आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bhagyashree Kenge Article About Google Maps, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुगल मॅप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्वी जंगल किंवा किल्ल्यांवरून भटकंती करताना सोबत वाटाड्या असायचा. आज लोकांचा आधुनिक वाटाड्या आहे गुगल मॅप्स, अर्थातच गुगलवर असलेले संपूर्ण जगाचे नकाशे. हे नकाशे जगातील शहरांचे आहेत, रस्त्यांचे आहेत. कोणत्याही प्रदेशात असलेले व्यावसायिक उद्योग, संस्थाही शोधता येतात. मुख्य म्हणजे यावरची माहिती फार तर फार तीन वर्षेच जुनी असते. त्यामुळे त्या ठिकाणाची अद्ययावत माहिती उपलब्ध असते.

गुगल मॅप रस्त्याचे नकाशे, प्राकृतिक रचना तसेच सॅटेलाइटने घेतलेले फोटोही दाखवतो. यामध्ये ट्रॅफिक मॅपचेही फीचर आहे. गुगल मॅप्सवरची ही चित्रं म्हणजे NAVTEQ द्वारा घेतलेल्या डिजिटल प्रतिमा असतात. deCarta कंपनीने तयार केलेल्या अ‍ॅप्लिकेशनद्वारे काढलेल्या चित्रांचे आणि डेटाचे मॅपिंग/जुळवणी केली जाते. गुगल मॅप्स अद्ययावत करण्यासाठी हवाई छायाचित्रणाचाही उपयोग केला जातो. 800 ते 1500 फूट उंचीच्या विमानातून ही फोटोग्राफी केली जाते. ही फोटोग्राफी अतिशय उच्च प्रतीची (high resolution) असते. त्यामुळे बारीक गोष्टीही सहज टिपल्या जातात. गुगलने पुढचे पाऊल टाकत google moon आणि google mars ही अ‍ॅप्लिकेशन्सही आणली आहेत. येथे तुम्हाला चंद्र आणि मंगळावरचे दृश्य पाहायला मिळू शकते.
गाडी चालवताना गुगल मॅपचा अतिशय चांगला उपयोग होतो. रस्ते समजतात, वन-वे कळतात. 2008 साली गुगल मॅपमध्ये एक नवीन फीचर आले ते म्हणजे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे अंतर मोजता येणे. त्यामुळे लोकांना दोन अंतरांमधले सर्वात कमी आणि सोपे अंतर शोधता येते. गुगलने असे नमूद केले आहे की 2011 साली 250,000 मैल रस्ते गुगलवर अपडेट झाले आहेत. गुगलच्या कॅमे-यांनी विविध देशांच्या मोठ्या शहरांचे फोटो अपलोड केले होते. परंतु खाजगीपणावर हल्ला होतो अशी ओरड लोकांनी केल्याकारणाने लोकांचे चेहरे धूसर करण्यात आले आहेत.

संपूर्ण जगातली अद्ययावत माहिती उपलब्ध झाल्यामुळे दहशतवाद्यांसाठी ते फायद्याचे ठरते, हा याचा मोठा तोटा. परंतु फायदेही भरपूर असल्याने त्यामुळे त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहा.
bhagyashree@cyberedge.co.in