आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल कॅलेंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'गुगलमधील तुमचे इव्हेंट्स आॅनलाइन साठवले जातात, त्यामुळे तुम्ही ते जगभरात कोठूनही संगणक किंवा मोबाइलवर पाहू शकता. त्यामुळे तुमचा डेटा पुसला जाण्याची वा करप्ट होण्याची कुठलीच शक्यता उरत नाही.'

बर्‍याचदा आपल्याला महत्त्वाच्या तारखा आणि कामे लक्षात राहत नाहीत. आता त्यासाठी पदराला किंवा रुमालाला गाठी बांधत बसण्याची गरज नाही. तुमच्यासाठी गुगलने इंटरनेटवरचे गुगल कॅलेंडर आणले आहे. तुमच्या गुगल किंवा जीमेलच्या अकाउंटद्वारे तुम्ही ही सेवा वापरू शकता. गुगल कॅलेंडरची संकल्पना व डिझाइन केविन फॉक्स यांचे आहे. हे कॅलेंडरही मायक्रोसॉफ्ट आउटलुकसारखेच डेस्कटॉप (स्थित संगणक) आहे. अजॅक्स (अ्नं७) तंत्रात गुगल कॅलेंडरची बांधणी केली आहे. येथे तुम्ही कॅलेंडरच्या महत्त्वाच्या तारखा पाहू तर शकताच, त्याचबरोबर त्या त्या तारखांना महत्त्वाचे दिवस, टिपणही लिहून ठेवू शकता. एखादा महत्त्वाचा दिवस आपल्या आवडत्या रंगात अधोरेखित करून ठेवू शकता. एखाद्या पानावरून किंवा तारखेवरून एखादा इव्हेंट तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता. तुमचे साप्ताहिक, मासिक कार्यक्रम तारखेनुसार पाहू शकता. तुम्ही किती दिवसांपूर्वी हा कार्यक्रम दाखवायचा हेही सेट करू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या मित्राचे लग्न 26 तारखेला असेल तर तुम्ही असे ठरवू शकता, की तुम्हाला 20 तारखेपासूनच आठवण केली गेली पाहिजे. त्यामुळे तुम्ही महत्त्वाची तारीख विसरणेच शक्य नाही.

तुमचे हे इव्हेंट्स आॅनलाइन साठवले जातात, त्यामुळे तुम्ही ते जगभरात कोठूनही संगणक किंवा मोबाइलवर पाहू शकता. त्यामुळे तुमचा डेटा पुसला जाण्याची वा करप्ट होण्याची कुठलीच शक्यता उरत नाही. तुम्ही तुमचे हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि आयकॅलेंडरमध्येही पाहू शकता. एकाच वेळेला अनेक कॅलेंडर त्याच्यात वाढवू शकता आणि शेअर करू शकता. तुमची रोजची करायची कामे (३ङ्म ङ्मि) तुम्ही अपडेट करू /पाहू शकता. येथे अगदी बेसिक कॅलेंडर की ज्यामध्ये सगळ्या देशाच्या सार्वजनिक सुट्या दिलेल्या आहेत, असेही कॅलेंडर उपलब्ध असते. व्यावसायिकांसाठी वेगवेगळ्या देशांतर्गत काम करायचे असल्यास कॅलेंडरमध्ये टाइमझोनचा फरकही दाखवता येतो.

गुगल कॅलेंडर अनेक मोबाइल जसे ब्लॅकबेरी, पाम, आयफोन किंवा पॉकेट पीसीवरही दिसते. अँड्रॉइड पीसीवर चालते त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्येही उत्तम चालते. त्यामुळे सर्वांचीच मोठी सोय झाली आहे.
(bhagyashree@cyberedge.co.in)