बाइकवर वेगाबरोबरच सुरक्षा / बाइकवर वेगाबरोबरच सुरक्षा गरजेची

Apr 20,2012 10:21:18 PM IST

हेल्मेट, गॉगल्स, रायडिंग ग्लोव्हज, जॅकेट, पँट, बूट आणि रायडिंग सूट या वस्तू बाइक चालवताना आराम देतात. शिवाय दुर्घटनेत आपला बचाव करतात.
भारतात गेल्या काही काळात उच्च इंजिन क्षमता आणि जबरदस्त वेगवान बाइकची भरमसाट वाढ झाली आहे. मात्र आपल्या येथील रस्त्यांची दुरवस्था आणि बाइकस्वारांना गाडी चालवण्यासंदर्भात जे ज्ञान हवे असते ते फार चांगले असते, असे मानले जात नाही.
आज काही नव्या वेगवान गाड्यांचा पिकअप आणि स्पीडसोबत त्यांचा परफॉर्मन्सही चांगला आहे; पण इमर्जन्सी ब्रेकच्या बाबतीत कारच्या तुलनेत त्यांची स्थिरता कमी आहे. कारचालकांच्या तुलनेत मोटारसायकलस्वारांच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. प्रवास केलेल्या प्रत्येक किलोमीटरवर मोटारसायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण कारचालकांच्या तुलनेत 10 ते 15 टक्के जास्त असते. याच कारणामुळे हेल्मेट, रायडिंग ग्लोव्हज, योग्य प्रकारचे बूट तसेच रायडिंग वेअर्स जसे पँट आणि जॅकेट वापरणे आवश्यक ठरते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार 2006 मध्ये भारतातील रस्ता दुर्घटनेत 10 लाख 5 हजार 725 लोक ठार झाले. लाखो लोक दुर्घटनाग्रस्त झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. गेल्या चाळीस वर्षांची आकडेवारी सांगते की, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ता दुर्घटनेत आणि जखमींच्या संख्येत भरमसाट वाढ झाली आहे. 2008 मध्ये जवळपास 9 कोटी वाहने नोंदणीकृत होती. त्यात बहुतांश दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा समावेश होता. हेल्मेटसक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून डोक्याला मार लागण्यापासून बचाव करण्यात यश मिळू शकते; पण या कायद्याची अंमलबजावणी अनेक राज्यांत होऊ शकली नाही.
जागतिक आरोग्य संघटना आणि वाहतूक विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, हेल्मेटसक्ती करून मृत्यूदर 30 ते 50 टक्क्यांपर्यंत खाली आणता येतो. क्रॅश टेस्टेड हेल्मेट, रायडिंग वेअर, व्हिजर आणि गॉगल्सद्वारे देण्यात आलेली डोळे तसेच चेह-याची सुरक्षा, तसेच गाडी स्लिप होऊन घसरून पडल्यास हाताला मार लागणे, जखमा होणे टाळता येते.
भारतात स्थानीय तसेच टॉप इंटरनॅशनल ब्रँड्स अशा दोन्ही ब्रँडची विक्री होते. टॉप सुपरबाइक आणि क्रुझर सेगमेंटची पूर्तता करणा-या रेसर कंपनीचे प्रसाद दिवाकर यांच्या मते, भारतीय मोटारसायकल अ‍ॅक्सेसरीज आणि गिअर मार्केटचा टर्नओव्हर कोट्यवधींचा आहे आणि दरवर्षी दुप्पट-तिपटीने वाढ होण्याची शक्यता वाटते. यामाहाचे टॉप डीलर श्रेणिक पोरवाल यांच्या मते, नव्या आणि अनुभवी वाहनचालकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आम्ही या गोष्टीलाच प्राधान्य देतो.

X