आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनाच्‍या रहस्‍यांचा मागोवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच 'मनाचे व्यवस्थापन' या पुस्तकाची इंग्लिश आवृत्ती प्रकाशित झाली आहे. मनाचे व्यवस्थापन हा मनाच्या सर्व रहस्यांचा र्ममभेद करणारे मराठीतील एक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या मराठीत दहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. स्वत:च्या शांत, निर्भय व खंबीर मनासाठी दु:ख, काळजी, चिंता, ताणतणाव निवारण्यासाठी मानसिक विकार व विकृतींपासून मुक्ती मिळविण्यासाठी नितांत सुंदर आनंददायी, परिपक्व सहजीवनासाठी आयुष्यात यश मिळवून ते अखेरपर्यंत टिकून राहण्यासाठी, तसेच ते पचण्यासाठीसुद्धा अशा अनेक गोष्टी साध्य करायच्या तर ते कसे शक्य आहे. प्रत्येकाला हे सगळे हवे आहे. त्यावर लेखक संजय पंडित म्हणतात, 'एकदा का तुम्हाला मनाची रचना कळली की हे सारे सहज शक्य होते, त्यासाठी मन म्हणजे खरोखरच काय आहे हे समजणे आवश्यक आहे.'
मनाचा शोध व कुतूहल आपल्या सगळ्यांनाच असते, माणसाचे मन म्हणजे खरोखरच काय आहे? याची स्पष्ट अशी व्याख्या आजमितीस जगात कुठल्याही पुस्तकात उपलब्ध नाही. आज वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड प्रगती होऊनही मन हे अजून गूढ कोडेच राहिलेले आहे.
मनाचे व्यवस्थापन कसे करावे हे सांगण्यासाठी लेखकाने या विषयीची मांडणी नऊ भागांत केली आहे. पहिल्या भागात आपण व्यवस्थापन का करतो? त्याची आवश्यकता का आहे? याची विविध उदाहरणांद्वारे त्यांनी विवेचन अतिशय उत्तमरीत्या केले आहे. दुसर्‍या भागात आपण, मन व व्यवस्थापन या तिन्ही गोष्टी व्यक्तीशी कशा निगडित आहे हे स्पष्ट केले आहे.
चौथ्या भागात लेखकाने मन नावाच्या या कंपनीत मनाला नियंत्रित करणारे घटक कुठले? किती घटक आहेत? आपल्यावर यांचा किती प्रभाव आहे. आपल्याला बहकवतात कोण? या सार्‍यांवर नियंत्रण कसे मिळवायचे, मनाला प्रशिक्षण कसे द्यायचे. आपल्या आत जे आपली इच्छा नसताना काही करवते, परस्पर निर्णय घेते, इच्छा नसताना काहीही वागतो, बोलतो नंतर पश्चात्ताप करतो, पुन्हा वेळ येताच तसेच करतो. या सार्‍या मनातल्या गोष्टी नेमक्या कशा घडतात हे सारे आपल्याला कळणार आहे. 'आतलं जग व त्याचे घटक' यामध्ये या पुस्तकाचे खास वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कळत नकळतपणे लेखक वाचकांना कृतीद्वारे मनाचे व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक शिकवत आहे.
जीवनातील निराशेचा काळोख घालवून जीवन चैतन्यमय आनंदी होण्यासाठी आपल्याच मनातील विचारांवरील हुकुमत असणे आवश्यक आहे. वेळीअवेळी मनात उद्भवणार्‍या बर्‍या-वाईट विचारांवरची हुकुमत जमली की आयुष्य म्हणजे आनंदयात्रा होऊन जाते. जीवनातील दु:ख, अपयश, नैराश्य, भय इत्यादी गोष्टींचे अर्थ बदलून जातात, तुमची आयुष्याकडे बघण्याची नजरच बदलून जाते. हे विचार हुकमीपणे कसे पेरायचे, ज्यांचा त्रास होतो असे विचार कसे काढायचे यावर हे पुस्तक अप्रतिम मार्गदर्शन करते.
पुस्तकाचे नाव- 'मनाचे व्यवस्थापन'
लेखक- संजय पंडित