आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

what's app! काय चाललंय?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्सअ‍ॅपचे सॉफ्टवेअर तुमच्या फोन यादीतल्या सर्व नंबरची तपासणी करून कोण कोण व्हॉट्सअ‍ॅप युजर आहेत ते बघते आणि तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपशी जोडून देते. हे तंत्रज्ञान अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयफोन आणि विंडोज स्मार्टफोनवर व्यवस्थित चालते.

सध्या अत्यंत लोकप्रिय असलेले व्हॉट्सअ‍ॅप हे इन्स्टंट मेसेजिंगचे मोबाइल अ‍ॅप आहे. मोबाइल फोनमुळे क्रांती झाली. संदेश/ एसएमएस पाठवणे सोपे झाले; परंतु व्हॉट्सअ‍ॅपने पुढचे एक पाऊल टाकत मेसेजिंगची ही सेवा इंटरनेट मोबाइलधारकांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे हे अ‍ॅप आपल्याला आयफोन, ब्लॅकबेरी, अँड्रॉइड व विंडोज फोनवर उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा फायदा असा की संदेश पाठवायला कोणतेही वेगळे शुल्क पडत नाही. व्हॉट्सअ‍ॅप वायफायवरही चालते. लिखित संदेशाबरोबर तुम्ही छायाचित्र, चलचित्र आणि श्राव्य संदेशही पाठवू शकता.
जानेवारी 2009मध्ये जॉन कोम ह्या तरुणाचे नवीन आयफोन विकत घेतला. त्या वेळेला त्याच्या लक्षात आले की केवळ सात महिने जुने असलेले अ‍ॅप स्टोअर्स मोबाइल अ‍ॅपच्या नवीन तंत्रज्ञानात व व्यवसायात शिरकाव करते आहे. जॅनने याविषयीची चर्चा त्याचा मित्र अ‍ॅलेक्स फिशमनशी केली.

त्यानंतर एक आठवड्याने आपल्या वाढदिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2009 रोजी WhatsApp या कंपनीची कॅलिफॉर्निया येथे स्थापना केली. जॅनने व्हॉट्सअ‍ॅप हे नाव निश्चित केले, कारण ते what's up? (काय चाललंय या अर्थाने) या अमेरिकन शिष्टाचाराशी अत्यंत साधर्म्य असणारे आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे XMPP (Extensible Messaging and Presence Protocol) हे तंत्रज्ञान वापरते. हे तंत्रज्ञान तुमचा फोन नंबरच युजरनेम म्हणून वापरते. व्हॉट्सअ‍ॅपचे सॉफ्टवेअर तुमच्या फोन यादीतल्या सर्व नंबरची तपासणी करून कोण कोण व्हॉट्सअ‍ॅप युजर आहेत ते बघते आणि तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपशी जोडून देते. हे तंत्रज्ञान अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयफोन आणि विंडोज स्मार्टफोनवर व्यवस्थित चालते.

19 फेब्रुवारी 2014 रोजी फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप कंपनीला 19 बिलियन डॉलर्सला विकत घेतले. हा व्यवहार आजमितीला तरी आर्थिकदृष्ट्या सर्वोच्च समजला जातो. या व्यवहाराचा दोन्ही कंपन्यांना फायदा तर झाला परंतु अनेक ग्राहक आकर्षित करण्याकडे ते यशस्वी झाले. भारतातही रटर वर पैसे मोजण्यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅपची मोफत सुविधा वापरण्याकडे मोबाइलधारकांचा कल आहे. त्यात दोन किंवा अधिक व्यक्ती एकमेकांशी एकाच वेळी संवाद साधू शकतात व हा संवाद तत्काळ होत असतो. (इन्स्टंट मेसेजिंग)

व्हॉट्सअ‍ॅपवर निवडक व्यक्तींचा ग्रूप बनवता येतो. उदाहरणार्थ, शाळेच्या एका बॅचमधले विद्यार्थी, चुलत/आत्तेभावंडं, मावस/मामेभावंडं, ऑफिसमधील कर्मचारी, इ. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे व ज्यांनी हे अ‍ॅप आपल्या फोनवर डाउनलोड केले आहे त्यांना या ग्रुपमध्ये सहभागी केले जाऊ शकते. ग्रूपवर एका सदस्याने टाकलेला संदेश सर्व सदस्यांना एका वेळी पोहोचतो व त्यावर सर्वांची मिळून देवाणघेवाण होऊ शकते. एखादी महत्त्वाची बातमी कळवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा उपयोग होतो, प्रत्येक व्यक्तीला वेगळा संदेश देण्याची वा कॉल करण्याची गरज उरत नाही.
(bhagyashree@cyberedge.co.in)