आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुक ब्लर्ब: आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या इतिहास आणि सांस्कृतिक महाराष्ट्राचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत महाराष्ट्राने महत्त्वाची भर घातलेली आहे. जगप्रसिद्ध असलेली अजिंठा, भाजे, कार्ले, जुन्नर व वेरुळ लेणी, बीबीका मकबरा, देवगिरी किल्ला व गुरुद्वारा ही ऐतिहासिक स्थळे महाराष्ट्रातच आहेत. मराठा आणि मुस्लिम राजवटीच्या काळात महाराष्ट्राचा विकास झाला. 
 
इ. स. १८१८ मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे महाराष्ट्र सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रात बदल घडून आले. ब्रिटिशांच्या विचारांनी भारावलेल्या अनेक समाज व धर्मसुधारकांनी समाज आणि धर्मसुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. यामध्ये जगन्नाथ सेठ, बाळशास्त्री जांभेकर, लोकहिवादी, भाऊ लाड, महात्मा जाेतिराव फुले, महादेव रानडे, गोपाळ आगरकर, विठ्ठल शिंदे, महर्षी धों. के. कर्वे आणि राजर्षी शाहू महाराज यांचा समावेश होतो. सुरुवातीला रामोशी, भिल्ल, कोळी यांनी इंग्रजांना विरोध केला. यानंतर इ. स. १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने सुरुवातीस सरकारला सहकार्य केले. परंतु नंतर मात्र काँग्रेसनेच स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व केले. महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर, दलित, शेतकरी आणि कामगार चळवळीही झाल्या. राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भास्करराव जाधव, बाबूराव जेधे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आणि नारायण लोखंडे यांनी या चळवळीचे नेतृत्व केले. प्रस्तुत ग्रंथात महाराष्ट्राचा सर्वांगीण इतिहास देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक इतिहास संशोधक आणि अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास, महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती, महाराष्ट्राचा ऐतिहासिक मागोवा, राजकीय 
इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक विकास, ऐतिहासिक वारसा, एकोणिसाव्या शतकातील सामाजिक, धार्मीक, आर्थिक राजकीय महाराष्ट्र, ब्रिटिश सत्तेचे प्रारंभीचे स्वरुप, प्रशासन शिक्षण, मुद्रण व वृत्तपत्रे, ख्रिश्चन धर्मप्रसारकांचे कार्य, समाज आणि धर्मसुधारक, राष्ट्रवादाचा उदय, राष्ट्रीय चळवळ, वसाहतवादी राजवटीस प्रारंभी झालेला विरोध आदी या पुस्तकात मांडण्यात आलेले विषय हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहेत.
 
प्रकाशक : विद्या बुक पब्लिशर्स  लेखक : डाॅ. अनिल कठाेर किंमत : ४५० रु