आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसामाणसांतील नात्यांची बंदिश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बंदिश’ म्हणजे एकत्र बांधणं-बॉण्डिंग. हे नाटक माणसांच्या उरल्यासुरल्या नात्यातून किंवा नात्याच्या उरल्यासुरल्या माणसांतून अशी बंदिश सिद्ध करू पाहणाऱ्या एका माणसाच्या धडपडीबद्दलचं नाटक आहे. भोवतीचं अवकाश आणि आताचा काळ दोहोंत ‘परका’ झालेला, एकूणच जीवनाच्या उद्देशाविषयी संभ्रमित झालेला हा माणूस त्याच्या विशिष्ट स्वभावामुळे आता मूठभर उरलेल्या जिव्हाळ्याच्या आपल्यांनाही टिकवून ठेवताना दमून गेला आहे. या स्थितीत त्याला थारा मिळतो ना वर्तमानात, ना भूतकाळात. अशा ‘हॉलो’मध्ये त्याला कशाविषयीच काही ठाम वाटत नाही. त्याला गाण्याची चाल आठवते, पण शब्दच आठवत नाहीत; मूड लक्षात येतो, पण अर्थ नाही लागत. पायाखालची जमीन अशी हलल्याने हेकेखोर आणि कांगावाखोर झालेल्या, तरीही ‘बारीकसारीकला हलणारा पण मेनमेनला न हलणारा’ राहिलेल्या एका संवेदनाशील माणसाच्या हरवून जाण्याबद्दलचं हे नाटक आहे. म्हणजे हे आजचं आणि आपलंच नाटक नाही का? बदसुरांच्या गर्दीतून क्वचित गवसणाऱ्या सुरांना हुडकत, आपल्या अव्यक्त अनुभवांसाठी शब्द शोधत माणसामाणसांतील नात्यांची बंदिश रचण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांचं नाटक.
 
बंदिश  - लेखक :  राजीव नाईक  }
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह  
- मूल्य : ~ १२५/-
 
बातम्या आणखी आहेत...