आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagyashree Kenge\'s Article About Google\'s Inbox

गुगल इनबॉक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इनबॉक्सच्या ई-मेलचे वर्गीकरण करण्याचे सुलभ तंत्रज्ञान गुगलने नुकतेच बाजारात आणले आहे. गुगल इनबॉक्समुळे ई-मेलचे वर्गीकरण खरोखरीच सोप्पे होणार आहे. गुगल इनबॉक्स हा जी-मेलला पर्याय नाही. जी-मेलच्या ई-मेल्सचे वर्गीकरण करण्याचे तंत्रज्ञान आहे.

आता आपण सर्वच जण ई-मेलच्या वापराला सरावलेले आहोत. तुम्ही जेव्हा मेलबॉक्सला लॉगइन करता तेव्हा एका वेळेस अनेक ई-मेल इनबॉक्स (inbox) मध्ये असतात. त्यातले काही तातडीने करायचे, काही महत्त्वाचे तर काही फारशा महत्त्वाचे नसणा-या असतात. अशा वेळेला त्यांचे वर्गीकरण केले तर काम अधिक प्रभावीपणे होऊ शकते. तुमच्या इनबॉक्सच्या ई-मेलचे वर्गीकरण करण्याचे सुलभ तंत्रज्ञान गुगलने नुकतेच बाजारात आणले आहे. गुगल इनबॉक्समुळे तुमच्या ई-मेलचे वर्गीकरण खरोखरीच सोप्पे होणार आहे. लक्षात घ्या, गुगल इनबॉक्स हा जी-मेलला पर्याय नसून तुमच्या जी-मेलच्या इ-मेल्सचे वर्गीकरण करण्यासाठीचे अ‍ॅप/तंत्रज्ञान आहे.

गुगल इनबॉक्स अ‍ॅप हे सध्यातरी ते iOS, अँड्रॉइड आणि गुगल क्रोम ब्राउझरवरच चालते. iOS वर चालणारे इनबॉक्स हे तुमचे ई-मेलचे मेसेज न उघडता त्यातील पत्ते, फोन नंबर्स, ट्रॅकिंग नंबर्स वेगळे करून समोर दाखवते. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण मेसेज न उघडताही त्यातील महत्त्वाचा मजकूर समजू शकतो. गुगल इनबॉक्स तुमच्या ई-मेल मेसेजेसचे वर्गीकरण करत असल्याने महत्त्वाचे मेसेज समोर दिसतात, तर कमी महत्त्वाचे तुम्हाला दिसत नाहीत. तुम्ही तुमचे मेसेज पिन आयकॉनने पिनही करू शकता. येथे स्नूझचेही अजून एक फीचर आहे. तुम्हाला एखाद्या मेसेजवर काही दिवसांनी काम करायचे असल्यास तारखेनुसार तुम्ही स्नूझ करून ठेवू शकता. त्यानंतर हव्या त्या तारखेला तो मेसेज परत समोर येऊन दिसतो. अजून एक महत्त्वाचे फीचर आहे Done म्हणजेच झालेले काम. तुमचे ई-मेलसंबंधातले काम करून झाले असेल तर तुम्ही Done मध्ये ते ठेवू शकता. त्यानंतर ट्रॅशमध्येही ते सरकवू शकता. तारखेनुसार तुम्ही ई-मेलचे वर्गीकरण तुम्ही करू शकताच, पण त्याचबरोबर खरेदी, प्रवास, घरखर्च, सामाजिक असे इत्यादी फोल्डर्स तयार करून त्यानुसार ई-मेलचे वर्गीकरण करू शकता.
गुगल इनबॉक्समुळे तुमचे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकेल हे निश्चित, परंतु सध्या तरी हे अ‍ॅप आमंत्रणानेच उपलब्ध आहे. तर हे आमंत्रण मिळवण्यासाठी http://www.google.com/inbox/ या वेबसाइटवर जाऊन स्वतःचे invitation नक्की करा.
bhagyashree@cyberedge.co.in