आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन शॉपिंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या ऑनलाइन म्हणजेच इंटरनेट शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. घरबसल्या खरेदी असल्यामुळे बाजारातली गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते. परंतु ऑनलाइन शॉपिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक शंकाकुशंका असतात.
प्रतिष्ठित आणि सुरक्षित साइट्सची निवड तुम्ही खरेदीसाठी साइटची निवड करता तेव्हा ब्राउझरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये छोटे कुलपाचे चिन्ह आहे का याची खात्री करा. वेबसाइटचा पत्ता https:// पासून सुरू व्हायला हवा. येथे s म्हणजेच secure. तरीही खरेदी करण्याआधी खालील गोष्टी तपासाव्या. ज्या योजना अतिशय आकर्षक वाटतात त्याची खात्री करून घ्या एखाद्या साइटबाबत खात्री वाटत नसल्यास मित्र, नातेवाइकांकडे चौकशी करा. इंटरनेटवर सर्च करून त्या साइटबद्दलची मतं जाणून घ्या.


पैसे देण्यापूर्वी
ऑनलाइन पैसे भरण्यापूर्वी तुम्हाला पासवर्ड विचारला जातो जेणेकरून तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय राहील. हा पासवर्ड निवडताना तुम्हाला अक्षरे, अंक आणि चिन्हे यांची सरमिसळ केली पाहिजे. सार्वजनिक जागांवर wi-fi असलेल्या ठिकाणी ऑनलाइन खरेदी टाळलेलीच चांगली. एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास पुढील पाय-या आहेत, जी गोष्ट खरेदी करायची आहे त्याच्या खाली Add to Basket क्लिक करणे.


दिलेल्या सूचनेनुसार तुमची वैयक्तिक माहिती भरून द्या. Asterisk चिन्ह असलेला रिकामा रकानाही भरणे अनिवार्य आहे. अर्ज पूर्ण भरून झाल्यावर तुमच्याकडे खरेदी केलेल्या वस्तूंची यादी येईल ती तपासून घेणे. साइटवर दिलेल्या terms and conditions ची यादी तपासून घेणेही योग्य. आता तुम्ही तुमचा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर तेथे नोंदवू शकता. जेणेकरून तुमच्या खात्यातून पैसे वळते होतील. या सेवेसाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड फी भरणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही पैसे भरलेत की submit किंवा proceed चे बटन क्लिक करू शकता. त्यानंतर अधिक सुरक्षिततेसाठी परत लॉग इन आणि पासवर्ड विचारला जातो. काही साइट्स मध्यस्थाचे काम करतात. ढं८स्रं’ साइट याचे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही जेव्हा वस्तू साइटवरून खरेदी करता तेव्हा पैसे तुम्ही Paypal कडे भरत असता. मग Paypal पैसे माल विक्रेत्याला (vendor) देत असतो. त्यामुळे माल विक्रेत्याला ग्राहकाची बँक माहिती अजिबात कळत नाही. जेव्हा तुम्ही जास्त किमतीची वस्तू खरेदी करता तेव्हा डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्ड वापरणे अधिक योग्य. त्याचबरोबर खरेदी केलेली वस्तू जर योग्य नसेल तर तुम्ही तुमचे पैसे परत मागू शकता.


सावधान
* इंटरनेट शॉपिंग सोयीचे असले तरी तुमच्या हलगर्जीमुळे नुकसानही होऊ शकते. त्यासाठी पुढील काळजी घेणे योग्य -
* आपल्या बँकेचा ऑनलाइन पासवर्ड कुणालाही देऊ नये. ई-मेलने पाठवू नये.
* जेव्हा तुम्ही ऑनलाइन खरेदी करता तेव्हा क्रेडिट कार्डसाठी बँकेचा पिन किंवा पासवर्ड विचारला जात नाही हे लक्षात घ्या. त्याऐवजी 3-4 अंकी सिक्युरिटी नंबर विचारला जातो.
* बहुतेक साइटवर तुम्ही दिलेली गोपनीय माहिती साठवली जात नाहीच, त्यामुळे काळजीचे कारण नाही. सरतेशेवटी साइटवरून खरेदी करताना त्यावर सिक्युरिटीचे चिन्ह आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे.