आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वेच्छामरण अन‌् ‘जगण्याचीसक्ती अाहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इच्छामरण याबद्दल सुरू असलेला सरकारचा विचार हा संदर्भ घेऊन लेखिका मंगला अाठलेकर यांचे ‘जगण्याची सक्ती अाहे’ या पुस्तकावर साेशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली अाहे. विशेष म्हणजे, तरुण पिढीही या चर्चेत गांभीर्याने सहभागी झाली असून, अनेक महत्त्वाचे विचार करायला लावणारे मुद्दे ते मांडत अाहेत...
साेशल मीडिया, काॅमेंट बढीया...
लेखक प्रकाश घाटपांडे यांनी लेखिका मंगला अाठलेकर यांच्या ‘जगण्याची सक्ती अाहे’ या पुस्तकावर समीक्षा वजा विवेचन ‘एेसी अक्षरे’ संकेतस्थळावर चर्चेसाठी टाकले अाणि स्वेच्छामरणावर चांगलीच चर्चा रंगली. घाटपांडेंनी केलेल्या विवेचनात म्हटले अाहे की, आत्महत्या, दयामरण आणि स्वेच्छामरण यातील परिस्थितीजन्य फरक आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून लेखिकेने स्पष्ट केला आहे. आत्महत्या, स्वेच्छामरण, दयामरण खून या चारही प्रकारचा संबंध माणसाचे अस्तित्व संपण्याशी आहे. पहिल्या दोन प्रकारांत माणूस स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो, तर दुसऱ्या दोन प्रकारांत एका माणसाचे आयुष्य संपवण्याचा निर्णय दुसऱ्या व्यक्तीने घेतलेला असतो. असे नमूद करत पुस्तकातील अनेक बाबींवर घाटपांडे यांनी प्रकाश टाकला अाहे.

मग इच्छामरण हवे की नकाे, यावर बरीच चर्चा रंगली अाहे. त्यात अनेकांनी इच्छामरण हवेच, अशी टिप्पणी साेदाहरण दिली अाहे. तर, काही जण म्हणत की, ‘या चर्चेनंतर मी इच्छामरण हवेच, या माझ्या बऱ्यापैकी क्रिस्टलाइज झालेल्या मताकडून काहीसा दूर सरून पुन्हा यावर विचार करयला हवा या मताकडे अालाे अाहे.’ तर, अनेकांनी घरातील लाेकांच्या स्वभावामुळेही कधी कधी स्वेच्छामरण हवेच, असे वाटत असल्याचे व्यक्त केले अाहे. मग ही चर्चा अगदी मृत्यूमधील वैद्यकीय हस्तक्षेपापासून ते मृताच्या क्रियाकर्मापर्यंत पाेहाेचली अाहे. ‘दैववादी लोकांबरोबर वाद घालण्यात अर्थ नसतोच. कशावरच काही नियंत्रण नाही तर दवाखान्यात स्वतःहून जायचं की आपोआप घरंगळत जायची वाट बघायची? आणि मग दुर्धर आजार ही संकल्पनाच बाद ठरते, पण लगेच अशा आजारी लोकांसाठी तरी कशाला नियंत्रण असल्याचा आव आणायचा?’ असंही मत एक-दाेन जणांनी नाेंदवलं अाहे. ही चर्चा अजूनही सुरू अाहे.