आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलचित्रांचा पेटारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूट्यूबसाठी अ‍ॅडोब फ्लॅश प्लेअर आणि HTML 5 चे तंत्र वापरले जाते. ज्या ब्राउझर्सवर HTML 5 नाही ते
ब्राउझर यूट्यूब सर्पोट करत नाहीत.
याद्वारे आपण व्हिडिओ क्लिप्स, टीव्ही क्लिप्स, म्युझिक व्हिडिओज किंवा व्हिडिओ ब्लॉगिंगही करू शकतो.
यूट्यूब ही चलचित्र किंवा व्हिडिओ शेअरिंगची अत्यंत लोकप्रिय लिंक आहे. नोंदणी केलेल्या सभासदांना व्हिडिओ अपलोड आणि शेअर करता येतो. मात्र, पाहण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागत नाही. या व्हिडिओजच्या विषयातही वैविध्य आहे. शिक्षणापासून फॅशनपर्यंत अनेक विषयांवरचे व्हिडिओज विविध भाषांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक वाढवण्यासाठी व्हिडिओज अधिक दर्जेदार करण्याचा कल असतो.
यूट्यूबचा शोध चॅड हुर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या तीन तरुणांनी अमेरिकेत लावला. हे तिघेही जण ‘पेपाल’ या प्रसिद्ध कंपनीत नोकरी करीत होते. त्याचे झाले असे की अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरात चेनच्या घरी रात्री पार्टी होती. चॅड पार्टीला आला होता, पण काही कारणास्तव करीम येऊ शकला नाही. भरीस भर पार्टी झाली होती, हेही त्याने अमान्य केले होते. म्हणून पार्टीचा व्हिडिओ करीमला दाखवण्यासाठी वेबसाइटवर टाकायचा हे ठरले. त्यानंतर या कल्पनेने उचल खाल्ली आणि 14 फेब्रुवारी 2005 रोजी www.youtube.com या वेबसाइटचा जन्म झाला. या साइटवरचा सर्वात पहिला व्हिडिओ होता Me at Zoo. या व्हिडिओत जावेद करीम सॅन डिएगो शहरातल्या प्राणीसंग्रहालयात मस्ती करतानाचा आहे. आजही हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो. 2006 मध्ये गुगलने यूट्यूब साइट या तिघांकडून विकत घेतली. आजच्या घडीला यूट्यूब ही गुगल आणि फेसबुकनंतर तिसर्‍या क्रमांकावर लोकप्रिय असणारी वेबसाइट आहे.
यूट्यूबसाठी अ‍ॅडोब फ्लॅश प्लेअर आणि HTML 5चे तंत्र वापरले जाते. ज्या ब्राउझर्सवर HTML 5 नाही ते ब्राउझर यूट्यूब सर्पोट करत नाहीत. याद्वारे आपण व्हिडिओ क्लिप्स, टीव्ही क्लिप्स, म्युझिक व्हिडिओज किंवा व्हिडिओ ब्लॉगिंगही करू शकतो. बहुतेक वेळा वैयक्तिक व्हिडिओजच अपलोड केले जातात; परंतु काही BBCसारख्या कंपन्याही आपले व्हिडिओज अपडेट करत असतात. यूट्यूबच्या आकडेवारीनुसार दर मिनिटाला जगभरातून 60 तासांचे नवीन व्हिडिओज अपडेट केले जातात. त्यातील 1/3 व्हिडिओज हे अमेरिकेच्या बाहेरून अपलोड केले जातात. यूट्यूब साइटला महिन्याला 8 अब्ज नवे प्रेक्षक भेट देतात. यूट्यूबचे अर्थकारण जाहिरातींवर आहे, त्यामुळे सामान्य प्रेक्षक पैसे न भरता व्हिडिओ बघू शकतात. 2011मध्ये Google + Weही सोशल नेटवर्किंग साइट आणि Chrome ब्राउझर यूट्यूबशी संलग्न झाले.
यूट्यूबच्या व्हिडिओजचा समाजावर परिणाम आणि प्रतिसाद थक्क करणारा आहे. यूट्यूबवर TED TALK नावाचे विविध विषयांवरचे व्यासपीठ अत्यंत लोकप्रिय आहे. ‘कोलावेरी’ गाण्याची प्रसिद्धी तर सर्वांच्या परिचयाचीच आहे. त्यामुळे अनेक व्यक्तिगत आणि व्यावसायिकही या माध्यमाचा वापर आपले काम सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी करत आहेत. चला तर तुम्हीही www.youtube.comला भेट द्या.

bhagyashree@cyberedge.co.in