागा हवी असल्यास त्यासाठी मासिक शुल्क मोजावे लागते. येथे तुम्ही वर सांगितलेले सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स तसेच फोटो, व्हिडियो अपलोड करू शकता. गुगल ड्राइव्ह वापरण्यासाठी आधी तुमचा जीमेल आयडी वापरून लॉगइन करायचे. त्यानंतर ड्राइव्ह आधी आपल्या संगणकावर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचे. हे सारे काही मिनिटांत पार पडते. आता या संगणकावरील सॉफ्टवेअरमार्फत तुमच्या गुगल ड्राइव्हशी संपर्क साधू शकता. तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या, सेव्ह करायच्या फाइल्स ड्राइव्हवर पाठवू शकता. आता तुम्हाला प्रत्येक वेळी लॉगइन करून फाइल्स पाठवायच्या नसतील तर तुम्ही क्रोम ब्राउझरच्या साहाय्याने तुमचा संगणक Sync करू शकता. तसेच कोणती फोल्डर्स अपडेट करायची, हेही ठरवू शकता. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही स्थानिक फाइल्स/फोल्डर्स अपडेट कराल तेव्हा आपोआप त्या फाइल्स गुगल ड्राइव्हवर पाठवल्या जातील. आता या फाइल्स इंटरनेटवर असल्याने तुम्ही जगभरातून कुठूनही त्या पाहू शकता. त्याचबरोबर अँड्रॉइड फोनवरूनही तुम्ही सगळ्या फाइल्स पाहू शकता. गुगल क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही या फाइल्स ऑफलाइनही पाहू शकता.
वेबवर गुगल ड्राइव्ह व्यूअरमध्ये आपल्याला
खालील फाइल्स बघता येतात
 Google Docs
 Google Sheets
 Google Slides
 Google Forms
 Google Drawings
 Image files (.JPEG, .PNG, .GIF, .TIFF, .BMP)
 Video files (WebM, .MPEG4, .3GPP, .MOV, .AVI, .MPEGPS, .WMV, .FLV, .OGG)
 Text files (.TXT)
 Markup/Code (.CSS, .HTML, .PHP, .C, .CPP, .H, .HPP, .JS)
 Microsoft Word (.DOC and .DOCX)
 Microsoft Excel (.XLS and .XLSX)
 Microsoft PowerPoint (.PPT and .PPTX)
 Adobe Portable Document Format (.PDF)
 Apple Pages (.PAGES)
 Adobe Illustrator (.AI)
 Adobe Photoshop (.PSD)
 Autodesk AutoCad (.DXF)
 Scalable Vector Graphics (.SVG)
 PostScript (.EPS, .PS)
 Fonts (.TTF, .OTF)
 XML Paper Specification (.XPS)
 Archive file types (.ZIP and .RAR)
 MTS Files
bhagyashree@cyberedge.co.in