आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेटा प्लॅन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्याकडे फोन किंवा टॅब्लेट असेल आणि तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर तुम्ही डेटा वापरत असता. आपण जेव्हा वेबसाइट्स बघत असतो, व्हिडिओ बघत असतो, इमेल पाठवतो किंवा सोशल नेटवर्किंग साइट्स अपडेट करत असतो तेव्हा आपण डेटा वापरत असतो. थोडक्यात डेटा म्हणजे माहिती जी तुम्ही ऑनलाइन असताना/इंटरनेट वापरताना पाठवायला किंवा मिळवण्याकरिता (sending/receiving) वापरत असता. आपण डेटा वापरतो तो वरील नमूद केलेली सर्व कामे करायला.
भारतात 2G नंतर 3G अत्यंत लोकप्रिय आहे. हळूहळू 4G चे आगमनही होते आहे, त्यामुळे तेही लोकप्रिय होण्यास फारसा वेळ लागणार नाही. 4G मोबाइल ब्रॉडबँडचा उद्देशच मुळी संगणकाच्या ब्रॉडबँडइतकाच वेग ग्राहकाला देणे हा आहे. सध्या अमेरिका आणि युरोपियन देशांत लोकप्रिय असलेली सेवा वापरणा-या प्रत्येक धारकाकडे त्याचा स्वत:चा वेगळा प्लॅन असतो. 4G वापरण्यासाठी तुमच्याकडे योग्य आणि अद्ययावत स्मार्टफोन असावा लागतो. तुमच्या फोनमध्ये जर ती सेवा असेल तर त्यावर 4G LTE - Long Term Evolution लिहिलेले असेल. 4G कनेक्शनमुळे मोठ्या आकाराचे व्हिडिओ आणि ऑडिओ 3Gपेक्षाही वेगाने डाउनलोड करता येतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा प्लॅन घेता तेव्हा डेटा योग्य रीतीने डाउनलोड होईल याची खात्री बाळगली पाहिजे.
तुम्ही वाय-फाय वापरत असाल तर तुम्ही किती डेटा वापरता ह्याला काही बंधन नाही; पण तुम्ही जर 3G
वापरत असाल तर तुमचे फोन कॉल्स आणि टेक्स्ट वापरण्यावर अंकुश ठेवावा लागतो. प्रत्येक वेळी तुम्ही काहीही केले तरी तुमचा डेटा खर्च होतो, त्यामुळे खाते लवकर संपते. प्रत्येक नेटवर्क प्रोव्हायडर डेटा आणि त्याचे शुल्क देतोच, त्यामुळे आपल्याला योग्य तो प्लॅन निवडता येतो. काही फोन्स तुम्ही वापरत नसलात तरी डेटा कन्झ्यूम करू शकता. उदाहरणार्थ ई-मेल अ‍ॅप्लिकेशन स्वत:हूनच नवीन मेसेजेस आहे का हे चेक करते. त्यामुळे तुम्हाला खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
जेथे तुम्हाला योग्य डेटा मिळेल किंवा थोडा जास्तच मिळेल ते पॅकेजच तुम्ही निवडणे योग्य. याला डेटा बंडल म्हणतात. तुम्ही वापरत असलेला किती डेटा संपला किंवा उरला यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. ज्या कंपनीकडून तुम्ही पॅकेज घेतले ते तुम्हाला याबाबत मदत करू शकतात. तुम्ही जो डेटा प्लॅन घेता तो तुमच्या राज्यात/देशात चालतोच; परंतु परदेशी गेलात आणि जर रोमिंग डेटा प्लॅन नसेल तर फोन बंद ठेवणेच योग्य. तुम्हाला फोन कॉल्स आणि मेसेजेस सहज करता येऊ शकतात. जेव्हा शक्य असेल तेव्हा wi-fi वापरणेच शहाणपणाचे. तुम्हाला परदेशात फोन वापरायचे भलेमोठे बिल टाळायचे असेल तर आपल्या सेवाधारकाकडे प्लॅन तपासा आणि पैसे वाचवा.