आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

facebook कसे वापरावे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकचे सभासद होण्यासाठी वयाची 13 वर्षे पूर्ण हवीत तसेच स्वत:चा ई-मेल पत्ताही हवा.
* फेसबुकवर काय पोस्ट करावे, काय ऑफलाइन राहू द्यावे?
सभासद फेसबुकवर पोस्ट करताना त्यांचे खरे नाव पोस्ट करतात, कधी पहिले व शेवटच्या नावाने पोस्ट करतात, कधी फक्त पहिले नाव आणि शेवटच्या नावाच्या आद्याक्षराने पोस्ट करतात; पण लक्षात घ्या, तुमचे खरे नाव वापरणेच योग्य आहे कारण त्यामुळे मित्र आणि नातेवाईक तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतात. आता वैयक्तिक माहितीत तुमचे शिक्षण, नोकरी, आवडती पुस्तके, सिनेमाबद्दलही विचारले जाते. आता हा प्रत्येकाचा प्रश्न आहे की त्याने कुठली व किती माहिती लोकांना दाखवणे योग्य आहे. त्यातही घरचा पत्ता, भ्रमणध्वनी वगैरे माहिती अधिक तपशिलात न देणेच योग्य. आपल्या आवडत्या गोष्टी (activities) मध्ये कॉलेजचे तास बुडवणे वगैरेंसारख्या गोष्टी न लिहिणेच योग्य, कारण तुमची प्रोफाइल पालक किंवा तुमच्या शिक्षकांच्या नजरेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच सावधगिरी फोटो पोस्ट करतानाही घ्यायला हवी. तुम्ही संभ्रमात असाल किंवा एखाद्या गोष्टीची खात्री वाटत नसेल तर अजिबात पोस्ट करू नका.
* माहिती पोस्ट करूनही मी स्वत:ला सुरक्षित कसे ठेवू?
फेसबुकला प्रायव्हसी सेटिंग्जची सोय असते, ज्याद्वारे तुम्ही सांगू शकता की कोणी तुमची प्रोफाइल पाहावी, कोणी तुम्हाला शोधावे, तुमचे कोणते अपडेट फेसबुकच्या feedsमध्ये दाखवले जावे. तुम्ही काही माहिती गोपनीय ठेवून थोडीशीच दाखवली तरी चालते. वैयक्तिक माहिती देताना असेच करणे जास्त योग्य असते.
* सर्च रिझल्टमध्ये माझ्या फेसबुक प्रोफाइलचा प्रेझेन्स कसा ताब्यात ठेवू?
फेसबुक पानांना पब्लिक लिस्टिंग असते, जी सर्च केल्यावर गुगलमध्ये येते. त्यामध्ये तुमचे नाव, नेटवर्क आणि मित्रांची यादी असते. समजा तुम्ही तुमच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये सगळ्यांना माझी प्रोफाइल दाखवा असे सांगितलेले असेल तर गुगल सर्चमध्ये तुमची प्रोफाइल सहज सापडेल. या सेटिंग्जमध्ये तुम्ही ठरवू शकता की कोण तुमची प्रोफाइल पाहू शकतो. तुम्ही फक्त मित्रांना असे सांगितलेत तर फक्त मित्रच तुमची प्रोफाइल पाहू शकतात. एखाद्या विशिष्ट ग्रुपलाही तुम्ही तुमचे प्रोफाइल रिझल्ट दाखवू शकता. त्याबरोबर तुम्ही हेही निवडू शकता की तुमची प्रोफाइल किती तपशिलात मित्रांना बघता यावी. तुम्हाला हवे तर तुम्ही त्यावर बंधने घालू शकता.
* फेसबुकवर भेटणा-या लोकांबद्दल मला काय माहीत हवे?
लक्षात घ्या, तुमच्यासारखेच तुमच्या मित्रांनीही त्यांची कोणती माहिती दिसावी हे स्वत: निश्चित केलेले असते. खात्रीलायक असतो तो फक्त ई-मेल पत्ता. इतर माहिती बनावट असू शकते. म्हणून तुम्हाला व्यक्तिगत जीवनात माहीत असलेल्या व्यक्तीशीच ऑनलाइन संपर्क साधा.
* फेसबुक वापरासंबंधी अधिक माहिती कुठे मिळू शकेल?
फेसबुकच्या साइटवर पुढील लिंकवर - http://www.facebook.com/policy.php