आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चला ट्विटिंग करुया...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर किंवा ट्विटिंग हा मायक्रोब्लॉगिंगचा प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला छोटे संदेश पाठवता येतात. हे संदेश दुस-यासाठी माहितीपूर्ण, उपयोगाचे किंवा मनोरंजनात्मक असू शकतात. म्हणजेच वेगळ्या भाषेत सांगायचे तर आपण अशा व्यक्ती शोधायच्या ज्यांचे ट्वीट्स आपल्यासाठी माहितीपूर्ण असतील. ट्विटर वापरायला म्हणजेच संदेश पाठवायला आणि मिळवायला अतिशय सोपे आहे. तुम्हाला ट्विटरच्या साइटवर मोफत सभासदत्व मिळते. त्याचे सभासद होऊन तुम्ही ट्विटरचे नाव धारण करायचे. आता तुम्ही रोज किंवा अगदी दर एकेक तासांनी म्हणजे अगदी कधीही ट्वीट करू शकता. ट्वीट करायचे असेल तर what’s happening बॉक्समध्ये जाऊन तुम्ही 140 अक्षरांमध्ये संदेश लिहून म्हणजेच ट्वीट करून स्वत:ला व्यक्त करू शकता. तुम्ही एखादी माहितीपूर्ण लिंक व फोटो शेअर करू शकता. त्याउलट तुम्हाला ट्वीट मिळवायचे असतील तर तुमच्या आवडत्या व्यक्ती किंवा सेलिब्रिटीजना शोधून follow करू शकता आणि subcribe ही करू शकता. समजा काही काळानंतर तुम्हाला जर त्या व्यक्तीचे ट्वीट्स आवडेनासे झाले तर तुम्ही त्याला unfollow/ unsubcribe ही करू शकता. तुम्ही सबस्क्राइब केलेले हे ट्वीट्स तुम्ही विविध ट्विटर रीडर्सद्वारेही वाचू शकता.

लोकं विविध कारणांसाठी ट्विट्स पाठवत असतात. लक्ष वेधून घेण्यासाठी, स्वत:च्या प्रसिध्दीसाठी, आपल्या व्यावसायिक प्रसिद्धीसाठी आणि इतर कारणांसाठीही. काही लोक तर सहजच आपले मत प्रदर्शित करतात आणि किती लोक ते वाचतात यातच त्यांना आनंद असतो; परंतु काही ट्विट्स खरोखरच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या बातम्या देणारे असतात.

एका अर्थाने ट्विटर हे छोटे पत्रकारच आहेत कारण जगभरातल्या घडामोडी आपल्याला त्या व्यक्तीच्या नजरेतून वाचायला मिळतात. या बातम्या त्या व्यक्तीच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवरून ताबडतोब उपलब्ध होतात. ट्विटरचा उपयोग लोक मार्केटिंगसाठीही करतात. उत्पादकांना आपले उत्पादन कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय जलद पोहोचवणे योग्य वाटते त्यासाठीही हे माध्यम उपयुक्त.

ट्विटर हा सोशल मिडियाचाच प्रकार आहे पण फक्त जलद संदेश पाठवण्यापेक्षाही अधिक आहे. ट्विटरमुळे तुम्हाला जगभरातली रुचिपूर्ण / interesting माणसे भेटतात. येथे समान आवड, छंद किंवा ध्येय असलेले लोक एकत्र येतात. आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण करतात. एखाद्या लोकप्रिय विषयावर जेव्हा सातत्याने चर्चा होते तेव्हा त्याला सेलिब्रिटी म्हणतात. हे ट्रेंड्स आपल्याला आपोआप सॉफ्टवेअरद्वारा सहज समजतात. इतर सोशल साइट्सच्या तुलनेत ट्विटर वापरायला सोपे आणि कमी किचकट आहे. कलाकार किंवा प्रसिद्ध व्यक्ती / सेलिब्रिटीज आपल्या चाहत्यांबरोबर वेगळे नातेसंबंध जोडू शकतात. थोडक्यात ट्विटर मेसेजिंग, ब्लॉगिंग आणि टेक्स्टिंगचे उत्तम एकत्रीकरण आहे. एकदा वापरून बघा आणि स्वत:च ठरवा.
(bhagyashree@cyberedge.co.in)