‘सा’ सावधान
आरोग्य सांभाळा, जिभेचे चोचले कमी करा, वाणीला लगाम लावा, घरातल्यांचे प्रेम मिळवा. त्रागा करू नका. हेकटपणा सोडा. मान, अधिकार कमी होणार, हे जाणून वागा.
‘रे’ रेखीवपणा
गबाळेपणा टाळा, स्वत:ची कामे स्वत: करा, फाटके कपडे, वाढलेली दाढी, अस्वच्छ कपडे, मोडका चश्मा, तुटकी चप्पल इत्यादी कटाक्षाने टाळा. मन प्रसन्न ठेवा.
‘ग’ गर्व
आपण हालअपेष्टा सोसल्या, काटकसरीने वागलो, हे गर्वाने सांगू नका. आजच्या पिढीवर शेरेबाजी करू नका. गर्व त्यागा.
‘म’ मन
चांगले विचार करा, छंद बाळगा, शंका विसरा, उत्तम व धार्मिक वाचन करा. समाजकार्य करा. सज्जनांशी मैत्री करा, निसर्गाकडे जा, आसक्ती सोडा व मन प्रसन्न ठेवा.
‘प’ परमेश्वर
प्रार्थनेत, अध्यात्म व धार्मिक कार्यात वेळ घालवा.
‘ध’ धन
विनियोग योग्य रीतीने व हुशारीने करा. सर्व मुलाबाळांना देऊन टाकू नका.
‘नी’ नीतिमत्ता
कोणाचेही अहित चिंतू नका. मने कलुषित करू नका. धारदार शब्द टाळा. निंदा सोडा.
‘सा’ सामंजस्य
मोठेपणा मिरवू नका, माझीच मते बरोबर व ती सर्वांनी ऐकावी, असा हेकेखोरपणा सोडून द्या.
अशा रीतीने आनंदात जगा व इतरांना आनंदी करा.
भानुमती घाटपांडे, नाशिक