आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagyashri Kenge Article About Google Picasa, Madhurima

गुगल पिकासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैत्रिणींनो, सणावारांचे दिवस असल्याकारणाने आपण सर्वजणच मोबाइल आणि डिजिटल कॅमे-याने फोटो काढत असतो. हे फोटो प्रत्येकाला ई-मेलवर पाठवत बसण्यापेक्षा एकदमच पाठवता आले तर किती श्रम वाचतील नाही? गुगलने तुमच्या प्रश्नावर PICASA चा शोध लावून उत्तर दिले आहे. पिकासा हे फोटो/इमेज पाहण्यासाठी, साठवण्यासाठी, आणि organise करण्यासाठी सॉफ्टवेअर आहे.
पिकासा फोटो शेअरिंग वेबसाइट लाइफस्केप या कंपनीने प्रथम निर्माण केली आणि २००४ साली गुगलने ती विकत घेतली. पिकासा हे नाव प्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासोच्या नावावरून घेण्यात आले आहे. pic म्हणजे स्वत:ची निर्मिती किंवा कला. mi casa म्हणजे स्पॅनिशमध्ये माझे घर. थोडक्यात काय तर डिजिटल स्वरूपात स्वतःची कला साठवण्यासाठीची माझी हक्काची जागा म्हणजे पिकासा. सध्या बाजारात पिकासाचे 3.9 हे अद्ययावत व्हर्जन उपलब्ध आहे. पिकासा मोफत असून त्यामध्ये फोटो एडिटिंग, रंग अधिक बहारदार करणे, red eye कमी करणे आणि हव्या त्या मापात इमेज कापणे (crop) याव्यतिरिक्त स्लाइड शो, छपाई सुविधा, इमेज टाइमलाइन या सुविधाही उपलब्ध आहेत. पिकासामध्ये सर्चची सुविधाही असल्याने आपण हवी ती इमेज शोधू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे चेहरा (फेस) ओळखण्याची (रेकग्निशन) पण सोय असते. त्यामुळे कित्येक रुग्णांसाठी हे वरदान ठरले आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांना शोधण्यातही त्यांचा वाटा आहे.
पिकासा वापरण्यासाठी तुम्ही तुमचे गुगलचेच अकाउंट वापरू शकता. गुगल तुम्हाला 15 जीबी मोफत जागा देते ज्यामध्ये तुम्ही फोटो साठवू आणि शेअर करू शकता. 800X800 पिक्सेलचे अगणित फोटो तसेच १५ मिनिटांपेक्षा कमी वेळ असलेला व्हिडिओ तुम्ही कितीही साठवू शकता. मात्र मर्यादा संपली की पिकासा तुमचे फोटो स्वतःहूनच योग्य (resize) त्या आकारात आणि वजनात करते. त्यामुळे आणखीन काही फोटो त्यात सहज मावू शकतात. वेबबरोबरच हे सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या संगणकावरही वापरू शकता. मग आता दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांसोबतच्या आठवणी अवश्य पिकासावर अपलोड करा.